Skip to main content

संगीतप्रेमी मिपाकरांनो ,

लेखक चौकटराजा यांनी शुक्रवार, 04/05/2012 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व संगीतप्रेमी मिपाकरांसाठी एक मस्त कार्यक्रम होत आहे. पुणे परिसरातील मिपाकराना तर या कार्यक्रमाला जाणे सहज शक्य आहे. सादरकर्ते- श्री अमित वैद्य .( खास वेगळे अ‍ॅकॉर्डेयन वादक ) कार्यक्रमाचे नाव- अ‍ॅन इव्हनिंग विथ अ‍ॅकॉर्डेयन श्री वैद्य हे मेलडी व रिदम एकाच वेळी या वाद्यातून निर्माण करतात. त्यामुळे हे एक्सटेंडेड हारमोनियम वादन नाही. जुन्या जमान्यातील शंकर जय ओपी नय्यर, सी आर, एस डी यांची अजरामर गीते वेगळ्याच ढंगात ऐकायला मिळतील. या कार्यक्रमास पाहुणे म्हणून केर्सी लॉर्ड ( खास आर डी बरोबर काम केलेले ) आहेत.

समाजसेवा म्हणजे काय?

लेखक विकास यांनी गुरुवार, 03/05/2012 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्यासाठी घटनेतील नियमात लिहीलेल्या Literature, science, art and social service या चार पैकी, सचिन नक्की कशात बसतो ह्या चर्चेत खालील वाक्य होते:
सचिनने भारतासाठी उत्कृष्ट खेळ करून त्याच्या मनाने भारतीय समाजाची सेवाच केली नाही का? का सेवा करायची म्हणजे राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रच असले पाहिजे?
या वाक्यावरून वेगळा चर्चा प्रस्ताव टाकायचा मोह झाला. चर्चा सचिनबद्दल नसून तसेच त्या वाक्यासंदर्भात व्यक्तीगतही नसून, केवळ "समाजसेवा" नक्की कशाला म्हणावे या संदर्भात आहे.

शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी गुरुवार, 03/05/2012 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली. हे वाक्य वाचून आपल्यापैकी अनेकांच्या नजरा सहज दिनदर्शिकेकडे वळतील कारण जयंती नेमकी कधी होती याची कल्पनाही अनेकांना नसेल. शंकराचार्य म्हणजे हिंदूंचे धर्माचार्य, जगदगुरू! आद्यशंकराचार्यांनी तयार केलेली काही पिठं आहेत - बहुतेक चार! याशिवाय अनेक स्वयंनिर्मित पिठं आहेत. किती? माहिती नाही! सध्या हयात असलेल्या शंकराचार्यांपैकी कुणाचं नाव आठवेल का? तर कांची पीठाचे श्री जयेन्द्र सरस्वती! कारण? कसल्यातरी वादाच्या भोव-यात अडकले होते, ते हेच शंकराचार्य ना?

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 03/05/2012 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
मला ना, ही लहान मुले सिनेमात आली की काही प्रश्न हमखास पडतात. १. ती आता कधी हरवणार? (पूर्वी मुले जन्मल्या नंतर लगेच किंवा एक ७/८ वर्षांची झाली की हरवत असत.असे सिनेमे मोठी माणसे पाहत असत.नाही हरवली तर तो लहान मुलांचा सिनेमा असे समजून मोठी माणसे, लहान मुलांना तो सिनेमा बघायला परवानगी देत असत.) २. त्यांना आता कुठला रोग होणार? (ताप येणार, की ब्लड क्यान्सर?) ३. त्यांना आता कुठला अपघात होणार?(बोट बुडणार?की विमान अपघात? की गाडी उडवणार?

एक रस्ता असाही ...

लेखक निश यांनी गुरुवार, 03/05/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
एका गजबजलेल्या रस्त्यावर एक पोर भिक मागत आपल्याकडे, भुकेने व्याकु़ळ असुनही आपल्या नजरेतील हेटळणीचा विखार त्यालाही उमजतो व तो रडवेला होतो.

गडांवरील शिल्पे

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 03/05/2012 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
गडांवर भटकंती करत असता बरीच शिल्पे नजरेस पडत असतात. गडांच्या प्रवेशमार्गावर हनुमान, गणपतीच्या कोरीव मूर्ती आढळतात, तर प्रवेशद्वारांवर शरभ, गंडभेरूंड, व्याल, गज, कमळ आदी कोरलेले आढळतात. खुद्द गडमाथ्यावर काहीवेळा आगळ्यावेगळ्या मूर्ती आढळतात. मंदिरांचे काही अवषेश, काही स्थानिक गडदेवतांच्या मूर्ती, शिवलिंग इत्यादी तर पोर्तुगीज, ब्रिटिशांची सत्ता राहिलेल्या किल्ल्यांवर त्यांचे नाविक सामर्थ्याचे चिन्ह, जगावरील त्यांच्या स्वामित्वाची चिन्हे आढळतात. ह्या शिल्पाकृतींवर गडाचा काळ, त्याचे राज्यकर्ते, गडबांधणीची शैली इ. तपशील कळू शकतो. वास्तविक गडांवरील शिल्पे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय.

चित्रपटसृष्टीचे जनक कोण्??तोरणे कि फाळके?????????

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 03/05/2012 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
राजा हरिश्चंद्र’ या मूकपटाच्या आधी वर्षभर प्रदशिर्त झालेल्या ‘पुंडलिक’ या मूकपटाला पहिल्या भारतीय चित्रपटाचा बहुमान मिळावा.