Skip to main content

माझी कलाकारी !

लेखक चाफा यांनी शनिवार, 12/11/2011 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा माझ्या डोक्यात एखादं पिल्लू शिरलं ना! की मला गप्प बसवत नाही, आणि हे महान कार्य त्यादिवशी पार पाडलं ते घरात आणलेल्या कापसाने. त्याचं असं झालं की घरात वाती वळायला आणलेल्या कापसाभोवती एक अर्धवट टरकावलेला लेख होता तो मी वाचला. हो ! असलं पुडीवरचं साहीत्य वाचायची मला जुनी खोड आहे. तर, त्या लेखाचा मतितार्थ इतकाच की `प्रत्येकाने आपल्यातल्या सुप्त कलाकाराला वाव करुन दिलाच पाहीजे'. बस्सSS इथे माझ्या सदा उत्साही मेंदुने उचल खाल्ली, आणि मी माझ्यात दडलेल्या त्या सुप्त कलाकाराला शोधायला सुरुवात केली. सुरुवातीचाच ठेच लागल्यासारखा प्रकार झाला. काही केल्या मला माझ्यातले कलागुण आठवेनात !

या म्हणीचा उगम कसा झाला असावा?

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 11/11/2011 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत बर्‍याच म्हणी /वाक्प्रचार आहेत आहेत त्याना काही प्रसंग कारणी भूत आहेत. उदा:होता जीवा म्हणून वाचला शिवा / गड आला पण सिंह गेला / छातीचा कोट करणे / अमक्यातमक्याचा कात्रज करणे, ध चा मा करणे, अशा बर्‍याच म्हणी/वाक्प्रचाराना ऐतिहासीक संदर्भ आहेत. काथ्या कूटणे वगैरे वाक्प्रचाराना देखील ऐतीहासीक शिक्षेचा संदर्भ आहे. ,रण माजणे ,धराशायी होणे या वाक्प्रचाराला तर युद्धाचा संदर्भ आहे.आजीबाईचा बटवा याला त्यातील कोण्या एका आजीबाईने बटव्यात ठेवलेल्या औषधोपचारांची संदर्भ आहे. मात्र काही म्हणी/वाक्प्रचारांचे संदर्भ लागत नाहीत. उदा:आपले ठेवायचे झाकुन अन दुसर्‍याचे बघायचे वाकून" ही म्हण कश

चुकीचे हिशेब

लेखक यश पालकर यांनी शुक्रवार, 11/11/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी मांडले हिशेब नेहमी ते सारे चुकीचे होते ढाळले अश्रु ज्यांसमोर त्यांना हे नेहमीचे होते सोसले घाव सारे ते तर माझ्या ओळखीचे होते ना कळले सागर जे तळ तयांचे खोलीचे होते आर्त स्वर माझे हे कधीतरी तुझ्या अंगणीचे होते दुख कधी ना कळले कुणाला कारण सारे हे माझ्या मनीचे होते यशवंत

केक- अफलातुन

लेखक किचेन यांनी शुक्रवार, 11/11/2011 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
'एशिया कलिनरी चालेंजेस'२०११' मालादिव्स येथे झालेल्या स्पर्धेतील केक विभागातले काही उत्तम केक. या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराट्रीय शेफचा समावेश होता.

खोपा

लेखक जागु यांनी शुक्रवार, 11/11/2011 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
अर खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला तिचा पिलामंदी जीव जीव झाडाले टांगला खोपा म्हणजे सुगरणीचे घरटे दिसले की बहीणाबाई चौधरींच्या वरील पंक्ती आठवल्या शिवाय राहत नाहीत. खरच मानवी जीवनालाही किती सार्थक ओळी आहेत ह्या.

ती...........

लेखक लीलाधर यांनी शुक्रवार, 11/11/2011 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
ती..... ती आहे हलकी, ती आहे फुलकी, ती नाही परकी अन् ती नाही बोलकी, पण तरीही तीची आपल्यावर असते मात्र मालकी..... अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी हलकी फुलकी डुलकी.............. तुम्ही कुठेही असा तीचा हाच आहे वसा, कारण तीला लागत नाही व्हीसा, ती ठसवते तीचा आपल्यावर ठसा, अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी हलकी फुलकी डुलकी कारण ती नाही तुम्हा आम्हाला परकी........... एक डुलकी एक डुलकी, करते वेळ हलकी फुलकी एक डुलकी! (चालः एक झोका एक झोका चूके काळजाचा ठोका)

अफलातून केक्स

लेखक किचेन यांनी गुरुवार, 10/11/2011 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
'एशिया कलिनरी चालेंजेस'२०११' मालादिव्स येथे झालेल्या स्पर्धेतील केक विभागातले काही उत्तम केक. या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराट्रीय शेफचा समावेश होता. . वरील फोटो मधील गुलाबाची फुले खरी नसून ती क्रीमची आहेत. . .

चांदण्यात फिरतांना.....

लेखक विनीता देशपांडे यांनी गुरुवार, 10/11/2011 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यात फिरतांना........ १)अक्षरचांदण ती : इतक्या दूर आलास माझ्या अक्षरवेलीला धरुन, बघ माझ्या नभातलं लखलखणारं अक्षरचांदण. तो: या चांदण्यात न्हाहातांना डोळाभरुन पाहायच होत तुला. तू अनेक अक्षरांच टिपूर टिपलं असेल आजवर मी माझा टिपूर साठवतोय मनात-डोळ्यात-सार्‍या देहात. २) गुलाबी छटा ती: बघ या चांदण्या हळुहळु संधिप्रकाशात विरु लागल्या जणु काही त्याने चांदण्यांना गुलाबी मिठीत कोंडुन ठेवलय त्याची छटा सार्‍या आसमंतात विखुरली आहे.. तो: संधिप्रकाश चोरपावलांनी तुझा गोरा रंग चोरुन नेतोय आणि तू चांदण्यात भिजुन अंग निथळत बसलीस क्षितीजाच्या क

मारुती अल्टो -Petrol Verson

लेखक नितिनभालेराव यांनी गुरुवार, 10/11/2011 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्याकडे मारुती अल्टो -Petrol Verson आहे. मला ती Gas वर convert करायची आहे. CNG आणी LPG पैकी कुठला पर्याय चालेल. दोहो पैकी फायदेशीर आणी सुरक्षीत कुठला ? माहिती पाहिजे.