Skip to main content

या भेटायला... अर्थात् मिपा कट्टा - फेब्रुवारी २०१३!

लेखक इनिगोय यांनी शनिवार, 26/01/2013 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
तमाम मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण.. भेटीचे. इथे खफ-खव-व्यनि-मधून मनसोक्त गफ्फा हाकल्यानंतर आता प्रतेक्क्श भेटीचा घाट घालत आहो. कट्ट्याचा (तुर्तास नक्की झालेला) तपशील असा.. दिवस :- रविवार ३ फेब्रुवारी २०१३ स्थळ :- चर्चगेट, मुंबई वेळ :- सकाळी ११ वाजता यावेळेस नेहमीप्रमाणे बैठा कट्टा न करता चर्चगेट-नरिमन पॉईंटचा फेरफटका आणि मग खादाडी असा जरा वेगळा बेत ठरवण्याची फर्माईश जुन्याजाणत्या मिपाकरांकडून झाली आहे, तद्वत यावेळचा कट्टा हा 'चालता-फिरता' असणार आहे. कट्ट्याला हजेरी लावू इच्छिणार्‍यांनी किसन शिंदे, विश्वनाथ मेहेंदळे आणि मला एकत्रित व्यनि करावा.. मुंबईस्थित आणि त्यावेळी मुंबईत असू शकणार्‍या समस्त मिपाकर मंडळीचं कट्ट्यावर स्वागत आहे, हेवेसांनल :) तर मंडळी, पुरेऽऽऽसे आधी कळवले असल्याने धमाल करायला जरूर या. भेटूच. .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26675
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

पुणेकर आपण कधी ??? पुन्यात कट्टा कधी असेल तर कळवा आवर्जुन हजेरी लावु.....

In reply to by सस्नेह

प्रवासाच्या वेळेत पोरांना सांभाळण होईल की. ;)

In reply to by सस्नेह

पन तुमच्या मुंबईत गाडी चालवायला गळ्याला फास लागतो की वो,मागच्या महिन्यात चर्नी रोडला एका लग्नाला निघालो पन सी एस टी ला पोहचलो...

च्यायला भारतात असतो तेंव्हा कट्टे भरवायला काय होते? आता जरा घरा बाहेर पडलो, तर लगेच कट्टे चालू झाले... मजा करा..

मुंबईकरांचा कट्टा क्या बात हे. रामदास काका जर टूर लीडर असतील तर फोर्ट व नरिमन पोइंत चा समग्र इतिहास मिपाकरांना समजून सांगतील. भटकंती करत रमतगमत कट्टा करण्याची कल्पना आवडली.

कट्ट्याला शुभेच्छा. (गेल्या साडेपाच वर्षात दोनच कट्ट्यांना हजेरी लावलेला) क्लिंटन

शुभेच्छा! फोटोसहीत वृतांत टाकायाला विसरू नका!

३ तारखेला येणं शक्य नाही पण कट्ट्याला शुभेच्छा! वृत्तांताच्या बाबतीत अर्धवटाचा आदर्श ठेवा ही विनंती. रामदास काका नक्की असतील तर जमल्यास व्हिडो काढून ठेवा. आणि वृत्तांत लिहायला विसरू नका!

In reply to by पैसा

३ तारखेला येणं शक्य नाही पण कट्ट्याला शुभेच्छा! वृत्तांताच्या बाबतीत अर्धवटाचा आदर्श ठेवा ही विनंती. रामदास काका नक्की असतील तर जमल्यास व्हिडो काढून ठेवा. आणि वृत्तांत लिहायला विसरू नका!
तंतोतंत!

In reply to by पैसा

३ तारखेला येणं शक्य नाही पण कट्ट्याला शुभेच्छा! वृत्तांताच्या बाबतीत अर्धवटाचा आदर्श ठेवा ही विनंती. रामदास काका नक्की असतील तर जमल्यास व्हिडो काढून ठेवा. आणि वृत्तांत लिहायला विसरू नका!
बाडीस!

In reply to by पैसा

नुसते सिएसटीचे नाही तर सिडनीतुन काढलेले सिएसटिचे, कसला भारी क्यामेरा घेतला आहे म्हाति का ?

In reply to by ५० फक्त

सारखी आठवण निघताना बघून स्वाक्षरीत खालील प्रमाणे बदल करावा की काय असा प्रश्न पडलाय. नवी स्वाक्षरी: आठवण तुझी सारखी निघे सदस्यांची पालखी रोज ओले मिपाचे चार डोळे.

यायला जमणार नाही तरीपण आम्हा पामरांना फटूसहित चोख वृत्तांताद्वारे कट्ट्याचा लाभ घडवा. कट्ट्याला शुभेच्छा

In reply to by जेनी...

अब्या ये कि , गुर्जि तुमीपण
आता तू एवढे प्रेमाने बोलावतेस तर यीवू की. ;) गुर्जी करा तयारी आता. उचलतो तुम्हाला पुण्यातून. :)

In reply to by अभ्या..

तु ये कि १४ ला बँड्रा स्टेशनाव भेटु ... तिथनं मग शारुक खानचा बंगला बगाय जाउ माउंट मेरीच्या चर्च मध्ये जाऊ .. :) बँड स्टँड ला नक्को बै :-/ ... खुप घाण करुन ठेवलिय तिकडं ... :(

३ फेब्रू? नाही जमायचे. वाईट वाटते आहे पण नाईलाज आहे. तुमच्या कट्ट्यास शुभेच्छा. मी येईन तेंव्हा पुण्यात किंवा मुंबईत कट्टा करू. प्रभाकर पेठकर (बैठ्या कट्ट्याचा पुरस्कर्ता)

कट्ट्यासाठी सुभेच्छा :) पुण्यातल्या कट्ट्याची एप्रिल मध्ये वाट बघणारा फाकडा !

आसलं बारकं बारकं कट्टं कराच, पन कंदीतरी मिपाकरांच येक महासंमेलन बी करा. लै आवडंल. सद्या तरी म्हमई कट्ट्याला माज्या सुबेच्चा.

In reply to by ५० फक्त

सहकुटुंब यायचं आहे का कसं ?
सहकुटूंब आलात तरी चालेल. त्यानिमित्ताने २५फक्तची भेट तरी होईल. :)

कट्ट्याला शुभेच्छा. वृत्तांत तपशिलवार लिहायला विसरु नका. -दिलीप बिरुटे

सहकुटुंब कट्ट्याला शुभेच्छा. तपशिलवार फोटो सहीत वृत्तांत लिहायला विसरु नका. भारताबाहेर पण एकदा भरावा ना ....... कट्टा !!! मिसळ पावच्या मेनू सोबत!!!!!!!!!!!!!!!!

याव म्हणतो... प्रयत्न करतो नक्की.

माझी मुंबईमध्ये पायी फिरायची संधी हुकली...

In reply to by गवि

आयोजकांमध्ये माझे नाव क्लेरिकल मिष्टेकमुळे गेले आहे. खुद्द देवाधिदेव किसनदेव करी शस्त्र धरून युद्ध करीत असताना आम्ही युक्तीच्या चार काय एकही गोष्ट सांगायची गरज नाही.

आतापर्यंत ही नावं नक्की झाली आहेत.
  1. अन्या
  2. ग्लिफ
  3. घाशींराम कोतवाल
  4. तीरशिंगराव माणूसघाणे
  5. निखिल देशपांडे
  6. निम
  7. पिंगू
  8. प्रथम फडणीस
  9. मस्त कलंदर
  10. मिसळलेला काव्यप्रेमी
  11. रामदास काका
  12. लिमाऊजेट
  13. शैलेंद्र
  14. सुझे
  15. सुड
  16. सुर
  17. स्नेहांकिता
  18. किसन
  19. इनिगोय
या सर्वांना तपशीलाचा व्यनि करत आहोत. यात तुमचं नाव राहून गेलं असेल तर प्लीज उद्या दुपारपर्यंत (१ फेब) व्यनिमधून भ्रमणध्वनि क्रमांकासकट कळवा..