१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?
णमस्कार्स लोक्स ,
अॅज यु वॉल णो .. चवदा फेप्रुवारी येऊन घातलेली आहे ... बरेचशे तुंबलेले बोळे मोठ्या मोठ्या अपेक्षा मनात ठेउन ह्या दिवसाची गेल्या पंधरा फेप्रुवारी पासुन वाट बघत आहेत... काहींच्या गाड्या सुटल्या तर काहींना गाडया भेटल्या .. काही भेटलेल्या गाडीतुन उतरले आणि पुन्हा नव्या गाडी मागे धावत आहेत ... काही मात्र अजुनही त्या गाडीला लटकुन आहेत ..
तर अशा सगळ्यांच्या भावनांचा विचार करुन एक जनहितार्थ धागा काढावा अशी हाक मला अंतर्मनातुन आली . आणि हा धागा काढल्या गेला. आपण सगळे तर जाणतात, मिपावर कशाची मदत मिळत नाही ? गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचं काय करायचं ?
मिसळपाव