मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समीकरणे

यश पालकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सोडवत आहे एकरेषीय समीकरणे प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष स्थापिला बिंदू स्वःतचा सोबतिला जरी असतिल अनेक बिंदूमधील अंतरे नात्याची काही जवळ तर काही दूरची निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे सुखदु:खाच्या अक्षांना छेदीत बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे कधी पुढे-मागे कधी वरती-खालती असेच करता करता सुटतील समीकरणे उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती यशवंत

वाचने 1961 वाचनखूण प्रतिक्रिया 7

मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 12/22/2011 - 17:05
बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे कधी पुढे-मागे कधी वरती-खालती असेच करता करता सुटतील समीकरणे उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती
हे छान जमले आहे. पण कां कुणास ठाऊक, अपुरी वाटते ती कविता!!

यश पालकर गुरुवार, 12/22/2011 - 17:26
मलाही तसेच वाटले होते पुन्हा एकदा थोडा बदल करून सूचनेबद्दल धन्यवाद ... सोडवत आहे एकरेषीय समीकरणे प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष स्थापिला बिंदू स्वःतचा सोबतिला जरी असतिल अनेक बिंदूमधील अंतरे नात्याची काही जवळ तर काही दूरची निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे सुखदु:खाच्या अक्षांना छेदीत गवसतील तेव्हा रेषांना कधी कोन काटकोन त्रिकोण आणि बदलून जाईल नशीब मिळेल जेव्हा नवी दिशा नवा दृष्टीकोन बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे कधी पुढे-मागे कधी वरती-खालती असेच करता करता सुटतील समीकरणे उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती यशवंत

इंटरनेटस्नेही गुरुवार, 12/22/2011 - 18:32
सदर कविता वाचुन मी इयत्ता दुश्ली - अ वर्ग- आय. ई. एस. मराठी माध्यम शाळा, पवई येथे पुन्हा एकदा अ‍ॅडमिशन घेण्यासाठी चाललो आहे.