बेंचमार्क
कोणे एके काळी, मिपावर जेव्हा काहीशे सदस्यच होते, तेव्हा आम्हाला कोणालाही हापिसामधे काहीच काम नसायचं. परा (परिकथेतील राजकुमार) हा आधी नव्हताच आणि आला तेव्हा नवा होता, टिंगीचा टिंग्या झाला असला तरी तेव्हा तो "दुशली ब" मधे नव्हता. आनंदयात्री, धमाल मुलगा, छोटा डॉन, मेघना भुस्कुटे, ब्रिटिश टिंग्या, ऋचा (ही पार गायबच झाली आहे), मी असे आम्ही निरुद्योगी लोकं मिपाच्या खरडफळ्यावर पडीक असायचो. अधूनमधून कोणी मैत्री किडे यायचे, स्त्री आयडींना खरडी टाकायचे आणि त्यावर इनोबा म्हणे, टिंग्या, बिपिन वगैरे लोकं "माझ्याशी पण मैत्री करणार का?" असा 'लष्कर-ए-खरडा'चा हल्ला करायचे.
मिसळपाव
शनिवार रविवार राजमाची !!! म्हणताच ब-याच मंडळींची नावे आली होती पण त्यातले १३ मावळेच शब्दाला जागले होते त्यात मी, लकी प्रशांत, राहूल-वसुधा(दांपत्य), शितल जाधव, श्रीकांत, अभिजीत अशा जुन्या मंडळींसोबत विजया, अश्विनी, प्रसाद, महेश आणि शितल ( नावावर जाऊ नका हा मुलगा आहे ) अशी नवी मंडळीही होती. पहाटे ६.३० ची लोकल पकडून लोणावळा गाठायचे असे ठरविले होते.