Skip to main content

धर्म - अर्थ - काम - मोक्ष हे पुरुषार्थ, बद्ध - मुमुक्षु - साधक - सिद्ध, या अवस्था आणि अष्टांगयोग

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 02/10/2011 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म - अर्थ - काम - मोक्ष हे पुरुषार्थ, बद्ध - मुमुक्षु - साधक - सिद्ध, या अवस्था आणि अष्टांगयोग रोजनिश्यांमधील आठवणी वाचताना जाणवलं, की अरे, आपण किती उत्साही, धडपड्ये होतो, भविष्याची यत्किंचीतही कल्पना नसताना जेंव्हा जे जे समोर येत गेलं, सुचत गेलं, ते ते करत गेलो, यातून काहीतरी हिताचं असं घडतच गेलं, आणि आज बहुतांश कौटुंबिक जबाबदारया संपून आपण आता वाटेल ते करायला - आपल्या विशिष्ट मर्यादांमध्ये का होईना, स्वतंत्र आहोत... ...

झोपेत दात खाणे

लेखक कोदरकर यांनी रविवार, 02/10/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुले झोपेत दात खातात. याचे कारण व आयुर्वेदीक उपाय आहेत काय ?

नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही !

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 02/10/2011 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही ! .. कुठलीही नवी जुनी गोष्ट सांगायची तर परवा ठरलेला असतो, पण ही कालची, परवाची , तेर्वा ,एरवाची आणि येणार्‍या उद्या , परवाची पण आहे पण गोष्ट आहे असो अहो कालचीच गोष्ट स्टेशनवर उतरलो तर समस्त स्त्री वर्ग छान पैकी हिरव्या रंगांत न्हाउन गेला होता. सगळ्या बायका , मुलीनी छान पैकी हिरवा रंगाच्या ठेवणितल्या साड्या घातल्या होत्या. ज्याना पूर्ण पणे ह्या रंगाचे पारंपरिक कपडे घालायचे नव्हते त्यानी जीन्स आणि हिरवे टॉप घातले होते. थोडा वेळ एकदम छान वाटल. पुढे रिक्शेच्या रांगेत पुढे मागे हिरवाच रंग होता.

संध्या छाया

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 01/10/2011 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९७५ - आम्ही माझ्या एका ज्येष्ठ आप्तांकडे आग्र्याला गेलो होतो, त्यांचे नाव डॉ.कुंटे. पूर्वी राजाकी मंडी या भागात त्यांचा दवाखाना होता आणि त्याच भागात ते रहात असत. एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होतीच, शिवाय समाजकार्य आणि देशसेवा यातही त्यांचा महत्वाचा सहभाग असल्यामुळे त्या भागातील आबालवृध्द त्यांना ओळखत होते. पुढे त्यांचा मुलगा राजा डॉक्टर बनला आणि हळूहळू त्याचा जम बसत गेला. त्यांच्या दवाखान्याखेरीज इतर काही नर्सिंग होम्स, हॉस्पिटल्स वगैरेंमध्ये तो जात असे. राजाकीमंडीमधील जुने घर सोडून ते कुटुंब आग्रा शहराच्या बाहेर दयालबाग रोडवरील नव्या बंगल्यात रहायला आले.

गाथा, खरेच इंद्रायणीत तरंगली ?

लेखक शरद यांनी शनिवार, 01/10/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
गाथा तरंगली का? परवा आमच्याकडे शरदबोवा आले. हे शरदबोवा कोण असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का ? सांगतो. हे थापा मारतात ; पण अगदी बेमालूम ( हे प्रमाणपत्र मॅडम प्रियाली यांनी दिले आहे तेव्हा ते खरे आहे असे आपण धरून चालू. ) त्यांच्या थापा अगदी विश्वासार्ह वाटतात. आल्यावर त्यांनी एकदम विचारले " काहो, तुकारामांची गाथा इन्द्रायणीतून वर आली, यावर तुमचा विश्वास आहे की नाही ? " मी काही उत्तर देण्याआधीच ते म्हणाले ' घाई करू नका. तुम्हाला पुरावाच देतो " त्यांनी त्यांच्या पोतडीतून काही कागद काढले व म्हणाले " परवा देहूला गेलो होतो, तेथे बूवांची अस्सल गाथा सापडली आहे. त्यातले दोन अभंग मला मिळाले आहेत.

दगडाची गोष्ट

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 01/10/2011 03:42 या दिवशी प्रकाशित केले.
दगडाची गोष्ट
(सदरची कविता शिक्षकांनी अंगविक्षेपासहीत विद्यार्थ्यांच्या पुढे सादर केली तर परिणामकारक होते.)
प्रास्ताविक: निट बसा सगळे लक्ष द्या इकडे एक गोष्ट सांगतो लक्ष द्या तिकडे आरंभ: एक खेडेगाव असते तिथे एक नदी वाहते विषयविवेचन: त्या नदीत असतो एक दगड मोठ्या दगडांसारखाच छोटा दगड इतर दगड खुष असत हा मात्र असतो सतत रडत नायकाचे आत्मकथन: "मी काही कामाचा नाही कोणाच्या उपयोगाचा नाही देव करण्याइतका मोठा नाही वाळूत मावण्यासारखा छोटाही नाही कु
काव्यरस

धाग्यांच्या भस्मासुरावर उपाय : (एका आठवड्यात) तिसरा धागा प्रकाशित केल्यास लेखनबंदी!

लेखक पांथस्थ यांनी शुक्रवार, 30/09/2011 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - लोकसंख्येच्या भस्मासुरावर उपाय : तिसरे मूल झाल्यास जेलमध्ये ? ----- मिपावर सात दिवसाच्या आत तिसरा धागा प्रकाशित केला (दोन्/तीन्/चार कितीही ओळींचा) तर नसबंदीची आपलं हे लेखनबंदीची शस्त्रक्रिया कारवाई सुनावण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे.

मिथ्या-शास्त्रे - न्या. होम्सचा गमतीदार परिच्छेद

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 30/09/2011 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
ऑलिव्हर वेंडेल होम्स हा १९०२-१९३२ सालापर्यंत यू.एस. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात व्यायाधीश होता. बिंदूगामी पण गमतीदार लिखाण हा त्याचा हातखंडा होता. त्याचा हा परिच्छेद नुकताच वाचला, तो मजेदार आणि मननीय वाटला :
- - - - - मिथ्या-शास्त्रांबाबत (Pseudo-science) -
मित्रांनो, सुरुवातीला मी तुम्हाला मिथ्या-शास्त्राची व्याख्या देतो. मिथ्या-शास्त्रांत स्वतःचे खास शब्द (nomenclature) असलेले तंत्र असते.

काही रेखाचित्रे

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 30/09/2011 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणी आगाशीला (विरारला) रहायचो, आमच्या शाळेजवळ. शाळेत दिवाळीत 'रंगायन' ह्या एका ग्रुपकडुन रांगोळी प्रदर्शन भरवले जायचे. रंगायनची सगळी मंडळी माझ्या आजुबाजुलाच रहाणारी. त्यांच्यात चालणार्‍या चावट गप्पागोष्टींमुळे आणि वात्रटपणाच्या बालसुलभ आकर्षणामुळे बर्‍याचवेळा रात्री रात्रभर त्यांच्यात बसायचो. नकळत त्यांची कला बघायची संधी मिळायची. एके दिवशी काय वाटले काय माहित त्यांच्याप्रमाणे एका चित्रावर ग्रिड काढुन पेन्सिल स्केच बनवले. मग झपाटल्याप्रमाणे 1-2 महिने कहीबाही रेखाटत गेलो.