भारतात अराजक माजले आहे का? / भारतात अराजक माजले आहे. का?
"आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो. " :)
अती झालं आणि हसू आलं. माझ्या वैयक्तिक अनुभवात आणि एकंदर देशातील घडामोडींत विलक्षण साम्य दिसल्याने गंमत वाटली आणि बोलावंसं वाटलं. या चर्चेत वैचारीक आणि बुद्धीवादी असं काही नाही.
प्रसंग १ -
मी साधारण जानेवारी २०१० मध्ये माझे जुने वाहन विकले आणि दुसरे घेतले. (दोन चाकी/चार चाकी ते सांगत नाही. नाहीतर लगेच तुम्ही निष्कर्ष काढाल की मी माझ्याकडे अमकी गाडी आहे हे सांगायला हा धागा काढलाय.
मिसळपाव