मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला काय त्याचे, मला काय त्याचे

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मला काय त्याचे, मला काय त्याचे
लोकलमध्ये मला मिळाली सिट खिडकीमधून हवा येते निट एक अपंग उभा आहे मला काय त्याचे, मला काय त्याचे ||१|| वरणभात, शिकरण केले आज जेवन मस्त झाले दुसरा गरीब उपाशी का असेना! मला काय त्याचे, मला काय त्याचे ||२|| भाज्याधान्य महाग झाले मी मात्र खरेदी केले शेतकरी आत्महत्या करीनात का! मला काय त्याचे, मला काय त्याचे ||३|| "कार ट्रक च्या अपघातात सहा ठार" "देवीच्या यात्रेत बोकडबळी फार" बातम्या नेहमीच्याच झाल्यात मला काय त्याचे, मला काय त्याचे ||४|| आज सिनेमॅक्सचा चित्रपटाला जायचे आहे सोबतीला दोन मित्रमैत्रीणी आहेत पुस्तकप्रदर्शनाला मग कोणी ना का जाईना! मला काय त्याचे, मला काय त्याचे ||५|| गुंडमवाली रस्त्याने चेन-पोत खेचतात अतिरेकीही खोटे नाव घेवून भाड्याने राहतात शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चालले समजत नाही मला काय त्याचे, मला काय त्याचे ||६|| खासदार आमदार निवडून येतात जातात भ्रष्टाचार, गरीबी, मागासलेपणा सारे प्रश्न तेथेच राहतात आपण आपली इलेक्शनची सुटी एंजॉय करूया मला काय त्याचे, मला काय त्याचे ||७|| पत्रीका जुळवून लग्न लावू, नाडीग्रंथ बघून भविष्य पाहू वास्तुशात्राने घरात बदल करू, फेंगशूईचा हॅपीमॅन आणू विज्ञानाने जग पुढे चालले तरीही मला काय त्याचे, मला काय त्याचे ||८|| ऐका तुम्ही सारे जन, करा तुमचे एकाग्र मन डोळे तुमचे उघडे ठेवा, बुद्धीनेच काम करा पाषाणभेद जीव फोडून बोलला भले होवो सर्वांचे, भले होवो सर्वांचे ||९|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २४/०२/२०११

वाचने 1475 वाचनखूण प्रतिक्रिया 2