माझी ही पाक्रु 'सामना' च्या फुलोरा आवृत्तीत पण छापून आली होती. त्यावर 'उपक्रम' संकेतस्थळावर बरीच चर्चा झाली. चर्चे चा मुद्दा हा होता कि ब्रेड च्या एका स्लाईस मध्ये ६५-७५ कॅलोरी असतात तर मग ४ स्लाईस बृस्केत्ता टोस्ट मध्ये २०० कॅलोरीस असे मी कसं लिहू शकते. म्हणून मला इथे हा खुलासा करावासा वाटला. आपण अंतर्जालावर ज्या कॅलोरी काउन्ट वाचतो त्या सगळ्याच बरोबर किंवा आपल्या देशाला, राहणीमानाला अनुरूप अश्या नसतात. उ. दा. क्रीम, पनीर, केक, नान किंवा ब्रेड सारखे पदार्थ. ह्याचे कारण कि इंडिअन आणि पाश्चात्य पोर्शन साईझ मधला असलेला फरक आणि त्या पदार्थाचे ingredients आणि प्रोसेसिंग.