Skip to main content

रात्र

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी शुक्रवार, 13/04/2012 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यातला चंद्र आणि मनातला अंधार घेऊन सत्याचे भास झेलत स्वप्नांच्या उंबरठ्यावर निद्रेची वाट बघत ताटकळत उभी होती रात्र माझा सुद्धा डोळा लागला नाही ती झोपेपर्यंत.
काव्यरस

एका चित्रकाराच्या आठवणी...

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 13/04/2012 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीच्या काही आठवणी : मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी : http://misalpav.com/node/18587 आमचे सक्सेना सर त्यांच्या तरुणपणी सहा महिने मांडूगडावर (मांडवचा किल्ला) जाउन राहिले होते, त्यांची त्याकाळची तिथली अद्भुत निसर्गचित्रे आजही मला आठवतात. ती बघून आम्ही तीन मित्रांनी मांडवला जायचे ठरवले. छप्पन मैलांचा प्रवास सायकलने सहज पार पडला. वाटेत खेडूत वा आदिवासींचे घोळके दिसले, की थांबून स्केचेस करायचो (सुमारे १९७० साली) रात्रीच्या सुमारास मांडव ला पोचल्यावर तिथल्या राम मंदिराच्या ओट्यावर झोपी गेलो....

सामान्य झालेल्या " असामान्य" गोष्टी.....

लेखक स्वप्नाळू यांनी शुक्रवार, 13/04/2012 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी अशा अनेक गोष्टी होत्या ज्या सहज मिळायच्या नाहीत आणि आता मात्र नाक्यानाक्यावर मिळतात. पण तो लहानपणी चा अनुभव खूप nostalgic करून जातो. तूम्ही पण अशा गोष्टी शेअर कराव्यात हि विनंती. १. लहानपणी अजोळी तुळजापूर ला गेल्यावर खूपदा " गारेगार खाल्ले होते. गारेगार म्हणजे बर्फाचा गोळा. एकतर तिथे प्रचंड उन असायचे, वीजेचा पत्ता नव्हता. उकाड्याने जीव हैराण व्हायचा. अशातच लांबून गारेगारच्या गाडीची घंटा वाजायची आणि "गारेगार" अशी आरोळी ऐकू यायची. मग आम्ही मावस आणि मामे भावंडे ग्लास घेऊन पळत सुटायचो. हो कारण एक थेंब पण जमिनीवर सांडणे म्हणजे पाप होते. एक रुपयात दिवसभरात ५-६ वेळा गारेगार खाउन व्हायचे.

अशात काय पाह्यलंत???

लेखक यकु यांनी शुक्रवार, 13/04/2012 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला नेहमी येता जाता कसलीतरी दृश्‍ये दिसतात आणि त्यातून काहीतरी मनात उमटतं. असल्या दृश्‍श्यांना, असल्या क्षणात घडून गेलेल्या किश्श्यांना नेहमीच काही विशेष अर्थ असतोच असे नाही. बस्स काहीतरी चटकन होऊन जातं आणि आपण तेवढ्‍यापुरतं आश्चर्य वाटून गप्प बसतो. त्याबद्दल कुठे बोलावं एवढं महत्त्व कदाचित त्या दृश्‍याला किंवा सहज घडून गेलेल्या किश्शाला कदाचित असत नाही. पण असली दृश्‍ये सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येत असतील हे नक्की. ती इथे कृपया सगळ्यांनी द्यावीत. ही दृश्‍ये बिनमहत्त्वाची असली तरी ती खरी असावीत, काल्पनिक नकोत.

खळ्ळकन्

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 13/04/2012 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
चार तुपात भिजलेल्या पुरणपोळ्या आणि चार कटाच्या आमटीच्या वाट्या रिचवून पलंगावर पडलो होतो. गुंगीची चादर हळू हळू चढत खिडकीतून येणार्‍या प्रकाशाला मंद करत चालली होती. सुस्तीच्या वजनाने जबडा उघडाच राहून लाळ गळायला आली असताना आणि बंद डोळ्यांसमोर लाल प्रकाशाचा एकच शेवटचा बिंदू उरला असताना खिडकीबाहेर कलकलाट झाला. पाण्याने भरलेला चंबू खळ्ळकन् फुटावा तसा सगळ्या झोपेचा चकणाचूर झाला. कोणाची माय व्याली, तिच्यायला..

एक भिजलेला चहा...!

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 13/04/2012 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
.......पाणी झरत चालले- आज आभाळ फाटले, पावसाला पावसाने -वर ढगांत गाठले, पाणी झरत चालले - उभ्या रानाला तहान, आता किलबिलत आहे, राना..... सौमित्र कुजबूजत होता... माझ्या जुन्या फिलिप्स च्या टेपरेकॉर्डर वर! बाहेर उन्हाची लाही- लाही होताना, "गारवा" अल्बमने नेहमीच साथ दिलेली... इतकी, की गेल्या २-३ वर्षांत कॅसेट घासून, सौमित्र दोन-दोनदा बोलतोय की काय, असा भास व्हावा!! रणजित देसाईंची 'अभोगी' कादंबरी वाचत होते, अगदी पालथी पडून, छानपैकी पाय हवेत हलवत! उन्हाचा त्रास मात्र खरेच सोसवेना, शेवटी उठून पंख्याचा रेग्यूलेटर खच्चून पिळला आणि जेव्हा लयीत डुलत त्याने '५' चा ताल धरला, तेव्हा कुठे हायसं वाटलं....

नरसोबाची वाडी व खिद्रापुर येथील पुरातन मंदिर-कोपेश्वर

लेखक विश्वास कल्याणकर यांनी शुक्रवार, 13/04/2012 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुचरित्रा बद्दल माहिती नाही अशी व्यक्ती कमीत कमी माझ्या पिढीची सापडणे म्हणजे अशक्य.गुरुचरित्राशी माझा परिचय झाला तो १९८० मध्ये मी होशियारपुरला(पंजाब) असतांना. तेंव्हापासुन मला नरसोबाची वाडी येथे जाण्याचे वेध लागले. मागिल वर्षी सांगली ला असतांना औदुंबर चा योग आला व वाडी ची संधी हुकली. मात्र यावेळी सांगली च्या मुक्कामात नरसोबाची वाडी ला जायचेच असे मनात होते. श्री शरदराव छत्रेंना हे सांगताच ते त्यांच्या नविन घेतलेल्या दुचाकीने दुसरे दिवशीचा कार्यक्रम आखुन तयार झाले. शरदराव हे सांगलीचेच असल्याने त्यांना येथील परिसराची माहिती आहेच पण उत्साही आहेत .