उन्हाळा जसा वाढू लागतो तसे तसे जीवाची काहिली होत जाते. प्रत्येक क्षण जगणे अवघड होत जाते. उच्चवर्गियांसाठी वातानुकुलित यंत्रणा, थंड हवेची ठिकाणे इत्यादी पर्याय असतात, परंतु सर्वसामान्यासाठी मात्र उन्हाळा एक परिक्षाच घेऊन येत असतो.
माझ्या लहानपणी ( ३०/३५ वर्षापूर्वी) पंखा असणे ही सुद्धा चैनीची बाब समजली जात असे किंवा थोड्याश्या भर उन्हातून थोड्याश्या सावलीमध्ये गेल्यास सुध्दा उन्हाच्या झळयापासुन सहजपणे बचाव करता येत असे. आता वाहनाच्या अमर्याद वाढलेल्या संख्येमुळे अथवा वृक्ष / जंगल तोडीमुळी तापमान वाढतच चालले आहे. त्यासाठी काही छोट्याशा सूचना, शिफारशी इत्यादी.
१. पाण्याचा, त्यातही माठाच्या पाण्याचा वापर करणे. भरपूर पाणी पिणे.
२. उन्हाळ्यात आंबे, कलिंगड, खरबूज, जांभळी, करंवदी, काकड्या इत्यादी फळांचा वापर भरपूर करणे.
३. खूपच उकाडा होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याच्या भिजलेल्या कपड्यांने सर्वांग ओले पुसुन त्यानंतर कोरड्या रुमालाने पुसुन घेणे.
४. मी नागपूरला राहत असतांना हा प्रयोग करित असे. नागपूरला कुलर इत्यादींचा वापर करावाच लागतो. कुलरचा आवाज प्रचंड असतो. मला एकवेळ उकाडा सहन होतो परंतु आवाज / गोंगाट सहन होत नाही. मी रात्री झोपण्यापूर्वी ५/६ प्याले माठातील थंड पाणी पीत असे. त्यानंतर झोपतांना अक्षरशा पंखा अथवा कुलर न लावता झोपत असे. रात्री अगदी शांत झोप लागत असे.
५. रात्री झोपण्यापूर्वी खोली जमीनीवर पख्यांच्याखाली मध्ये एखाद्या जुन्या चादरीवर भरपूर पाणी टाकावे. रात्रभर खोली थंड राहते.
६. जमल्यास गच्चीवर अथवा अंगणात झोपावे.
७. घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात, शक्य असल्यास खिडक्यांना जाळी बसवावी.
८. सर्वसाधारण रात्री बाहेर बर्यापैकी थंड होत असते, परंतु खोलीतल्या चालू असलेल्या पंख्यामुळे बाहेरची हवा आत येत नाही. टेबल पंखा खिडकीच्या जवळ ठेवल्यास आणि बाहेरची हवा आतमध्ये घेतल्यास फायदा होतो.
९. बाहेर जातांना कान आणि कपाळ झाकून घ्यावे.
वरील गोष्टींचे पालन केल्यास उन्हाळा सुसह्य होईल अशी आशा वाटते.
वाचन संख्या
11685
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
थंडगार
+१००
In reply to थंडगार by कुंदन
कच्छी बिअर
In reply to +१०० by सोत्रि
नाचणीच्या ताकातल्या आंबीलीला
In reply to +१०० by सोत्रि
+१
In reply to थंडगार by कुंदन
आरं कुठं आहात.
६. जमल्यास गच्चीवर अथवा अंगणात झोपावे.
In reply to आरं कुठं आहात. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला कमाल आहे! =)) =)) =))
In reply to ६. जमल्यास गच्चीवर अथवा अंगणात झोपावे. by मोदक
द्विरुक्ती
In reply to ६. जमल्यास गच्चीवर अथवा अंगणात झोपावे. by मोदक
सुखी माणूस
In reply to ६. जमल्यास गच्चीवर अथवा अंगणात झोपावे. by मोदक
मी प्रॅक्टीकली विचार केला..
In reply to सुखी माणूस by रमताराम
सोबतच
शहाळे..
+१
In reply to शहाळे.. by प्रभाकर पेठकर
शीतली म्हणून एक योगक्रिया
(No subject)
उन्हासाठी
*अटी लागू
In reply to उन्हासाठी by इरसाल
इरसालराव, सध्या पुण्यात
In reply to उन्हासाठी by इरसाल
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र !!!!!!
In reply to इरसालराव, सध्या पुण्यात by पिंगू
हिल स्टेशन गाठावे बजेट
माझाही एक सल्ला
सध्या हाच उपाय करतोय... -
In reply to माझाही एक सल्ला by सर्वसाक्षी
+१
In reply to सध्या हाच उपाय करतोय... - by पिंगू
वा ! उन्हाच्या झळा बर्याच
फाऊल !!!
शोधेपर्यंत लिंक हजर !!
माठातल्या पाण्यात वाळा