Skip to main content

पैलतीर ...

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 11/03/2011 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
केले अथक परिश्रम गाठाया पैलतीर ... नाही ओलांडू शकलो सखे तुझ्या नयनीचे नीर सोडून सगळे मागे चाललो नव्या देशात ... गुंतले हात सखये मात्र तुझ्या मोकळ्या केसात पुसले सारे संकेत पुसल्या त्या आठवणी ... ओठावर पण अजून रेंगाळती तुझी मोहक गाणी वाटले झालो मोकळा तोडले सगळे पाश वाटले सरले धुके अन झाले मोकळे आकाश पाऊले पुढे नेत होती ... मन म्हणत होते .... मागे फिर नाही ओलांडू शकलो .... सखे तुझ्या नयनीचे नीर

दुखात सुखाची धून असते ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 11/03/2011 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेच संपून गेलेले असते ती धडपड ... जागरणे .... धावपळ ... धडधडणे ....!! नि उरतो फक्त एक न मिटणारा आवंढा आई गेली नि फक्त उरले निव्वळ अश्रू न कळत ....न जुमानणारे ...! सगळे बधीर ..!! ते क्षण …. ते वातावरण .... सगळे सुन्न... अबोल ... अश्रू फक्त सोबत ...कधीपण ...! एका नंतर दुसर्याचे घनघोर टाहो....
काव्यरस

आलो असा मी नजरेत

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 11/03/2011 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
आलो मी असा नजरात कुणाच्या न मी आलो तुझ्या प्रकाशात आज मी असा लपुन राहिलो रक्ताळलो, खरचटले किती, किती मी पडलो वस्त्रच तुझ्या वाटेस, असा त्यास चिटकलो तो म्हणाला मंदिरात जा तु , देव तेथेच भेटतो राहिलो उभा समोर मी, तरी न त्यास दिसलो प्रतिक्षेच्या लाटांवरी सवार, असा मी वाहिलो बुडालो-उभारलो असा, किनारी न मी लागलो!

महिला दिन ( आमचे मनोगत )

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी गुरुवार, 10/03/2011 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
महिला दिन आम्हाला मक्याचे सातच्या आत घरात ह्या सिनेमातील वाक्य आवडते. ''दिवस कसले साजरे करतात आज अमका दिवस आपल्यात दिवस कधी घालतात ........'' एक दिवस महिला दिवस तोही आंतराष्ट्रीय म्हणून आपण पण साजरा करायच्या म्हणजे काय तर एकमेकांना अभिनंदन करायचे . सावित्री फुल्यांची जयंती कितीजणांना माहीत आहे (मला माहीत नाही .) ''एक स्त्री शिकली तर सारे घर साक्षर होईल .'' हा संदेश देशात पोहोचला का ? ''त्यांच्या राज्यापेक्षा केरळमध्ये महिला साक्षर आहेत असा विरोधाभास का ?'' हे आशा ताई ह्यांनी विचारले .तेव्हा त्यांनी महिला दिनाची

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग- ६)

लेखक चिंतामणी यांनी गुरुवार, 10/03/2011 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१) (भाग-२) (भाग-३) (भाग-४) (भाग- ५) या भागातसुध्दा ज्यांची कारकिर्द २-५ चित्रपटांच्या पुढे गेली नाही अश्या काही संगीत दिग्दर्शकांचा आढावा घेणार आहे. संगीत दिग्दर्शक- सतीश भाटीया सतीश भाटीया आकाशवाणीवर प्रमुख निर्माते म्हणून काम करीत असत. व्हि.

खाटिक

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 10/03/2011 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
खट खट खट आवाज करत खाटिक समोरचं गिर्‍हाईक पाहून तोडून देत होता आणि मिळालेले पैसे गल्ल्यात जमा करत होता. त्याला पाहून मला "तो" आठवला. फरक असलाच तर एवढाच ... तो रंगवलेल्या स्वप्नांचे तुकडे करत होता आणि आक्रंदित प्रार्थना ऐकत होता.

शिव शिव शिव!! सेना

लेखक चिरोटा यांनी गुरुवार, 10/03/2011 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
निहार ठाकरे ,आदरणिय हिंदुह्रुदयसम्राटांचे नातु ह्यांच्यावर Prevention of Immoral Trafficking Act खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदरणिय निहार ठाकरे ह्यांच्या मालकीचा सांताक्रुझ येथे लेडिज बार आहे.लेडीज बार मधील अनेक मुलीं वेश्याव्यवसायात असतात असे पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

ग्रुहकर्ज ..एक अनुभव

लेखक नि३ यांनी गुरुवार, 10/03/2011 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या घर घर चालु आहे...प्रत्येक विकांत असाच पायपिट करण्यात व्यर्थ ...१ BHK घ्याव कि २ BHK.ह्या एरीयात घ्याव की त्या तिथे पलीकडे...दिनोदीन जमिनीचे रेट वाढतच आहे..ग्रुहकर्जाचे व्याजदर पण..काही दिवस आणखी थांबलो तर घर घ्यायची लायकी राहणार नाही आपली पुण्यात. आणि नाही हो करता करता ..शेवटी एकदाचा बुक केला ...