Skip to main content

भाव ...

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 30/09/2011 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
उदय सप्रेंच्या कवितेकडून प्रेरणा मिळाली - "जगण्यास वाव नाही, मरणांस भाव नाही ..." असण्यास भाव नाही ... तुझ्या नसण्यास भाव आहे ... हसण्यास भाव नाही ... तुझ्या आसवांस भाव आहे ... नकळत वाहात आलास इथे, हे ओळखीचे गाव आहे ... बुडविले तुला जीवानिशी ... ती ओळखीची नाव आहे ... तू शोधतो ज्या सुखाला ... त्याचा कुणा ठाव आहे ... फसवू नकोस स्वताला ... इथे जगणेच साव आहे ... चढण्यास नवी शिखरे ... तू घालतो कुणावर घाव आहे ... वरच्या दरबारात मनुजा ... न रंक न कोणी राव आहे ... तू मोजतो आहेस वर्षे ... तुला जगण्याची हाव आहे ... इथे मरणास भाव नाही ... पण सरणास भाव आहे ... इथे सरणास भाव आहे ... - विश्वेश

लोकसंख्येच्या भस्मासुरावर उपाय : तिसरे मूल झाल्यास जेलमध्ये ? -

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 30/09/2011 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
केरळात तिसरे मूल झाल्यास तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. हा कायदा केरळातच नव्हे तर काश्मीर राज्य सहीत संपूर्ण भारतात कोणती ही सवलत न देत त्वरित लागू करावा... त्याच बरोबर जमीन माफियांनी आणि घरमालकांनी घरांचे जमिनीचे अवास्तव महत्व वाढवत जमिनीचा गुंतवणुकी साठी वापर करत जमिनीच्या किमती आकाशाला नेऊन ठेवल्यात. घरा करता कीती जागा वापरावी, एकाच्या नावावर कीती घरे असावी , मोकळे प्लॉट कीती असावे यावर कोणते ही कायद्याने बंधन नाही. या मुळे सामान्य जनतेस घरे मिळणे अवघड झाले.

नाड़ी पत्र वाचून झाल्यावर ....

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 30/09/2011 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, हरदासाची कथा मुळपदावर?.... ओकांचा धागा अन "नाडीग्रंथ" विषय आला नाही तर काहींना चुकल्यासारखे वाटून काहींना निराशा वाटली -वाढली...म्हटले गेले म्हणून नाडीचा 'डोस' ... नाडी विषयाचे गांभिर्य मुद्दाम कमी करायसाठी झटणाऱ्यांनी हे लेखन वाचले नाही तरी चालेल. एका धाग्यावरील माहिती विचारताना म्हटले गेले. १) प्रश्न - नाड़ी पत्र वाचून झाल्यावर त्या पत्राचे काय केले जाते ? उत्तर - ती नाडीग्रंथाची ताडपट्टी परत त्याच ताडपट्ट्यांच्या बंडलात गुंडाळून ठेवली जाते. यावर असे का? असा प्रश्न उपस्थित होतो.

एडीएफ, व्हीओआर, आयएलएस...

लेखक गवि यांनी शुक्रवार, 30/09/2011 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
विमान उडवताना दिशा कशी शोधायची आणि न्येमकं जिथे पोचायचं तिथे पोचायचं कसं? याचं उत्तर म्हणून एअर नॅव्हिगेशन हा विषय काढण्यात आलाय. मी माझ्या बायकोच्या दिग्दर्शनाशिवाय मंडईपासून घरी येऊ शकत नाही असं माझं दिशाज्ञान आहे. तेव्हा आकाशातल्या पोकळीत दिशा ओळखण्याविषयी काय अवस्था असेल ते सांगायलाच नको. हा विषय मी शिकायला लागलो तेव्हा जाम भंजाळलो होतो. सगळं डोक्यावरुन जात होतं. डोळ्यासमोर अनेक तबकड्या आणि त्यांचे काटे गरागरा फिरायचे.

अण्णांचे उपोषणास्त्र

लेखक विश्वास कल्याणकर यांनी शुक्रवार, 30/09/2011 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांची उपेक्षा आणि उपहास करणार्‍यात काही संसद सदस्य, तथाकथित विचारवंत आणि काही पत्रकारही होते. या सर्वांनी एकमुखाने 'अण्णा संसदेची प्रतिष्ठा आणि घटनेचे पावित्र्य धोक्यात आणित आहेत' अशि हकाटी सुरु केली. आंदोलनकर्त्यां ला बसल्या जागीच निष्प्रभ करणारे हे एक ठेवणीतले अस्त्र आहे आणि मोठ्या कुटीलतेने त्याचा उपयोग केला गेला. मागील दहा दिवस एक इतिहास घडतांना पाहिला त्या बद्दल आपण स्वतःला भाग्यशाली समजायला हवं. अण्णा हजारे यांनी गांधीजींच्या अहिंसक मार्गाने ही शांततामय क्रांती घडवून आणली याची नोंद इतिहासात पक्की झाली आहे.

....नाही !

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 30/09/2011 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
....नाही जगण्यास वाव नाही , मरणांस भाव नाही आम्ही भणंग सारे, आम्हां उठाव नाही ! ओथंबली कितीक पडद्यात आसवांच्या ही खुसखुशीत दु:खे यांना झराव नाही ! वणव्यांत आठवांच्या उरलो न मीच माझा तुझिया मनांत माझा तरिही पडाव नाही ! फुलतो अजून येथे हा मोगरा टपोरा केसांत माळण्याचा.....उरला सराव नाही ! ------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे, (१३ सप्टेंबर २०११)-----

एक तो अन एक ती ...

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 30/09/2011 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी शोधतो आहे एक तो अन एक ती ... बर्याच वर्षांपूर्वी ह्या इथेच दिसायचे ते दिलखुलास एकत्र रडायचे अन हसायचे ते ... न चुकता पहिल्या पावसात भिजायचे ते ... गर्दीतहि स्वतापुरते वेगळे असायचे ते ...

वार्धक्याला शाप असतो जगण्याचा ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 30/09/2011 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
हळूहळू दिवस संपून जातात तारुण्याचे नि अलगद येतात दिवस वार्धक्याचे जात नाहीत दिवस ठाम थांबून राहतात बंद पडलेल्या घड्याळासारखे ...!!
काव्यरस

राष्ट्रसंघातील पंतप्रधानांचे भाषण अहितकारक?

लेखक इष्टुर फाकडा यांनी गुरुवार, 29/09/2011 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
हा सकाळ मध्ये आलेला लेख जरूर वाचा, जसाच्या तसा इथे पेस्ट करत आहे....लेखकाचे नाव आणि जालिय - पत्ता लेखाच्या खाली दिलेला आहे. आपल्या पंतप्रधानांचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दिलेले भाषण भारताच्या दीर्घकालीन हितांना पोषक आहे काय? कित्येक ठिकाणी एकाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने तोंड उघडण्यापेक्षा ते बंद ठेवणेच त्या देशाच्या दीर्घकालीन हिताचे असते.

अन्ताजीची बखर

लेखक अनिवासि यांनी गुरुवार, 29/09/2011 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच नन्दा खरे लि़खीत 'अन्ताजीची बखर' हे पुस्तक वाचले. आता पुढील भाग 'बखर अन्तकाळ्ची' हे वाचत आहे, मराठी इतीहासाचा एक नवा चेहरा पहावयास मिळाला. इतर कोणी मिपाकरानी वाचले असल्यास प्रतिसाद वाचायला आवडतील.