Skip to main content

दुखरी बाजू का खुपते?

लेखक आशु जोग यांनी रविवार, 13/11/2011 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख जरूर वाचावा http://tinyurl.com/lokanna लोकसत्तेने उगाचच नि:पक्षपणाचा आव आणून अण्णांच्या आंदोलनावर टीका सुरु केली होती जणू ए राजा, कनिमोळी, कलमाडी आणि टीम मनिमोहनचे सदस्य धुतल्या तांदळासारखे आहेत.

किंगफिशरचे भवितव्य काय?

लेखक अभिज्ञ यांनी रविवार, 13/11/2011 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
किंगफिशर या विमान वाहतुक कंपनीने बराचश्या महत्वाच्या मार्गावरील आपलि विमान वाहतुक सेवा स्थगित केली आहे. कंपनीची सध्याची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय असून प्रचंड कर्जाच्या विळख्यात अडकली आहे. माध्यमांच्या अनुसार सध्या किंगफिशर वर सुमारे ७००० कोटि रुपयांचे कर्ज आहे. अन भविष्यातही ते वाढत जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सध्या शेअरबाजारात ह्या स्क्रिप्टचा भाव सुमारे १९ ते २० रुपयाच्या आसपास आहे. व दिवसेंदिवस तो खाली घसरण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने काहि प्रश्न पडतात. १. ह्या कंपनीचे भविष्य काय असेल? २. किंगफिशर कंपनीला बेल आउट मिळायची शक्यता कितपत आहे? ३.

पार्ले जी बिस्कीट चॉकलेट केक

लेखक rupali.gaikwad11 यांनी रविवार, 13/11/2011 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एक जमा केलेल्या पाककृती मधिल एक पाककृती सापडली. पार्ले जी बिस्कीट चॉकलेट केकची. सुटटी होति म्हणुन करायची ठरवली. आई ने सगळे सामान आणुन दिले. तेव्हा बनवली. साहित्यः पार्ले जी बिस्कीटचा १०रु चा पुडा २ चमचे कोको पावडर १ १\२ कप दुध १\२ वाटी साखर ५ रु. चे ईनो (साधा) पाकिट कृती : प्रथम बिस्कीटचा मिक्सर मधे बारीक चुरा करुन घ्या. त्यात साखर आणि कोको पावडर घाला. या मधे दुध घालुन सरबरीत भिजवा. Baking tray ला आतुन तुप लावून घ्या. वरील batter मधे इनो घालुन फेटुन घ्या. आता हे batter Baking tray मध्ये ओतुन बेक करा.

मोक्ष कुणाला हवाय?

लेखक रविंद्र गायकवाड यांनी रविवार, 13/11/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
कोण तू वाचलं... आणि अनेक दिवस मनाच्या कोपर्‍यात राहून गेलेला प्रश्न पुन्हा डोक्यात थैमान घालतोय.. मी म्हणजे सुक्ष्म किंवा स्थूल देह नाही. म्हणजे कर्ता किंवा भोक्ताही नाही. मन बुद्धी चित्त अहंकार याहूनही मी वेगळा आहे. म्हणजेच मला सुख दुख:ची बाधाही नाही. मला जन्म बाल्य अस्तित्व यौवन वर्धन मृत्यूही नाही. मग जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ??? सु़ख दु़खः कर्म भोग मन बुद्धी चित्त अहंकार स्थूल देहाबरोबरच नष्ट होतात. मग मोक्षाची गरज कुणाला आहे?

ग्रहण-५ अन्तिम

लेखक स्पा यांनी शनिवार, 12/11/2011 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रहण-१ ग्रहण-२ ग्रहण-३ ग्रहण-४ -------------------------------------------------------------------------------------------------- अप्पा जोशी गाडी कोर्टाच्या आवारात घेतली आणि माळरानावर प्रचंड वीज कोसळली.तुफान पावसाला सुरुवात झाली होती.

रॉक्स्टार - एक तरल प्रेमकथा....

लेखक अनुरोध यांनी शनिवार, 12/11/2011 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
हा हा हा.... माहितेये किती जण याची आटुरतेने वाट पाहत होते की कधी हा चित्रपट येतो आणि मी बघतो पण आज या पामरला हे नशीब लाभले तर.... आधुनीक काळासोबत नवीन नवीन प्रेमकथा मांडनयतजर कोणाचा एथे हातखंडा असेल तर तो एथे मान्यच करावा लागेल की तो एम्तियाज भाईच. सोचा ना था, जब वी मेट, लव आज कल आणि आता रॉक्स्टार असे एका वर एक काळासोबत कीवा कालातीत सिनेमे हा देतोय. आता माझ्या या बोलण्याला काही लोकांचा आक्षेप असेल ज्याना हा सिनेमा(रॅदर हे सिनेमे आवडले) आवडणार नाहीत. तर कॉलेज मध्ये जाणारा आणि संगीतवर मनापासून प्रेमकरणारा, जिमी मॉरिसन ने प्रभावित असलेला तरुण जनार्दन जाखड उर्फ जे.जे.

साई -

लेखक विदेश यांनी शनिवार, 12/11/2011 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
सोन्याचा मुकुट हिऱ्यांचा हार सोन्याच्या पादुका रत्नजडित सिंहासन सोन्याचे मखर सर्वांच्या डोळ्यांत ठसले त्या सोनेरी धामधुमीपासून दूर - - - - कोपऱ्यातल्या एका गरीबाच्या मिटलेल्या डोळ्यांतून ओघळणारे ... मोती ... फक्त साईलाच दिसले ; आणि (सोन्यापेक्षा सामान्यांवर माया जडलेले -) साई उदासपणे स्वत:शीच हसले !
काव्यरस

देवळातला देव भिकारी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 12/11/2011 02:51 या दिवशी प्रकाशित केले.
देवळातला देव भिकारी
नकाच मजला अर्पू कोणी गंध, अक्षदा, फुले, माळा नका मजला शेंदूर फासू नकाच द्या कळसा झळाळा कोण कोठला देव मज समजले उगाच येवूनी रांगा लावूनी पाया पडण्या, हार वाहण्या व्यापार्‍याची वस्तू करूनी देवळात मज कोंबले व्यर्थ फुकाचा नमस्कार करता अन्नछत्रात जेवूनी भरल्या पोटी लाडू प्रसाद खाता न लागणारे नोटा दागीने मुकूट सोनेरी का मजला देता ? पापपुण्याचा खोटा हिशेब मांडता? नकाच मजला तेथे भेटू चालू असते माझी मुशाफिरी धनाचे नच लालूच मजला वृत्ती माझी आहे फकीरी देवळातला देव भिकारी - पाषाणभेद १२/११/२०११