Skip to main content

<<<<आज बसावे उद्या बसावे >>>

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 24/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल : http://www.misalpav.com/node/20177 (सोनलताईंची माफी मागुन ) आज बसावे उद्या बसावे दोन थेंब सांडुन देणे डोक्यामध्यल्या शॉटालाही सोडुन द्यावे जमवुन प्यावे दोन पेयपांनांच्या मधले अंतर आहे केवळ झुरत राहणे कसे कळावे खुळ्या जगाला सांजकाळीचे बहकुन येणे ग्लास मद्याचे असेच ताटवे त्यात बुडावे दिसावे काजवे.. ओठांवरचे शब्द गरिबडे श्वासागणती बरळत जाणे सिगारेटीचे वलय खेळावे नको मेंदुशी फाटे फोडणे तंदुरीचे चिकन घेउनी संध्या काळी आपले बसणे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2624
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by नितिन थत्ते

हे घ्या !! प्रेरणा :: (आंद्याची कविता, कुठे खपलय काय माहीत ? ) http://misalpav.com/node/12472 उगवलेले पक्ष पसरलेले राजकारणी पाय ओढ आणि हिरव्या नोटांत बांधलेल्या भिंती युतीच्या जोड्या भगव्या हिरव्या लाल निळ्या भागवणारा तिढा सिंचन बांधकाम गृह पसारा जातीपातींच्या होड्या सडा .. मताधिक्याचा वेढा तिच्याच छातीवरचे दळभद्री वंदेमातरमचा एकच नारा .. अवांतर : या निमीत्ताने नितीनदां चा प्रतिसाद तर आला (आधी खराट्याने झाडला असे लिहीले होते) ;) @ ज्यो , जुन्या आठवणी ;)

"इयर एंड"चा ज्वर चढायला लागलेला दिसत आहे. :bigsmile: >>>संध्या काळी आपले बसणे कुठल्या संध्याकाळी येउ??? ;) ;-) :wink:

पण तू आता फक्त चहा पितोस ना?

पण विडंबनात दारू आल्याने आता गणेशाकाका तुला रागावणार. मग तुला दु:ख होणार. मग आपण ते दु:ख दारूत बुडवणार. वाह वाह !

ही कविता वाचुन असे मत नोंदवण्यात येते आहे की,कॉकटेल नीट जमले नसले तरी करंट जबरा बसला आहे... धण्यवाद ;-)