Skip to main content

भगवी वस्त्रे आणि राजकारणी

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 26/02/2012 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
भगव्या वस्त्राला आपल्याकडे एक वेगळे स्थान आहे. समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद हे भगवी वस्त्रे परिधान करीत. ज्याने सार्‍या भैतिक सुखांचा त्याग केला आहे अशांनीच भगवे कपडे घालावेत असा काही संकेत असावा. भारतीय राजकारणात वावरणार्‍या काही व्यक्तीदेखील भगवे कपडे वापरताना दिसतात. त्यामुळे जाणून घ्यावेसे वाटते भगवी वस्त्रे घालण्यासाठी काही नियम आहेत का ? कुणा अधिकारी गुरूने दिक्षा द्यावी लागते का ! भगवे कपडे घातल्यानंतर घरादाराचा त्याग करावा लागतो का ? भगवी वस्त्रे घालूनही घरातच राहिल्याने स्वतःवर काही वाइट परिणाम होतो का ?

कविता हवी आहे

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी शनिवार, 25/02/2012 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आमच्या बाळाशी खेळताना माझी आई त्याला अनेक छान छान कविता, गाणी म्हणून दाखवते. काल असंच कविता म्हणत बाळाशी खेळताना तिला लहानपणी शाळेत असलेली ग. ह. पाटीलांची "पाखरांची शाळा" ही कविता अर्धवट आठवली. इंटरनेटवर शोध घेतल्यावर इथे त्या कवितेच्या चार ओळी सापडल्या - पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करीती उतरते उन जाते टळूनी दूपार पारावर जसा यांचा भरतो बाजार संपूर्ण कविता मात्र मला सापडली नाही. मिपाकरांकडून ही कविता मिळण्यास नक्की मदत होईल असा विश्वास आहे.

माझे केकचे प्रयोग

लेखक Pearl यांनी शनिवार, 25/02/2012 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
महिन्या-दिडमहिन्यापूर्विची गोष्ट आहे ही. लेकीचा दुसरा वाढदिवस २-३ दिवसांवर आला होता. सगळी तयारी जवळजवळ झाली होती. वाढदिवस विकडे ला होता. आणि बर्थडे पार्टी विकेन्डला ठेवली होती. त्यामुळे विकडेला मोठं सेलेब्रेशन करायचं नसलं तरी तिला नविन ड्रेस घालणं, औक्षण करणं, जवळच्या २-३ बच्चे कंपनीला बोलावून केक कापणं असं करण्याचा प्लॅन होता. मनात असं खूप होतं की तिच्या वाढदिवसाला निदान छोट्या सेलेब्रेशनला केक आपणचं करायचा. पण इथं केक येतोय कुणाला. मग म्हटलं मॉलमधून केक मिक्स घेउन येऊ आणि करून टाकू केक. हा.का.ना.का. त्याप्रमाणं केक मिक्सचं पॅकेट आणलं.

INDIA UNBOUND

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 25/02/2012 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास आपण सगळेच शिकतो. इतिहासाची शालेय पुस्तके असो वा कोणा अभ्यासकाने कागदपत्रे मिळवून लिहीलेला राजकीय इतिहास असो, क्वचितच त्यातून सामान्य माणसाच्या आयुष्यावरचा परिणाम दिसतो. त्यामुळे इतिहासावरून एक सामान्य माणूस म्हणून काय शिकायचे असाच प्रश्न पडतो. संपूर्ण शाळेत आणि इतर अवांतर वाचनात भारताचा इतिहास मी वाचला. एक निसर्गसंपन्न, संस्कृतीचे पाळणाघर असलेला आणि तत्त्वज्ञानाचा गाभारा असलेला देश म्हणून भारताच्या उज्ज्वल भूतकाळाचा उदोउदो वाचला, इंग्रजांची तथाकथित जुलमी राजवट आणि त्याविरुद्ध दिलेला तेजस्वी लढा, मोठमोठे तत्त्वनिष्ठ नेते आणि क्रांतिकारक यांचे बलिदान हे सगळं वाचलं.

चाळीशी ……… गद्धे पंचविशी

लेखक यशोधन वर्तक यांनी शनिवार, 25/02/2012 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात अनेक वाढ दिवस साजरे झाले . चाळीशीत गेलेल्या सोबत्यांचे अभीनंदन सार्वजन मिळून करत आहेत.खरच चाळीशी झाली की आपला या जगाकडे बघायचा नजरियाच बदलतो नाही ! जन्माला आल्या पासून ते शाळेत जायला लागे पर्यंत आपण तसे सर्व दृष्टीने तसे परावलंबीच असतो. शाळेत जरा इतर मुलां मध्ये मिसळल्यावर आपल्याला थोडीशी मतांची शिंगे फुटायला लागतात . मैत्री भांडण राग लोभ अशी भावनांची आंदोलने याच वयात सुरु होतात ती अगदी कॉलेज मध्ये जाई पर्यंत पुरतात. साधारणतः शाळेत असताना आपले आयडॉल्स क्रिकेटपटू सैनिक , लेखक होते. चार्ली चाप्लीन , लॉरेल हार्डी , मिकी माउस , आपल्या आवडी होत्या .