Skip to main content

भ्रष्टाचार ...काँग्रेस.... विरोधी पक्ष ....जनलोकपाल

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 25/08/2011 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा हजारेंच्या आंदोलनाबाबत आजवर न झालेली गोष्ट म्हणजे त्यांच्या उपोषणाचा विरोधी पक्षाना नेहमीप्रमाणे मुद्दाच करता आलेला नाही. केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे भाजप आणि मित्र मंडळ. मात्र अण्णांनी जे जनलोकपाल विधेयक मागितले आहे त्याबद्दल हा पक्ष सुरवातीला उत्सुक दिसला मात्र कुठे माशी शिंकली कोण जाणे अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे भाजपने अण्णांच्या आंदोलनाबाबत एकदम सावध भूमिका घ्यायला सुरवात केली. एरवी काँग्रेसप्रणीत भ्रष्टाचाराबद्दल घणाघाती भाषणे करणारे नेते देखील अण्णांच्या आंदोलनाबद्दल काहीच भाष्य करीत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे भाजपला खरेतर या आंदोलनाचा पूरेपूर लाभ उठवता आला असता.

ए.फ.सी.सौ

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 25/08/2011 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
ए.एम.सी हा एक पैलू दुसर्‍या पैलूचे काय? सहज रावांनी मिसेस पिग ला एस. ओ. डब्ल्यु हा शब्द सुचवला. पण लक्षणे सांगितली नाहीत. ही ए. फ.सी.सौ. नेमकी कशी ओळखावी. ही नेमकी काय करते? ज्यामुळे ही बिरुदावली बहाल होते. ए.एम.सी.पि. प्रमाणे ही बिरुदावली मामी,बहीण, आत्या, काकी, मैत्रीण बॉस ह्यांना पण लागते का? मला फारसा अनुभव नाही. पण मला नाही म्हणजे असे काहीही नसते का? कुणी तरी निट उलगडुन सांगा बघु.

अण्णांचे आंदोलन - आत्मपरीक्षणाची संधी

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 25/08/2011 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपले पुढारी नेहमीच कुंपणावर बसून एखाद्या फांदीवरच्या बिलंदर माकडाप्रमाणे उड्या मारत असतात. जिकडे तुकडा दिसला तिकडे उडी टाकयची आणि तुकडा फस्त केला की तिथून सटकून पुन्हा फांदीवर (कुंपणावर) येऊन अधाशीपणे आपली शेपटी हलवत ठेवायची ही आपल्या पुढार्‍यांची खूप जुनी खोड आहे. बाळासाहेंबांनी अण्णांना 'वाकड्या तोंडाचा गांधी' म्हटले होते.

उधाण

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 25/08/2011 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
फुलतात प्रीतवेडे; प्राजक्त भावनांचे नातेच गोतवेडे; आसक्त श्रावणाचे आतूर श्वास भोळा; वारा उरी धपापे आकाश भारओले; रानी मयूर नाचे संकेत हा कशाचा ? ओळीत शब्दकोडे ! संवाद वा स्वरांचा ? हृदयास गीत छेडे !! गेले सरून जे जे; सारे उधाण त्याचे अंगण भरून भारे; कोरीव चंदनाचे ........................अज्ञात
काव्यरस

सौंदर्यनगरीतील कलावैभव: शिल्पकला

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 25/08/2011 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
(या धाग्याचे स्वरूप शिल्पकलेविषयी माहितीपूर्ण, तौलनिक, समिक्षात्मक लेखनप्रपंच असे नसून निखळ रसग्रहणात्मक आहे). पॅरिसमध्ये भ्रमण करताना ठायी ठायी सौदर्यदेवता कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रसिकांना दर्शन देतच असते...

श्री गणेशासाठी कमलाकृती आसन

लेखक मीनल यांनी गुरुवार, 25/08/2011 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
श्री गणेश चतुर्थी आता आठ-दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. उत्सवाचे वारे कित्येक दिवस आधिच वाहू लागले आहेत. आषाढच्या सरींत आणि श्रावणाच्या शिडकाव्यात चिंब होऊन हिरवीगच्च झालेली सर्व सृष्टी श्री गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहते आहे. तिथेच पिवळ्या, पांढ-या रानफुलांनी जणू फेर धरला आहे. विविध रंगी तेरडा माती मातीच्या कणातून तरारून आला आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा पिढ्यानपिढ्या जोपासण्यात आलेल्या कोकणातील प्रत्येक देवघरची रंगरंगोटी आता संपली आहे. गणपतीच्या आसनाच्या मागच्या भिंतीवर निसर्गचित्रे, देवांची चित्रे रंगवून झाली आहेत.

बाळासाहेबासुध्दा आपली पोळी भाजायला सरसावलेत आता!

लेखक भाकरी यांनी गुरुवार, 25/08/2011 02:29 या दिवशी प्रकाशित केले.
बाळासाहेबानी अण्णाना पत्र पाठवलं आहे. त्यातला थोडा मजकूर (मटा मधून) पहा - -----------------आपणांस आठवत असेलच , ४ ऑक्टोबर १९९६ रोजी आपण मला मातोश्री या निवासस्थानी भेटलात. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आपल्या दोघांत चर्चाही झाली. तेव्हाही सर्व थरांत व्यापून राहिलेला भ्रष्टाचार मोडून काढण्याचे वचन मी आपणास दिले होते आणि आपणही त्यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाला होतात की , शिवसेनाप्रमुख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी भ्रष्टाचार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही. आम्ही समन्वयाने एकत्र काम करू. मग यश निश्तितच !

माहिती हवी आहे. - ह्युस्ट्न.. टेक्सास..

लेखक प्रशु यांनी बुधवार, 24/08/2011 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
कामा निम्मीत्त अमेरीकेत ह्युस्ट्न (टेक्सास) येथे जाणे आहे. वेळ मिळाल्यास तेथिल काहि आसपासची ठिकाणे पाहण्याचा विचार आहे. तरी तेथील मीपाकरांनी ह्याबाबत क्रुपा करुन मार्गदर्शन करावे..