या अंधश्रद्धेचे काय करू?
आज भारत-ऑस्ट्रेलीयाचा "एफ-५" कळ दाबत सतत ताजा होणारा धावफलक एकीकडे बघत असताना दुसरीकडे ज्यांना तो खेळ प्रत्यक्ष बघता येत होता त्यांचा विचार करत इनो घेणे चालू होते. भारतीय संघाचा खेळ बघताना सरासरी आता आटोक्यात आहे, तरी देखील काय होते या भितीने एकीकडे बोटे जुळवून बसलेलो (फिंगर्स क्रॉस्ड) तर दुसरीकडे मनातल्या मनात, "च्यायला यांना बरं बघायला मिळतं" असे म्हणत तीच बोटे मोडत होतो.... :(
तर मग ठरवलचं! की यापुढे "एफ-५" नाही तर ३० मार्चला हातात रिमोटच असेल!
मिसळपाव