Skip to main content

<<<<आज बसावे उद्या बसावे >>>

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 24/12/2011 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल : http://www.misalpav.com/node/20177 (सोनलताईंची माफी मागुन ) आज बसावे उद्या बसावे दोन थेंब सांडुन देणे डोक्यामध्यल्या शॉटालाही सोडुन द्यावे जमवुन प्यावे दोन पेयपांनांच्या मधले अंतर आहे केवळ झुरत राहणे कसे कळावे खुळ्या जगाला सांजकाळीचे बहकुन येणे ग्लास मद्याचे असेच ताटवे त्यात बुडावे दिसावे काजवे.. ओठांवरचे शब्द गरिबडे श्वासागणती बरळत जाणे सिगारेटीचे वलय खेळावे नको मेंदुशी फाटे फोडणे तंदुरीचे चिकन घेउनी संध्या काळी आपले बसणे
काव्यरस

अश्रू

लेखक मयुरपिंपळे यांनी शुक्रवार, 23/12/2011 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
अश्रू मधूनं पुसावे मनाचा ओलावा स्वप्नात का करावा आप्त क्षणाचा कालवा ! रात्र ही सुधा झाली परकी दिवस ही झाला पोरका ! काही काळ ही यात्रा थांबते एकटीच जीवनप्रवास हा फक्त एक क्षणभराचा ! -- मयुर

आरक्षणाचे धोरणात बदल

लेखक सदानंद ठाकूर यांनी शुक्रवार, 23/12/2011 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज देशात शिक्षण व रोजगार या क्षेत्रात मागासलेल्या समाजातील तसेच आर्थीकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण दिले जाते. या आरक्षण देण्याला विरोध असण्याचे कारण नाही. ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे किंवा ज्याना न्याय मिळालेला नाही त्यांचेसाठी आर्थीक व सामाजीकदृष्ट्या पुढारलेल्या लोकांना थोडा त्याग करावा लागला तर अजीबात विरोध असू नये. मात्र आता ज्या पध्दतीने आरक्षणाचा लाभ घेतला जात आहे व त्यामुळे होणा-या परिणामांचा विचार करता या धोरणात काही बदल करणे आवश्यक आहे असे वाटते. सध्या वस्तुस्थिती अशी आहे कि, समजा अ हि व्यक्ती मागासलेल्या समाजातील आहे व त्यायोगे त्याला एखादा चांगला रोजगार मिळाला.

दर्शनेच्छा बलियसि!

लेखक हरिकथा यांनी शुक्रवार, 23/12/2011 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
वृन्दावनातल्या राधा-मदनमोहन मंदिराजवळच एक आंधळे बाबाजी राहायचे. त्यांचं नाव, गाव कुणालाच माहिती नव्हतं. बहुतांशी दिवसभर त्यांचं वास्तव्य वृन्दावनाजवळच्या 'मदनटेर' या जागी असायचं म्हणून लोकं त्यांना 'मदनटेरवाले बाबा' अशीच हाक मारायचे. हे बाबा काही जन्मान्ध नव्हते. पण त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुपात होत असायचा. दिवसभर ते मदनटेरच्या घनदाट झाडीमध्ये बसून राधा-कृष्णांच्या लीलांचे स्मरण करत रडायचे. राधा-कृष्णाच्या विरहात त्यांचं अविरत अश्रुविसर्जन सुरू असायचं.

तुला जमावे मला जमावे

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी शुक्रवार, 23/12/2011 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुला जमावे मला जमावे त्रास जीवाचे सोडून देणे डोळ्यामधल्या पाण्यालाही जमून जावे वाहून जाणे दोन मनांच्या मधले अंतर आहे केवळ टोचत राहणे कसे कळावे खुळ्या मनाला निवडुंगाचे बहरून येणे भास जगाचे खासच फसवे त्यात जडावे दुर्धर रुसवे.. ओठांवरचे शब्द गरिबडे श्वासागणती खडतर होणे आठवणींचे गुलाब हळवे नको उशाशी काटे जपणे निर्माल्याचे प्राक्तन घेउनी जन्मा यावे आपले जगणे
काव्यरस

फजिती !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 22/12/2011 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
फजिती ! ३१ डिसेंबरला कुठल्यातरी एका मित्राच्या घरी जमून नव्या वर्षाचे स्वागत करायचे हे आमच्या मित्रमंडळाचे ठरलेलेच. आम्ही नऊ मित्र म्हणजे अगदी जवळचे आणि एकामेकांची टिंगल टवाळी हीही नित्याचीच. हसायला कोणाला आवडत नाही ? त्यात एखाद्याची फजिती झाली तर मग काही विचारू नका आणि ती जर ठरवून केली असेल मग तर काही विचारलायलाच नको. आम्ही सगळे यात माहीर होतो. माणसाची प्रवृत्तीच आहे ना ती. अगदी केळ्याच्या सालीवरून एखादा माणूस घसरून पडला आणि जखमी झाला तरी बघणार्‍याची पहिली प्रतिक्रिया ही फिदीफिदी हसण्याचीच असते. मी व माझे मित्रही याला अपवाद कसे असतील ?

घे बाबाच्या कुशीत सोन्या..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 22/12/2011 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी कविता समुहाच्या 'लिहा प्रसंगावर गीत' या उपक्रमासाठी मझा सहभाग... बाबाची अंगाई पापण्यांवर नीज येऊन जडावले डोळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे धावधावतो बाबा जणू की पायाला भिंगरी शिणतो, धडपड करतो येण्या लवकर माघारी व्याकुळते मन बाल्य स्मरुनी होते बघना खुळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे बाबालाही आस सतावे तुझ्याच बोलांची चिऊ-काऊची गोष्ट बोबडी लाख मोलांची समजुत काढू कशी तुझी मी मलाच हे ना कळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे घरट्यामध्ये पक्षी निजले रात खूप झाली चांदोमामा झोपी गेला त्याच्या मेघ महाली नीज माझ्या राजा आता थांबव ना चाळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवां
काव्यरस

समीकरणे

लेखक यश पालकर यांनी गुरुवार, 22/12/2011 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
सोडवत आहे एकरेषीय समीकरणे प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष स्थापिला बिंदू स्वःतचा सोबतिला जरी असतिल अनेक बिंदूमधील अंतरे नात्याची काही जवळ तर काही दूरची निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे सुखदु:खाच्या अक्षांना छेदीत बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे कधी पुढे-मागे कधी वरती-खालती असेच करता करता सुटतील समीकरणे उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती यशवंत