Skip to main content

आसमंतात तारे सर्व निळेच , नाहि का?

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 08/04/2011 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंतात तारे सर्व निळेच , नाहि का? नजरेत भरतील मात्र सर्वेच, तसे नाही. पानं झाडांवर किती तरी हिरवे, बघ जरा पण सुखावतील नजरांना सर्वे, तसे नाही. मग प्रेम तरी का व्यक्त व्हावे माझे मग का मी वेड्या सारखे वागावे माझे वेडेपण आवडेलही कुणाला पण तुलाच आवडेल, तसे नाही. प्रेमाच्या परिभाषेत बसणारे शब्द सारे बसतील तुझ्या-माझ्या भाषेत, तसे नाही. हातात धरून हात कदाचित धरु ती वाट अन मन माझे शोधेल एक घर पाखरांचे फुलतीलही स्वप्न कदाचित त्या बागेत पण येईल वास त्या फुलांस, तसे नाही. आसमंतात तारे सर्व निळेच , आज ही. चमकतील मात्र सर्वेच रात्री, तसे नाही.

पिंक जिव्हारी गर्दुल्ल्याचे नकादु चेण्यापका सके

लेखक शरदिनी यांनी शुक्रवार, 08/04/2011 02:16 या दिवशी प्रकाशित केले.
नावाड्याचे वल्हे नशीले, गुलाबातुनी उरात घुसले मस्त धुराडे शीतल हाले,लोचट गहिरे क्षण गर्दुल्ले वृंदगान : वल्ला वल्ला वल्ला वल्ला आर्त मदारी लक्षण ढोले, कहासुनीचे तुमन्त छोले तन डोले अन मन भी डोले, नाक्यावरचा शेट्टी बोले ss वृंदगान : :इडलीडू sss इडलीडू sss नटवे फ़ुटवे थंडी बिस्तर, कोलमाईनी सलज्ज प्रस्तर शाहीरबाबा थाप डफ़ावर, हिप्परग्याचा थ्रोट शिरावर वृंदगान : हावडू यू sssहावडू यूsss चंद्रचांदणे अतीव सुट्टी, उठता लत्ता बसता पल्टी रेडिओभट्टी कडबाकुट्टि, गदामा ओबिया अट्टीबट्टी वृंदगान : प्प्पंजाबी प्प्प्प्प्पंजाबी श्वेतलाजरी पणती नाचे , धडुतेवाली हिप्पा शेके काफ़ी कॉफ़ी ब्राउन ग
काव्यरस

जपान मध्ये पुन्हा भुकंप

लेखक विनायक बेलापुरे यांनी गुरुवार, 07/04/2011 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
जपान मध्ये नुकताच पुन्हा एकदा भुकंप झाला आहे. हा भुकंप ७.१ रिश्टर चा असून ११ मार्च च्या भुकंपाहऊन त्याचा केंद्र बिंदू जपानच्या अधिक जवळ आहे. सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चीन मधील "हरवलेल्या" मुली

लेखक विनायक बेलापुरे यांनी गुरुवार, 07/04/2011 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
१९८९ मध्ये चीनी लेखिका झिन रान ही शान्डोंग भागातील एका गावाच्या मुख्याच्या घरी रात्रीचे भोजन घेत होती. त्याची सूनबाई शेजारच्याच खोलीत वेणा देत होती एका नव्या जीवाला जगात आणण्या साठी. तितक्यात त्या शेजारच्या खोलीत रडारड झाली. थोड्यावेळाने सुईण बाई कामाचे पैसे घेण्यासाठी बाहेर आल्या असता त्यांच्या जवळच्या टोपली मध्ये अचानक एक हालचाल दिसली. नीट पाहिले असता त्यातून एक इवलासा पाय डोकावत होता. त्या खोलीत ती एकटीच होती जिचा थरकाप झाला होता. मुख्याच्या पत्नीने सहजपणे सांगितले की " ते मूल नाहीये. जर असते तर आम्ही त्याला आत्ता सांभाळताना दिसलो असतो. पण ती एक मुलगी आहे आणि आम्ही तिला ठेवू शकत नाही.

<पेयनिष्ठ पेताडाचा कर्मदरिद्री बाटलीभंग>

लेखक लंबूटांग यांनी गुरुवार, 07/04/2011 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा बसे उकिडवा बाटली उघडून चखणा खातो कर्रम कुर्रम प्रचंडकुंथी वायूप्रदूषण धडाम धुडूम्म धडाम धुडूम्म शेव न चकली उडतो फन्ना पेला भरीतो आणिक एक आता जगाची सोडून चिंता फाड फाडतो इंग्लिश भेदक ग्लेन्मोरेन्जी यथेच्च ढोसून निरर्थ काही बर बर बरळीत शिग्रेट बीडी ओढून ओढून वूक्खु विक्खी खोकत खोकत खरडत खुरडत सावरि धोत्रा त्रेधा तिरपिट विचित्र मुद्रा बाथरूमचा कडाकोयंडा जाईजाईस्तो घडे अभद्रा आकाशातील सप्तढगावर ह्याला फाट्यावर त्याला फाट्यावर मग खंबा तो संपेस्तोवर टांगा पलटी घोडे फरार Disc

अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 07/04/2011 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण समाजसेवक अण्णा हजारे यांच्या "भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला" पाठींबा दर्शविण्यासाठी आणि "जनलोकपाल विधेयकाच्या" सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले आहे. त्यापुढील आंदोलनाची दिशा एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच जाहिर केली जाईल. ----------------------------------------------------------- दि.

अण्णांचे आंदोलन कशासाठी...?

लेखक VINODBANKHELE यांनी गुरुवार, 07/04/2011 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांचे आंदोलन कशासाठी...? हा आपल्या सारख्या सामान्य माणसांना पडलेला प्रश्न .

हिदूंनो! निष्क्रिय राहू नका - स्टीफन नैप

लेखक विश्वास कल्याणकर यांनी गुरुवार, 07/04/2011 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदूंना ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित करण्याच्या भरतातील अनेक घटनांबाबत आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. मात्र गेल्यावेळी मी भारतात जेव्हा गेलो तेव्हा भारतातल्या परिस्थीतीबाबत चे अधिक स्पष्ट चित्र समजले. भारतातील बहुसंख्य हिंदूंना हे माहितच नाही, की हिंदुत्वाच्या विरोधात एक युध्द पुकारले गेले आहे आणि त्याचे गांभीर्य किती भयानक आहे. हिंदुत्वाला अनेक ठिकाणी अनेक मार्गांनी विरोध केला जात आहे.