Skip to main content

दखल

लेखक उपटसुंभ यांनी बुधवार, 18/05/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक छोट्या बहरातली गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. बघा आवडते का -- लिहू नवी गझल जरा व्यथे अजून सल जरा भ्रमात या खुशाल मी खर्‍यास दे बगल जरा असेच टाळ नेहमी अशीच घे दखल जरा मना कधी कळेल का तुला तुझाच कल जरा नवीन स्वप्न पाहु दे हवा तुला बदल जरा असेल ध्रुव एकटा मलाहि ये ढकल जरा..!
काव्यरस

गजर (Journey of the soul)

लेखक गणेशा यांनी बुधवार, 18/05/2011 07:18 या दिवशी प्रकाशित केले.
गजर (Journey of the soul) लेखक-दिगदर्शक : अजित भैरवकर कलाकार : चिन्मय मांडलेकर, सुखदा यश, एडवर्ड, सुहास शिरसाट --- १८ दिवस चालणारी पंढरीची वारी आणि ज्ञानेश्वरीचे १८ अध्याय यांचा योग्य संगम (नाविन्यपुर्ण विचार) मला खुपच आवडला .. या एका कल्पनेसाठीच लेखकाला सलाम, अजोड परिश्रम.. वारीच्या खरा अनुभव .. खर्‍या वारीमध्ये १८ दिवस केलेले शुटींग.. वारीतील प्रसंग.. रिंगण आणि इतर प्रथा... आणि एका माणसाच्या जीवनात वारीमुळे होणारा योग्य बदल हे ह्या सिनेमाच्या मुख्य बाजु वाटतात .. त्यातच वारीतल्या शेतकर्यांच्या थोड्याश्या कहाण्या..

स्त्री-पुरुष समानता

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 18/05/2011 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, डिस्ल्केमरः शिर्षक आणि मायना यांचा संबध न वाटल्यास प्रेषक जबाबदार नाही. :) अगदी आजचीच गोष्ट.. स्थळ : मुंबई वेळ : ऑफिस संपल्यावर चल यार आज पार्टी करते है, साला बहुत हो गया. अशा वाक्याने संध्याकाळ सुरु झाली. मी थोडा उशीर म्हणून एकटाच निघालो, रिक्षावाले जायला तयार होईनात, एक मिळाली, पकडली. एक सुंदर तरुणी शेजारीच उभी होती, म्हणाली "शाल आय ड्रॉप यु? आय वोन्ट गेट ऑटॉ अर्ली" तिच्या सौंदर्यापुढे माझं काय चालणार होतं? ;) नकळत हो म्हणालो. गप्पा सुरु झाल्या, पोरगी वन नाईट स्टँड वाली होती, चांगली शिक्षित, नोकरी करणारी. पण आमच्या अनामिकेत नुकतीच विराजमान झालेली अंगठी (पक्षी: कुलुप).

चॉकलेट फज् : Chocolate Fudge

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी मंगळवार, 17/05/2011 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
रेशमी..जिभेवर वेल्वेटी फील देणारं ...चॉकलेट फज्! सोप्पं आहे. पण कधी वड्या पडतील याचा परफेक्ट अंदाज यावा लागेल. साहित्य : कंडेन्स्ड मिल्क : १ टिन कूकिंग चॉकोलेट : २०० ग्रॅम्स साखर १०० ग्रॅम्स लोणी : ५० ग्रॅम्स थोडी पिठीसाखर (emergency quick-fix) कृती : ट्रे ला तूप / बटर लाऊन घ्या. सगळं एकत्र करुन नॉन्-स्टिक कढईत घ्या. सतत हलवत रहा. कडेनी सुटायला लागल्यावर / गोळा व्हायला लागल्यावर ट्रे मध्ये ओता. साधारण थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा.

वसंत काव्य मालेत पुष्प गुंफायला निमंत्रण....

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 17/05/2011 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, वसंत बहरला पानोपानी । लाली धरली गुलमोहरांनी ।। कंठ आला कोकिळेला । रुंजलेकवि शब्द गंधाला ।। कविराजांनो अणि राणींनो, आपले वसंत काव्यमालेच्या निमित्ताने काव्यकुसुम कट्टयाकरिता स्वागतम्.... आपणास वसंत काव्य मालेत पुष्प गुंफायला निमंत्रण - Beer आपण फक्त इतकेच करायचे आहे - जसे जमेल तसे, काव्य निर्मित करा - जेणे करून आपला परिचय त्यात

सिनामन रोल्स (cinnamon rolls) ....

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी मंगळवार, 17/05/2011 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त तोंडावर आलेला वीकेंड ..मस्त मोट्ठा मग भरून स्ट्रॉंग चहा आणि हे दोन अप्रतिम cinnamon rolls! दालचीनीचा मस्त अरोमा..गरम गरम चहा.. नक्की काय कशाला compliment करतंय हे सांगणं मुश्किल! आणि आगामी दोन दिवस सुट्टी..... सू sssssssss ख... बाकी चहाचं तुम्ही बघा!

गृहिणीच "सोप्प "लाईफ

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 17/05/2011 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
गृहिणीच "सोप्प "लाईफ
सकाळ झाली गजर वाजला, निवांत झोपलेला जीव माझा दचकून उठला , वाटल होत आज जरास उठाव उशिरा ,नवऱ्याच फर्मान होऊन जाऊदे आज बदाम शिरा , बेल एकदाच वाजवायची असते हे दुधवाल्याला कळत नाही , दार उघडेपर्यंत त्याच बेलवरच बोट ढळत नाही,
छोट्या सोन्याला उठवायची रोजची आहे कसरत झोपेत असतो तरी नेम धरून लाथा मारतो , त्याला उठवायची नाही होत लवकर हिम्मत सकाळच्या या गोंधळात छोटी छकुलीही उठते माझ्याकडे इवले हात पसरत मम्मा मला घे न ,घे ना, करत माझ्यामागे फिरते , दोन चार दात तिच्या तोंडात तरी ब्रश करण्याची तिला घाई