लेखनप्रकार
अण्णांची उपेक्षा आणि उपहास करणार्यात काही संसद सदस्य, तथाकथित विचारवंत आणि काही पत्रकारही होते. या सर्वांनी एकमुखाने 'अण्णा संसदेची प्रतिष्ठा आणि घटनेचे पावित्र्य धोक्यात आणित आहेत' अशि हकाटी सुरु केली. आंदोलनकर्त्यां ला बसल्या जागीच निष्प्रभ करणारे हे एक ठेवणीतले अस्त्र आहे आणि मोठ्या कुटीलतेने त्याचा उपयोग केला गेला.
मागील दहा दिवस एक इतिहास घडतांना पाहिला त्या बद्दल आपण स्वतःला भाग्यशाली समजायला हवं. अण्णा हजारे यांनी गांधीजींच्या अहिंसक मार्गाने ही शांततामय क्रांती घडवून आणली याची नोंद इतिहासात पक्की झाली आहे. ईशान्य भारतातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले आणि भ्रष्टाचार विरोधी जनाअंदोलन खर्या अर्थाने राष्ट्रव्यापी आंदोलन झाल्याची प्रचिती आली.
आंदोलनाच्या ९ व्या दिवशी गुवाहाटीतील कलाकार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आपल्या कलेच्या माध्यमातुन आणि हस्ताक्षर मोहिमेद्वारे त्यांनी आंदोलन अधिक गतिमान केले. मणिपूर ची "आयर्न लेडी" म्हटल्या जाणार्या, सलग १० वर्षे "आफस्पा" कायद्याविरोधात उपोषण करणार्या ईरॉम शर्मिला चानू यांनी रामलीला मैदानावर आपला प्रतिनिधी पाठविला. अण्णा हजारे याच्या 'कोअर ग्रूप" मधील कार्यकर्ते अखिल गोगाई, यांना पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन करतांना अटक झाली. इटानगर, शिलाँग, दिमापूर, कोहिमा, इम्फाळ इत्यादी शहरात विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. या प्रतिसादावरुन पूर्वोत्तर भारतातील नागरिकही भ्रष्टाचारामुळे किती त्रस्त झाले आहेत याची कल्पना यावी.
जनतेच्या मनात घुमसत असलेल्या या असंतोषाची आणि संतापाची किंचीतही दखल सत्ताधारी सदस्यांनी काय किंवा विरोधी सदस्यांनी काय, आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात, घेतली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच या सर्वांच्या विरोधात जाऊन भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा शंखनाद अण्णांना करावा लागला.
गेल्या प्रामुख्याने २५-३० वर्षात याच संसद आणि घटनेच्या चौकटीत निवडुन आलेल्या लोकप्रतिनीधींनी काही अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. "आमची आर्थिक लफडी = कुलंगडि बाहेर काढायची असतील तर संसद आणि घटनेच्य चौकटीतच तसे तुम्हाला करता येईल. यासाठी तुम्हाला निवडुन यावे लागेल अन्यथा आम्ही कुणाला जवाब देण्यास बांधील नाही." या मस्तीत मश्गुल असणार्यांच्या बालेकिल्ल्याला अण्णांनी उपोषणास्त्राने खिंडार पाडले. याचे संपुर्ण श्रेय अण्णा हजारे यांनाच जाते. म्हणुनच "ठराविक संसदीय प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जनलोकपाल बिल संसदेत मांडता येणार नाही, ते घटनाबाह्य ठरेल " अशी काव-काव करणार्यांना आता हे बिल तुम्ही कोणत्या तोंडाम्ने संसदेत मांडीत आहात? आता घटनेचे पावित्र्य आणि संसदेची प्रतिष्ठा कुठे गेली?" असे प्रश्न विचारयला हवेत.
संसदीय लोकशाही ही व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांचे जगणे सुसह्य आणि त्याच्या इच्छा-आकांक्षाची पूर्तता करण्यासाठी आहे, हे जाणीवपूर्वक विसरुन वरील दोन्हि संस्थाभोवती पावित्र्याचे आणि प्रतिष्ठेचे वलय निर्माण करुन त्या आडुन अनिर्बंध भ्रष्टाचार केला गेला. याला राज्यस्तरावरील सत्ताधारी आणि नोकरशाही यांची साथ मिळाली आणि त्यात सामान्य माणूस नाडला गेला आहे याची पूर्ण जाणीव अण्णांना झाली आणि म्हणूनच सर्व राज्यांमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती करणे, नोकरशाही लोकायुक्ताच्या कक्षेत आणणे आणि नागरिकांची सनद कार्यवाहीत आणणे या आग्रहावर आण्णा ठाम आहेत.
"जन लोकपाल बिल पास झाले की सगळा भ्रष्टाचार संपेल काय? असा खवचट प्रश्न विचारणायांना अण्णांनी आपल्या कृतीनेच उत्तर दिले आहे हे चांगलेच झाले!
भ्रष्टाचार विषय हाताळतांना अण्णांनी किती मूलगामी विचार केला होता हेच यावरुन दिसुन येते. परिस्थितीचे योग्य आकलन, अचुक विश्लेषण , ठोस उपाययोजना आणि ठाम निर्धार यांच्या बळावर संसद आणि घटनेच्या पावित्र्याचा कांगावा करीत सत्तेभोवती भ्रष्टाचाराचं वेटोळं घालून बसलेल्यांना अण्णांनी पुरते उघडे पाडले आहे. परंतु यावर समाधान न मानता "भ्रष्टाचार करणार नाही आणि पाठीशीही घालणार नाही" हा निश्चय करुन तो प्रत्य़क्शात आणायला हवा आणि सदैव जागरुकही राहायला हवे.
-इशान्य वार्ता सप्टेंबर २०११ वरुन साभार.
मिसळपाव
छान लेख (अवांतर : 'अण्णा
In reply to छान लेख (अवांतर : 'अण्णा by मराठी_माणूस
लेख आवडला
सहमत !
काय उत्तर मिळाले.
In reply to काय उत्तर मिळाले. by नितिन थत्ते
+१
In reply to काय उत्तर मिळाले. by नितिन थत्ते
उत्तर
खचितच हा मार्ग नव्हे
सरकार का झुकले
In reply to सरकार का झुकले by नेत्रेश
लढा पण सनदशीर मार्गांनी