Skip to main content

एक महाभयंकर जात

लेखक रोमना यांनी शुक्रवार, 26/08/2011 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक महाभयंकर जात खरे पाहता, "जात" हा शब्द दर्शवितॊ ते वर्गीकरण. जसे की सजीवांमध्ये - प्राणी, पक्षी, माणूस, वनस्पती वगैरे. यामध्येही अनेक पोट जाती असू शकतात जसे की, शिकार करणारे प्राणी, शाकाहारी वगैरे. माणसाने हि आपापल्या जाती बनविल्या. माणसाच्या जाती मुख्यत: त्याचे स्थळ, तो करतॊ ते काम, त्यानुसार रहाणीमान दर्शविण्यासाठीच होता. पण या जातीचा चुकिचा अर्थ ज्यांनी पसरविला, वाढवला व पॊसला ती एक महाभयंकर जात आहे.

जनलोकपाल आल्यानंतर तुम्ही कोणाविरुद्ध पहिली तक्रार कराल?

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 26/08/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
(चर्चेसाठी आज समजुया की) लोकांच्या प्रचंड पाठींब्यापुढे काहिहि न चालल्याने या (नाकर्त्या, षंढ, माकड वगैरे वगैरे राजकीय पुढार्‍यांनी) जनलोकपाल जसेच्या तसे संमत केले आहे. मला उत्सुकता आहे की जनलोकपाल (अगदी जसेच्या तसे) आल्यानंतर सामान्य जन कसे वागतील आणि या कायद्याचा उपयोग करुन घेतील? चर्चेच्या आधारासाठी काहि नोंदी इथे देत आहे १. जनलोकपालविधेयकातही केवळ केंद्रीय कर्मचारी समाविष्ट आहेत २. तक्रार करतेवेळी इतपत पुरावा हवा की प्रथमदर्शनी लोकपाल संस्थेला गुन्ह्यात तथ्य वाटले पाहिजे ३. राज्यस्तरावरील तक्रार लोकायुक्ताकडे करता येईल (मात्र त्याला शिक्षा करण्याचे अधिकार नाहित).

मिपावर उठवळ मोर्चा (स्लटवॉक)

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 26/08/2011 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू... आता तुम्ही मला विचाराल, की उठवळ मोर्चा म्हणजे नक्की काय? तर उठवळ मोर्चा हे स्लटवॉकचं मराठी भाषांतर आहे. कॅनडा का कुठल्याशा देशात एका पोलिस अधिकाऱ्यांने बायकांना सांगितलं की 'तुम्हाला जर बलात्कार करून घ्यायचा नसेल तर हे असले उठवळ बायकांसारखे उत्तान कपडे घालणं थांबवा'. त्यावरून बायका खवळल्या. एक तर पुरुष प्रधान संस्कृतीत पददलित म्हणून रहायचं. वर वेळोवेळी पुरुष बलात्कार करतात.

मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 26/08/2011 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
मोटरसायकलः बजाज बॉक्सर मॉडेल २००० चे, १०० cc बर्‍याच दिवसापासून माझ्या मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज) काढायची होती. काल वेळ मिळाला म्हणून गॅरेजमध्ये गेलो. पेट्रोलचे कंटेनर घेतले अन गॅरेजवाल्याला सांगितले की मीच गाडी घेवून अ‍ॅव्हरेज तपासून बघतो. पहिल्यांदा कार्बोरेटरमधले पेट्रोल संपवण्यासाठी पेट्रोल कॉक बंद केला अन एखाद्या कि.मी. पर्यंत गाडी बंद झाली. आयटीआय सिग्नलच्या समोरच काही ट्रॅफीक हवालदार गाड्या अडवत होते. सरळ त्यांच्यासमोरच गाडी बंद झाली. मी गाडी स्टँडला लावली. कंटेनरची नळी इनलेट ला जोडली. पेट्रोल टँक मधून १०० ml पेट्रोल कंटेनर मध्ये काढले मिटरचे रिडींग ५२६.१ घेतले.

स्वप्नांचा मागोवा

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 26/08/2011 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचा मागोवा घेत मी निघालोय प्रवासाला ती सत्यात उतरवण्यासाठी. .. मोठं व्हायचंय मला अंधारावर मात करता येईल विचार आहेत डोक्यात बघू या, काय होतंय छोटासाच कंदील हातात योजने योजने दुरचा प्रवास दोनच पावलं दिसतात पण, ती पुढे टाकली कि रस्ता येतो आवाक्यात जवळची पुंजी थोडी त्यावरही करीन मात कष्ट करुन अजून मिळवीन आहे तेवढी ताकद मनगटात फिरताना जगाच्या बाजारात अनुभव खूप मिळेल काय चालते, चालंत नाही जागेवरतीच कळेल फुकटाच्या घबाडाचं मला काय पडलंय अनुभवाच्या शिदोरीतच माझं नशीब दडलंय
Taxonomy upgrade extras

अंगरक्षक

लेखक अभिजीत राजवाडे यांनी शुक्रवार, 26/08/2011 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
२१ ऑगस्ट रोजी न्यु यॉर्क मधे एक भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त एक मिरवणुक काढली होती. त्यात हे सद-गृहस्थ पं. जसराज, गुलशन ग्रोव्हर आणि राणि मुखर्जी यांच्या सुरक्षेचे काम पहात होते. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. फक्त सोने नाही घातले. Bodyguard

बुखारीचे विखारी निखारे!

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 25/08/2011 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.dawn.com/2011/08/22/top-indian-cleric-warns-muslims-off-anna… नुकतेच जामा मशिदीच्या इमामाने अण्णा हजारेविरुद्ध गरळ ओकले. त्यातला राजकीय भागही विचार करण्यासारखा आहे. अण्णांनी मुस्लिमांकरता काही केले नाही असा ह्या माणसाचा कांगावा आहे. पण अजून एक विकृत मुद्दा म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी काही लोकांनी "वंदे मातरम" च्या घोषणा दिल्या म्हणून मुस्लिमांनी ह्या आंदोलनापासून दूर रहावे असा सल्ला हजरतसाहेबांनी दिला आहे. काही तुरळक मुस्लिमांनी ह्या विचारांना विरोध केला आहे खरा.

प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 25/08/2011 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३
              समाज जसजसा पुढे जातो तसतशी नैतिकता आणि भ्रष्टाचाराची परिमाणे बदलत जाणे अपरिहार्य असते. कालची अनैतिकता ही आजची नैतिकता व कालचा असंस्कृतपणा हा आजचा संस्कृतपणा ठरत असतो. आजीबाईला नातीच्या ड्रेसमध्ये असंस्कृतपणा दिसणे किंवा देवाला दिलेले दान यात लाचलुचपतखोरी न आढळणे, ही मानसिकता याच वाहत्या काळाच्या वाहत्या बदलातून आलेली असते.

ज न नी हि ता य (प्रकरण १ ते २५)

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी गुरुवार, 25/08/2011 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
महिलांच्या आरोग्यविषयक समस्या या विषयावर इंग्रजीत विपुल माहिती उपलब्ध आहे. परंतु या विषयी समग्र अशी माहिती मराठीत फारशी उपलब्ध नाही. मराठीत याविषयावर माझ्यासंग्रही असलेल्या लेखांपैकी सुरूवातीची २५ प्रकरणे ही किरण फॉन्ट वापरून टंकलिखीत केली असल्याने त्यातील मजकुर इथे थेट चिकटविता येत नाही. यास्तव पीडी फाईल्स बनवून त्या गुगल डॉक्स मध्ये लोड करून त्यांच्या लिंक्स इथे देत आहे. यापुढची प्रकरणांचे (प्रकरण क्रमांक २६ पासून) लेखन युनिकोड मध्ये करीत असल्याने ती पुढच्या भागात क्रमश: इथे थेट पद्धतीने प्रकाशित केली जातील. सध्या प्रकरण एक ते पंचवीस च्या लिंक्स देत आहेत.

आसवांची कोरीव लेणी (१३)

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 25/08/2011 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
आई .. मिटलेला श्वास.. (१-१२) - http://www.misalpav.com/node/17166 आई ... १३ : आसवांची कोरीव लेणी ढगभरल्या आसमंतात दाटलेली आठवण तुझी ओल्या नयनात उभी आसवांची कोरीव लेणी हृद्यावर उमटलेला तव विचारसण मेघकल्लोळात उमटे मायेचा हंबर शुभ्रधारा.. गंधवारा रोमांचीत देह सारा वलयांकित तेजोमय आई..
काव्यरस