मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उधाण

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
फुलतात प्रीतवेडे; प्राजक्त भावनांचे नातेच गोतवेडे; आसक्त श्रावणाचे आतूर श्वास भोळा; वारा उरी धपापे आकाश भारओले; रानी मयूर नाचे संकेत हा कशाचा ? ओळीत शब्दकोडे ! संवाद वा स्वरांचा ? हृदयास गीत छेडे !! गेले सरून जे जे; सारे उधाण त्याचे अंगण भरून भारे; कोरीव चंदनाचे ........................अज्ञात

वाचने 1310 वाचनखूण प्रतिक्रिया 4

मिसळलेला काव्यप्रेमी 25/08/2011 - 11:44
मस्त! मस्त!! मस्तच!! गेले सरून जे जे; सारे उधाण त्याचे अंगण भरून भारे; कोरीव चंदनाचे क्या बात! क्या बात!!

गणेशा 25/08/2011 - 15:55
संकेत हा कशाचा ? ओळीत शब्दकोडे ! संवाद वा स्वरांचा ? हृदयास गीत छेडे !! गेले सरून जे जे; सारे उधाण त्याचे अंगण भरून भारे; कोरीव चंदनाचे अप्रतिम