लेखकसोनल कर्णिक वायकुळयांनी शनिवार, 26/02/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
अंधाराच्या निसरड्या कातळावरून निसटून
अवकाशाच्या खोल दरीत असहाय कोसळताना
निर्वाणीची मदत मागणारे त्याचे दोन हात
तुला दिसले नसणारच…
त्याच काळ्या कभिन्न पोकळीत होरपळत
अदृश्य झालेल्या त्याचं पुढे काय झालं असेल
ही काळजी अस्फुटशी सुद्धा तुला शिवली नसेल
याचीही खात्री आहेच
पाहिलं मी तुला त्या रात्री
स्वप्नांची झापड ओढलेल्या अनिमिष नेत्रांनी
निखळणा-या ता-याकडे
स्वतःसाठी अजून एक मागण मागताना
लेखकस्नेहश्रीयांनी शनिवार, 26/02/2011 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज विकेंड.. त्याची तयारी मात्र काल पासुन सुरु केलीय. आज आमच्याकडे मुंज मुलाला केळवण आहे. त्याला आवडेल अस पुडींग आणि अजुन एक डेझर्ट्चा प्लान आहे. एक पुडींग रेडी आहे.. आणि डेझर्ट् रेडी होत आहे. तर आज पुडींग ची रेसिपी देते.
साहित्यः
४/५ सफरचंद
३/४ चमचे साधी साखर (सफरचंदाच्या गोडी नुसार)
१०/१२ मारी बिस्कीटाचा चुरा
व्हिप्ड क्रीम
२ चमचे पिठीसाखर
व्हॅनिला इसेंस
स्ट्रॉबेरी क्रश
सजावटीसाठी:- चेरी, द्राक्ष, जेम्सच्या गोळ्या, चॉकलेट सॉस.
कृती:
१. सफरचंदाची साले काढुन ती किसुन घ्यावीत
२.
लेखकअवलियायांनी शनिवार, 26/02/2011 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
विनायक दामोदर सावरकर.
भारतीय स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी होण्यासाठी ज्या अनेकांचे योगदान लाभले त्यातील एक अग्रणी नाव. या नावाचा उल्लेख केल्याखेरीज भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची कथा पूर्ण सांगितली जाणार नाही.
राजकारण, विज्ञान, साहित्य, समाजकारण, धर्म इत्यादी जवळपास सर्वच क्षेत्रात सावरकरांनी आपल्या विचारांचा ठसा उमटवला आहे यात शंका नाही. दूरदृष्टी असलेला द्रष्टा नेता हे बिरुद ज्या थोड्या लोकांना शोभुन दिसते अशांपैकी एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर.
लेखकचिंतातुर जंतूयांनी शनिवार, 26/02/2011 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा गटाच्या (उदा: मराठी संकेतस्थळांचे संपादक! सं.मं: ;-) ह. घ्या. बरंका!) विषयी पसरणारे विनोद हे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात असणाऱ्या रागाचं द्योतक असतीलच असं नाही. उदा: बेल्जिअन लोक मूर्ख असतात असं दाखवणारे पुष्कळ फ्रेंच विनोद लोकप्रिय असूनही बेल्जिअन लोकांविषयी फ्रेंचांना विशेष राग आहे असं दिसत नाही. आपल्याकडेही ‘संता-बंता’सारखे विनोद शीख लोकांना मूर्ख दाखवतात, पण शिखांविषयी फार राग जनमानसात आढळत नाही. उलट एखाद्या व्यक्ती/गटाविषयी असणाऱ्या द्वेषाचं रुपांतर विनोदांमध्ये होईलच असंही नाही.
लेखकनीलकांतयांनी शनिवार, 26/02/2011 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,
मिसळपाववरील नवीन सदस्यांसाठी उपयोगास येतील अशी मदत पाने सध्या मी बनवतोय. याच वेळी नवीन सदस्यांना जुणे सदस्यं जे लघुरूपे वापरतात त्याची एका जागी माहिती दिली तर योग्यं होईल अशी कल्पना आली. मात्र माझ्याजवळ अशी यादी तयार नाही. मला येथे तुम्हाला माहिती असेल ती मराठी आंतरजालावर वापरली जाणारी मराठी लघुरूपे द्यावीत ही विनंती.
माझे योगदान :-
प्रकाटाआ - प्रतिसाद काढून टाकला आहे.
पुलेशु - पुढील लेखनासाठी शुभेच्छा
कलोअ - कळावे लोभ असावा.
मग तुम्ही काय सुचवताय? :)
- नीलकांत
लेखकनिनावयांनी शुक्रवार, 25/02/2011 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
उजाडलेच नाही आज
दिवस होते झोपून
रात्री ने सोडले नाही हात
तिच्या गोड कुशीतून
मी राहिलो पाहत वाट
होते तिला भेटायचे
दिवस कुठे उजाडे
कधी त्यास कळायचे
जेंव्हा होते प्रेम
होतात दिवस छोटे
विरह भेदते मनाला
सरता न रात्र सरते
शोधू लागलो वाटा
अंधारातच तिच्या ओढी
कुठे होते ठाऊक वाट ही
थेट स्वप्नात तिच्या पोहोचते
उजाडलेच नाही आज
दिवस होते झोपून
रात्री ने सोडले नाही हात
तिच्या गोड कुशीतून
लेखकनिनावयांनी शुक्रवार, 25/02/2011 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी समुद्र किनार्या वर
उघड्या पायांनी चालतांना
उडणाऱ्या पक्ष्यांचे आवाज ऐकतांना
आणि डुलणार्या होडी पाहतांना
तुझीच आठवण येते
दूर नभात उजाड्तांना
थंड लाटा भिजवतांना
पायात शिंपले टोचतांना
तुझीच आठवण येते
किनाऱ्याची मिठी मारतांना
लाटांचे फेस जवळ येतांना
सुसाट वारा केस उडवतांना
तुझीच आठवण येते
एका हातात चपला धरूनी
चालतो आहे मी काही शोधत
खाली बघत
पण खंर तर काहीच दिसत नाही मला
आणिक काहीच ऐकू येत नाही
सगळे जसे थांबले आहे ...आणि ...
भासते अचानक मला...
त्या लाटा आत्ता पाण्या च्या नाहीत
त्या तुझ्या बरोबर जगलेल्या प्रत्येक क्षणाच्या आ