चॉकलेट फज् : Chocolate Fudge
रेशमी..जिभेवर वेल्वेटी फील देणारं ...चॉकलेट फज्!
सोप्पं आहे. पण कधी वड्या पडतील याचा परफेक्ट अंदाज यावा लागेल.
साहित्य :
कंडेन्स्ड मिल्क : १ टिन
कूकिंग चॉकोलेट : २०० ग्रॅम्स
साखर १०० ग्रॅम्स
लोणी : ५० ग्रॅम्स
थोडी पिठीसाखर (emergency quick-fix)
कृती :
ट्रे ला तूप / बटर लाऊन घ्या.
सगळं एकत्र करुन नॉन्-स्टिक कढईत घ्या.
सतत हलवत रहा.
कडेनी सुटायला लागल्यावर / गोळा व्हायला लागल्यावर ट्रे मध्ये ओता.
साधारण थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा.
मिसळपाव