Skip to main content

नर्मदा बचाव आंदोलन: एक संवाद.

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 24/02/2011 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
१६ फेब्रुवारीला IISER (Indian Institute for Science Education and Research) पुणे इथे श्रीपाद धर्माधिकारी यांचं On Narmada Struggle and Beyond या विषयावर व्याख्यान होतं. श्रावण आणि मी तिथे गेलो होतो. 'नर्मदा बचाव आंदोलना'ची त्यांनी ओळख करून दिली. फक्त पाण्याच्या फुगवट्यामुळेच लोकं विस्थापित झालेले असं नाहीत तर १९६२ साली नेहेरूंचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी ज्या शेतकर्‍याची जागा 'तात्पुरती' घेतली ते कुटुंबही आज अनअफिशियली विस्थापितच आहे. (अशा छोट्या छोट्या गोष्टी मला माहित नव्हत्या.) ती जमिन परत मिळेल असं सांगून घेतली, पण ती तर जमीन गेलीच शिवाय कॉलनी उभी करण्यासाठी इतर सहा गावं विस्थापित झाली.

असाही एक समारंभ!

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 23/02/2011 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
याआधी- एक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा!
आजीकडे तिच्या वाढदिवसाचे फोटो पहायला काही खास दोस्तमंडळी जमली होती, त्यांच्या फर्माइशीवरुन व्हेज पुलाव आणि कॉर्न पॅटिस करुन नेले होते. शिवाय आजीने एक प्रकारचे क्रिमसॉसमधील श्वाइनफ्लाइश ( पोर्क) ३ ,४ प्रकारचे केक्स,कॉफी इ. तयारी केलीच होती. गप्पा मारत,खिदळत फोटो बघत असताना हान्स विमेलमान आजोबांचा विषय निघाला. हे विमेलमान आजोबा आता ९० वर्षांचे होणार होते.

अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय?

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 23/02/2011 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय? अलीकडील घटना पहाता अमेरिका भारताशी मैत्री करू इच्छिते आहे असे चित्र दिसत आहे. क्लिंटन यांच्या कारकीर्दीत याला सुरुवात झाली होती पण त्यांच्या कारकीर्दीत ’नारळ फोडण्या’पलीकडे फारशी प्रगती झाली नव्हती. धाकल्या बुश यांच्या कारकीर्दीत कांहींसा वेग आला व अणू ऊर्जा करार होण्यात त्याची परिणती झाली.

मराठी शब्द हवा

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 23/02/2011 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
पोथी खालच्या पाटाला, जो पोथी वाचताना उघडून ठेवतात व नंतर घडी घालून मिटता येतो त्याला मराठी अथवा संस्कृत शब्द कोणता?

शोलेच्या ठाकूरच्या हातांचा शोध

लेखक नितीन बोरगे यांनी बुधवार, 23/02/2011 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो शोले हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३५ वर्ष लोटली आहेत. हा चित्रपट न पाहिलेली व्यक्ती शोधून सापडायची नाही. ह्या चित्रपटातील सर्व पात्रे लक्षात राहिली, पण सर्वात जास्त लक्षात राहतो तो हात नसलेला ठाकूर. "तेरे लिये मेरे पैर हि काफी है", अस म्हणत गब्बर वर तुटून पडणारा ठाकूर पहिला कि नुसता चेव चढायचा अंगात. हात कापलेल्या ठाकूरला लढताना बघताना मला लहानपणी जाम कौतुक वाटायचे. मग शाळेत खेळताना हात मागे बांधून मित्रांशी मारामाऱ्या देखील केल्या आहेत (आणि तोंडावर पडून नाक फोडून घेतली ते सांगायला नकोच,,). जाऊ देत, नमनालाच घडाभर तेल झाल.

रतनगड - एक सुखद अनुभव

लेखक गणेशा यांनी बुधवार, 23/02/2011 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवरुन संध्याकाळी ६:३० ला गोदावरी गाडी ने नाशिक रोड ला उतरलो. सिन्नर चा माझा मित्र ह्रषिकेश यमाहा १३५ वर मला न्ह्यायला आलाच होता(मीच बोलावले होते, बिच्चारा मॅच सोडुन आला) .. नाशिक मधील जुने कलीग त्यांच्या फॅमीली बरोबर रात्री "छान" मध्ये जेवुन , जाताना मी चिकन खाल्ले म्हणुन २ शब्द मित्राकडुन उगाच ऐकुन आम्ही सिन्नर ला निघालो... रतनगड ला तसे नाशिक वरुन ही जाता आले असते पण सकाळी डबा घ्यायचा असल्याने नाशिक च्या मित्राला सोडुन आम्ही सिन्नर ला गेलो. रतनगड ला ही बाकीचे कॅन्सल झाल्याने आम्ही दोघेच जाणार होतो.. सकाळी लवकर उठुन .. २ ब्यागा भरण्यात आल्या.. डबा .. कांदे..

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग १०

लेखक अवलिया यांनी बुधवार, 23/02/2011 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग - http://misalpav.com/node/16919 ***
कोनी एका ओळिचं धागं काडाया कायबी जुळिवतंय आनी पब्लिक त्येच्यावर येड्यावानी परतिक्रिया देतंय आमानी नाय कवा परतिसाद देयाचं वाटनांर तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !! लोकं लावत्यात कौल अन गाव म्हनतंय भारी आमी मात्र मनात हानतुय दगुड, फोड कौलं तिच्यामारी लावली तुमी कौलं सोन्याची तरी आमी फाट्याव मारनार तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!
अधिक वाचा - http://misalpav.com/node/8989 ***
खोकत खोकत पहाता पहाता उठते जेव्हा

डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग ९

लेखक अवलिया यांनी बुधवार, 23/02/2011 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग - http://misalpav.com/node/16898 ***
माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज संध्याकाळी देवळात जायची. विठोबाच्या देवळात जायचं म्हणजे आरे रोड ओलांडावा लागायचा. त्यावेळी तिला सोबत लागायची.