अमानवीय-काही उत्तरे
काही उत्तरे या भागात मागील भाग http://www.misalpav.com/node/24838 तील काही प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न. यातुन भुत आणि मानवात स्नेह वाढुन एक दिवस हा स्नेह भारत-पाकिस्तान मैत्रीलाही मागे टाकेल याची खात्रीच आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
भुतांची सायकॉलॉजी थोड्याफार प्रमाणात माणसांसारखीच आहे. उदा. आपल्यात कोणी गल्ली चुकलं की लोक स्वत:हुन म्हणतील, "काय ब्वा, हिकडं कसं काय?" तसच भुतांमध्येपण आहे. आपण त्यांच्या एरीयात गेलो की आलेच ते आपली चौकशी करायला.
मिसळपाव