मेथांबा
साहित्यः
२ कप कैरीची सालं काढून केलेले तुकडे
१ कप चिरलेला गूळ
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून मेथीदाणे
१ टीस्पून लाल तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
चिमूटभर हिंग (फोटोत साहित्यासाठी चमच्यात हिंग दाखविले आहे) :)
मीठ चवीप्रमाणे
तेल
पा़कृ:
जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी व मेथीदाणे टाकावे.
तुझ्या सावलीस लपता लपता
पुन्हा देत आहे ही रचना..
------------------
तुझ्या सावलीस लपता लपता
जात होतो गल्लीत अंधार जसा
कुठे होते ठाऊक तरी मला
भेटशील तिथं ही तु अशी
वेड्यावानी माझी वाट बघता
विखुरले काच असे आज खाली
असंख्य तुकड्यांमधे तारेच
ओठी लागायचे माझ्या कधी
नजर काढून माझी झाले रक्तरंजित
विघ्न जणु माझे हरता
शोधत राहिले ते सारे त्याला त्या घरातच
हसु न आवरले मज पाहाता पाहाता
गुंतले होते मन कुणाचे किती बघत
जड होता तो कोपर्यात उभा
दाटुन होते मन त्याचे जाता जाता
राहिले रिकामेच ते घर त्याच्या गेल्यानं
न आलेच मृत्युही तिथे राहावयास कधी
एकटेपण आले मग असे काही
शेजार कुणी नसलेले
जगले काही काळ निनाव राहता
ठाणे कट्ट्यावर उतारा....
एका स्पाम मेल मध्ये ठाणे कट्ट्याचा मेनु पाहिल्यापासुन अंमळ त्रास होत होता.
विकांताचा सदुपयोग करावा म्हणुन मग शेव भाजी न चपाती चा एक प्रयत्न करुन पाहिला.
भाजी साठी साहित्यः
१ वाटी सुके खोबरे.
१ मोठा कांदा.
२ मिरच्या
२ लसुण पाकळ्या ( सोलुन)
छोटा आल्याचा तुकडा
१/२ टि स्पुन लाल तिखट
१ टि स्पुन मसाला.
१ वाटी लाल शेव
सुके खोबरे लालसर भाजुन घेणे. कांदा साफ करुन तो देखील मिरच्यांबरोबर भाजुन घेणे.
भाजलेले वरील जिन्नस , तिखट , मसाला , हळद ई. मिक्सर मधुन फिरबुन घेणे.
एका कढईमध्ये तेल तापवत ठेवणे.
बहकलेले दिवस
कसे ते बहकलेले दिवस
अन् कश्या त्या मंतरलेल्या रात्री
मोहर तुझ्या अवघ्या देहास
अन् सुगंधी दरवळ माझ्या गात्री
एवढे एवढे होत उरले होते
जग फक्त आपल्या दोघांचे
क्षणाक्षणांवर उमटले होते
सुंदर ठसे आपल्या मिलनाचे
सहवासी सुखाचा सोहळा
निळ्या नभीचा निळा चांदवा
अद्भुत अनुभव आगळा
तुझ्या मिठीचा नवा गोडवा
कंपित ओठांची धुंद सय
थरथरते स्पर्श मोरपिशी
गंधित श्वासांची संथ लय
झरझरते हर्ष हृदयाशी
झुगारून दे काळाची बंधने
फिरून जागवं ते क्षणन् क्षण
उभारून दे स्मरणांची स्पंदने
भारुनी अस्वस्थतेचे कणन् कण
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०८/०४/२०११)
काव्यरस
अति जेवल्या वर काय कराल?
खादाडी कट्टा हा विषय चाललाच आहे तेव्हा....
'गरम गरम पुरणपोळी, त्यावर साजूक तूप- मग काय विचारताय? चांगल्या ३-४ हाणल्या. एवढ्या प्रेमानं केल्या होत्या मग त्याला दाद द्यायला नको?' असे संवाद तुमच्या कानावर पडले असतीलच. नाही? बरं मग - 'अरे काल आम्ही सगळे मित्र मंडळी जमलो होतो. काय धम्माल आली माहितीये, तंदुरी चिकन, पनीर मक्खन्वाला, गरमागरम बटर रोटी! डाएट वगेरे पार विसरलो रे!' 'अगं काल मी घरी एकटीच होते, मग टी. व्ही. बघता बघता एक डबाभर आईस्क्रीम फस्त केलं. कळलंच नाही कधी एवढं खाल्लं गेलं ते!' ह्या पैकी एक तरी उदाहरण तुम्ही ऐकलं किंवा बघितलं असणार.
सुटलेली सुटकेस
खूप वर्षांपुर्वी घडलेली एक सत्यघटना-
चित्राच्या लहान बहिणीचे लग्न ठरल्याचे कळले, आणि आमची नागपूरला जाण्याची जोरदार तयारी सुरू झाली. मुले त्या वेळी साधारणत: सोळा आणि बारा वर्षे वयाची होती. त्यामुळे त्यांचे आपापले लग्नात धमाल दंगामस्ती करण्याचे प्लान्स होते. हा सगळा उत्साह पाहून मी लगेच चांगली दोन आठवड्यांची सुट्टी घ्यावी लागणार असे सुतोवाच ऑफ़ीसमधे करून ठेवले. बॉसने आंबट चेहऱ्याने, तोंडातल्या तोंडात पुटपुटत संमति दाखवल्यासारखे केले होते. तीच पडत्या फ़ळाची आज्ञा मानून मी लगेच मुंबईची चार तिकिटे बुक करून टाकली. ताबडतोब त्याला तसे सांगून देखील टाकले.
लाच का देऊ नये?
लहानपणापासून आपल्याला 'लाच घेण्याप्रमाणे लाच देणे' हा गुन्हा आहे हे ठसवले जाते. आणि त्याच प्रमेयाला पुढे खेचून "तुम्ही लाच देता म्हणून घेणारे घेतात आनि त्यामुळेच भ्रष्टाचार वाढला आहे" असे नेहमी म्हटले जाते. थोडा विचार केला तर लाच खाण्यास सोकावलेल्या ह्या व्यवस्थेला प्रत्येकाला उपल्ब्ध असलेल्या वेळेत / एका निश्चित वेळेत जराही लाच /अमिश न देता कोणतेही काम करणे शक्य आहे का?
यामुळे होते कसे की एखादा जेव्हा लाच देतो तेव्हा जर त्याला हे रोखायचे असेल तर लाच देण्याआधी अॅन्टी करप्शनमधे तक्रार नोंदवावी लागते, मग ते सापळा रचणार आणि त्या लाच घेणार्याला पकडणार (अशी ढोबळ पद्धत ऐकून आहे).
मिसळपाव