Skip to main content

टू जी

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 06/06/2011 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज-काल मला तुझी 'करुणा' वाटायला लागली आहे... टूजीचा अमंगळ गजर आता पाठलाग करायला लागला आहे... उगाच वोट्स मागायला, कितींदा रे येतोस? डीबीच्या रीआलिटी शो मध्ये बलवा मात्र 'शहीद' होऊन जातो बोलयचं असतं मला, बरच काही नजर सांगून जाते, मिडीयासमोर येताच, का मग माझी कणी मोळी होऊन जाते? 'दया' उरली नाही उरली 'करुणा'ही नाही एअर सेलच्या हवाबंद डब्यात पुरेसा 'निधी' जमला नाही बंधू- भगीनी नकोत मला, भ्रष्टाचारात रमतो मी... म्हणूनच देशप्रेमाच्या भावना स्वस्तातच विकल्यात मी! घोटाळ्यात गुंतून जाण्याचा माझा स्वभाव नाही.. अडकलोच जरी मी सुटण्यास प्रतीबंध नाही
काव्यरस

'६ जून'.... भारतीय प्रमाणवेळ सायं. ५:२१ ३८८ वा राज्याभिषेक दिन.

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 06/06/2011 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज खर्‍या खुर्‍या जाणत्या राजाचा 'राज्याभिषेक दिन' .......................... .......................... .......................... मनात आहे ना? बस्स झालं. काय मंडळी? नाहीतरी नुसता जयजयकार करुन काय उपयोग म्हणा?

राजाच्याजवळी अधिकार कसले...

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 06/06/2011 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
राजाच्याजवळी अधिकार कसले आहे चमत्कारिक देई ठेऊन ते कुठे अजून हे नाही कुणा ठाऊक त्याचा बडगा चालतो न कधीही आहे मुका वाटते शक्ती येई न त्यास हो कधि तरी राष्ट्र कसे चालते? देशातून कल्लोळ आज उठला राजा पाहतो जरी मंत्र्यावर राज्य टाकून निजतसे रात्री बिछान्यावरी बारा भानगडी अश्या सतत हो तो हाक ये नेमकी राजा गोंधळ माजला चहूकडे आता तरी उठ कि 'अम्मा'ची करण्यात जम्मत तसे शिबूसवे भांडता जाई संपुनिया टर्महि मुळी पत्ता कधि लागता राजाने परतून राज्य बघुनी मांडे मनी भाजले डाव्यांवीण असले तरीही फसले चोहीकडे आदळे चर्चेच्या अगदी भरात गढूनी शत्रू घुसे अंगणी दे केव्हा हुलकावणी न समजे राजा परी आतुनी सां

पाचशेची वॉटर बॉटल!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 06/06/2011 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुलगी स्कूलमध्ये जाणार म्हणून आम्ही शालापूर्व शॉपींग करायला गेलो होतो. युनिफॉर्म, सैक वगैरे खरेदी केल्यावर वॉटर बॉटलचं नाव निघालं. आमच्या सौ. दुकानदाराला ठसक्यात म्हणाल्या- 'एकदम भारीपैकी बॉटल दाखवा बघा, किमान वर्षभर तरी गळायला नको. गेल्यावर्षी आठवड्यातच झाकण ढिल्लं पडलं होतं.' त्यानं हसून एकदम ठेवणीतली वॉटरबॉटल काढली. म्हणाला- 'बेस्ट अॅटम आहे हा. अशी बॉटल हिच्या वर्गातल्या कुणाकडेच नसेल बघा. चांगली दोन तीन वर्ष जाईल. अहो स्टेफी ग्राफ वापरायची असल्या बॉटल्स. त्याच कंपनीची आहे ही, आणि विशेष म्हणजे गरम पाणी आठ तासापर्यँत गरमच राहतं, थंडपाणी थंडच राहतं.

आई गं! काय ती जळजळ!

लेखक खादाड अमिता यांनी सोमवार, 06/06/2011 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
जळ-जळणे, आम्लपित्त, घश्याशी येणे, अ‍ॅसीडीटी मुळे पोटात/छातीत दुखणे- काही वर्षांपूर्वी ही लक्षणं फक्त पन्नाशीच्या पुढच्या व्यक्तींमध्ये आढळून येत होती. पण गेल्या काही वर्षात दिवसंदिवस तरुण वयोगटात पण अ‍ॅसीडीटी चा विकार वाढत चाललाय. असं अचानक कसं झालं? हे अचानक झालेलं नसून बऱ्याच वर्षांपासूनच्या खाण्या पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलून टाकल्यामुळे झालंय. शाळेत असे पर्यंत रोज दिवस भरात ६ वेळा खाणारी मुलं, कॉलेजला गेल्यावर फक्त चहा/कॉफी, पफ/पॅटीस व इतर जंक फूड आणि वरचेवर बाहेरचं अन्न खायला लागली. स्लिम फिगर च्या नादात तरुण मुलींनी 'ताटभर जेवण म्हणजे विष' असल्यासारखे त्याचा बहिष्कार केला.

दिसभर उन्हातान्हात

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 06/06/2011 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
दिसभर उन्हातान्हात
दिसभर उन्हातान्हात तोड केली जंगलाची बाभळीचा काटा रुतला धार काढली रक्ताची जीव जगवला खावून कोरडी भाकरी चटणी तहान भागवाया आहे ओढ्याचे पाणी साता महिन्यांची घरधनीन पोटूशी तिला कसं आनू संगती? ती तर पोटाने उपाशी मोळी वाळल्या लाकडांची जाईल का विकून? तेल मिठ मिरची आणायाला पैसं मिळलं का त्यातून? - पाषाणभेद (दगडफोड्या) ०६/०६/२०११

अवलिया

लेखक निल्या१ यांनी सोमवार, 06/06/2011 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रॅंक पापा या माणसाची माझी पहिली गाठ झाली ती ऑफिस मध्ये. बरेच दिवस आमच्या टीम मध्ये एक कॉन्ट्रॅक्टर येणार येणार अशी चर्चा रंगत होती आणि एक दिवस माझ्या शेजारच्या क्यूबवर पाटी लागली. फ्रॅंक पापा. नाव वाचून थोडं हसू आलं. मनात म्हटलं बघुया किती दिवस टिकतो? कॉन्ट्रॅक्टर आला की सगळे आधी संशयाच्या नजरेनेच पाहतात. बरेच देसी कॉन्ट्रॅक्टर्स नवीन प्रोजेक्ट्वर थोडं दबकत दबकतच काम सुरु करतात. हे प्रकरण जरा निराळंच दिसलं. दुस-याच दिवशी सकाळपासूनच बाजुच्या क्यूब मधून फोनवर विविध संभाषणे आणि गंभीर चर्चा ऐकायला यायल्या लागल्या.