हिन्दू धर्म म्हणजे काय ?
मागच्या आठवड्यात श्री. विजुभौ च्या वारीच्या धाग्यासंदर्भात हा विषय आलेला होता पण सांगोपांग चर्चा झाली नाही. म्ह्णून तिथे टंकलेलेच इथे पुन्हा लिहित आहे. मिपाकर जरुरीप्रमाणे भर घालतील.
माझ्या मते खालील बाबी हिंदू धर्माची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील.
१. कर्माचा सिद्धांत
२. पुनर्जन्म
३. अन्तिम सत्य एकच आहे . ( GOD IS ONE and not GOD ARE ONE )
या प्रत्येक मुद्द्याचा ऊहापोह करता येईल पण तो अनेक्वेळा येथे झाला आहे. हे सारे मुद्दे परस्परपूरक आणि एकमेकांत कमालीचे गुंतलेले आहेत. या वरील तीन बाबींना केन्द्रीभूत ठेऊन उभी राहीलेली सर्वंकष जीवन पद्धती म्हणजे हिंदू जीवन पद्धती !
मिसळपाव
मरिन लाईन्स पुलापलिकडे समुद्रालगत थेट समुद्राकडे पाहणाऱ्या मरिन लाईन्स ते चर्चगेट मध्ये असलेल्या बहुतेक रहिवासी इमारतींमधे इन्टरकॉन्टिनेन्टल सहज सामावले होते. पुढची रांग साधारण ४०-६० वर्ष जुन्या ५-७ मजली इमारतींची तर मागे उंचच उंच व्यापारी इमारती.