Skip to main content

फार झोप येते राव.

लेखक वारा यांनी शनिवार, 14/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल फार झोप येते राव. ऑफीसात आल्यावरचे पहीले दोन अडीच तास कसे तरी जातात. मग लंच टाईमची वाट बघत बसाव लागत. ईतर लोक फोन वर बरच काहीतरी बोलत असतात. मार्केटींग वाले कस्ट्मर ना पिडुन पिडुन ऑर्डर ओढायचा प्रयत्न करतात. यांची पर्सेंटेजची गणित.......आग आई आई आई.......(जांभई)... रिकव्हरीवाले पेमेंट्साठी क्लायंटला पिडतात. सपोर्ट वाले सारखे साईट वर पळत असतात . साईट वर जाऊन काय करतात काय माहीत? .. बरच मटेरीयल पाठीवर असत त्यांच्या....अरे बापरे आज चहावाला जरा लेटच आलाय.... मॅनेजर ऑफीसात दोन तीन तासच येतो, चार पाच ईन्स्ट्रक्शन देतो , रिकव्हरी वाल्याला दोन चार शिव्या घालतो आणि गुजराती मधे काहीतरी बडबडत ब्लॅकबेरी कानाला लाउन गायब होतो. माझ्यासाठी आजही काहीच काम नाही, बर झाल एक दिवस अजुन पुढे. माझी सगळी काम करुन झालीत की माझ्या लायकीच काम कमी झालय, असो चला जेवायची वेळ झाली. काय काय दीलय आज बायकोनं? बटाट्यची भाजी, पोळी, लोणच, दही भात. वा वा वा... मस्त चाटुन पुसुन खाउ. आब्बब्ब वाईट. क्रमशः

वाचने 5284
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

ताss णss ली गेली आहे. लवकरात लवकर लिहा. पुभाप्र. तोपर्यंत एक निवांत डुलकी घ्यावी म्हणतो. :) (झोपाळू )- नरेश. हवांतर : तुमच्या ऑफिसमध्ये संगणक वापरण्यावर बंदी तर नाहीये ना? कारण लेखन फारच त्रोटक आणि घाईघाईने संपवल्यागत वाटतेय. :)

हायला! आत्ताच झोपून उठलो होतो. परत जाऊन झोपतो :)

मधुमेहाची चाचणी करून घ्या.

In reply to by सानिकास्वप्निल

सानिकातै डाराडूर ? तरी सांगत होतो, जास्त कॅलरीदार पदार्थ खात नको जाऊ म्हणून... ;)

मला वाटलं एखादी लावणी वगैरे आहे की काय, फार झोप येते राव मला मिठिमंदं घ्यावं घोड्यावर बसवावं मग समदे म्हणतील वाव जाउदे, वर सुहास म्हणतोय तसं करा, एखादा ए४ टाका म्यानेजरच्या तोंडावर मग बघा, ऑफिसातच काय घरी पण झोप येणार नाही .

In reply to by ५० फक्त

फार झोप येते राव मला मिठिमंदं घ्यावं घोड्यावर बसवावं मग समदे म्हणतील वाव ५० राव, यमक जुळले आहे पण अगदीच आव जाव घर तुम्हारा सारख वाट्ल.....

In reply to by सूड

काय रे सूड, नीट वाच की !! बटाट्यची भाजी + पोळी किंवा लोणच + दही भात असे नाही आहे ते. डब्ब्यात चक्क चार चार पदार्थ..... सपे कसे शक्य आहे ? ज्या शहरात राहता त्याबद्दलचा अभ्यास वाढवा ;-)

हापिसात झोप येणे हा बर्‍याच पुरुष मंडळींचा कॉमन प्रॉब्लेम असावा. ;) रात्री "जागरण- गोंधळ" करणे, दुपारी चमचमीत खाणे, कामाचा कंटाळा अशा बर्‍याच गोष्टी यामागे असू शकतात.. हापिसात नुसते झोपणारे नव्हे तर घोरणारे महाभाग पाहिले आहेत. बर्‍याचशा हापिसात स्त्रियांसाठी सुविधा उपलब्ध असते पण पुरुषांना बसल्या बसल्या खुर्चीतच/रिकाम्या मीटींग रुममधे किंवा टॉयलेट मधे बसून झोपता काढावी लगते असे निरिक्षण नोंदवतो आणि पुरुषांनादेखील (बहुतांश चायनीज कंपन्यांप्रमाणे) झोपण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी असे मत नोंदवतो ;)

आजकाल फार झोप येते राव
धै भात्,बटाटाची तळसावलेली भाजी खावून आणखी झोप येईल. त्यात बायका भाजी चवदार बनवण्यासाठी जास्त तेल ओततात.बायकोला सॅलड द्यायला सांगा. चिरलेला कोबी+शिजवलेली कडधान्ये,संत्रे/मोसंबे,टोमॅटो..... मग बघा कसे तर्तरीत व्हाल.

सर्वांची नस बरोबर पकड्ल्याबद्द्ल.........आमच्या हापिसात कामाचा दिवस भरणे म्ह्न्जे दोन पंच......एक लंच असे म्हनन्याची परंपरा निर्माण होत आहे. ए४ मारायचा होता..........पण खुद्द मॅनेजरच ए४ मारुन गेला......(अर्थात वेगळे कारण देउन......) हाय रे नसिबा........... पेपर टाकण्याच्या प्रतिक्षेत..........आ........आइ$$$$ग$$$$$....आ.......

वा वा वा..... आपल्या भावना बर्याच लोकांपर्यंत पोहोचलेल्या बघुन भडभडुन आलं.. समस्त प्रतिसाद कर्त्यांना धन्यवाद व पुढील लेखनाचा उत्साह वाढ्वुन झोपेतुन जाग केल्याबद्द्ल अनेक आभार. लवकरच लिहु..

हे एक बरे आहे की माझ्या हापिसात तुमच्या पैकी कुणी झोपाळू नाही ! लेखन छान.