Skip to main content

समर्पण

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 22/07/2013 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
ओढ लागली दत्ताची वाढे गोडी परमार्थाची मिळे स्फूर्ती साधनेची होई पूर्ती आनंदाची ll १ ll मूर्ती साजिरी मायेची प्रेमळ सावली वात्सल्याची उभी पाठीशी कायमची चिंता वाहे भक्तांची ll २ ll घ्यावी प्रचीती दत्तांची चित्तवृत्ती हो पावनतेची सेवा करिता चरणांची मिळे अनुभूती चैतन्याची ll ३ ll दत्तनाम घेता वाची स्वानुभव अष्टांग रोमांची राख होतसे दु:खांची हि किमया दत्तकृपेची ll ४ ll काय चिंता भविष्याची भीती कायसी अशाश्वताची मनी भावना समर्पणाची फिटेल चिंता नि:शंकची ll ५ ll श्री गुरु चरणरज, © www.saarthbodh.com

थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक २

लेखक मन यांनी सोमवार, 22/07/2013 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1: http://misalpav.com/node/25241 पुजालोच्या खाजगी आयुष्याबद्दलः- त्याने शाळा अर्धवट सोडली होती. अनेक लहानमोठी कामे तो शिकला होता. कधी हार्डवेअरच्या दुकानात काम कर तर कधी पोल्ट्री फार्म शिक असे त्याचे सुरु होते. वडलांनी मागे थोडिफार संपत्ती सोडली होती. पण स्पॅनिश युद्धादरम्यानच्या काळात तिथल्या कामगारांनी ताब्यात घेतली. स्पॅनिश यादवी युद्धात एका बाजूला इटाली- नाझी समर्थित फॅसिस्ट गट होता, तर दुसरीकडे रशिया समर्थित कम्युनिस्ट होते.

थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक १

लेखक मन यांनी सोमवार, 22/07/2013 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य कल्पना करु शकाल त्याहून थरारक, विचित्र असतं असा एक वन लायनर फार पूर्वीपासून ऐकत आलोय. त्या फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत असे पूर्वी वाटे. पण एक सत्यकथा हाताला लागली आणि काहीही तिखट मीठ न लावता जे जसं आहे ते तसं मांडलं तरी ते किती थरारक, रोमांचकारक, विचित्र आणि धम्माल गंमतीशीरही असू शकतं हे अनुभवलं. एक बरचसं अनवट, अल्पपरिचित किंवा अपरिचित असलेलं भूतकाळातलं पान जे जसं आहे ते जवळपास जशाला तसं भाषांतरीत करतोय विकिपिडियातून. . कल्पना करा. दुसरे महायुद्ध सुरु आहे आणि तुम्ही जर्मन सैन्याच्या pay roll वर आहात. ब्रिटनवगलता इतर युरोपमेनलँडवर नाझींचा ताबा आलेला आहे.

' ठोकळे '

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 21/07/2013 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
' ठोकळे ' ठोकळे, ठोकळ्यांचा समूह, मग आख्खा एक ठोकळा किंवा आख्खा ठोकळा, ठोकळ्यांचा समूह आणि किरकोळ ठोकळे : एकूण एकच. लाल ठोकळ्यातून उतरलास की काळापिवळा थांबव शंभरची पत्ती दाखव दिली नाहीस तर तो भाव खाणार रिंकाम्या खिशाने बोंबलत पुढे जाणार एरवी दहावीसचा धंदा ; पण आता नाही, तर कधी कमावणार ? उजवीकडे मोठे भुयार मग भुयारात भुयार ! आणि मग तिथे ठोकळेच ठोकळे, ठोकळ्यात ठोकळे काळे ठोकळे , पांढरे ठोकळे , खाकी ठोकळे , मळकट,कळकट, ठिसूळ आणि बळकट लहान, मोठे, उंच आणि बुटके ; गब्बर आणि फाटके ठोकळे एकदाचे तुझे भुयार शोध सापडले ?

शेंबूड

लेखक मन यांनी रविवार, 21/07/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर "जनातलं मनातलं" ह्या ऐअवजी "जनातलं नाकातलं" ह्या सदरात हा धागा टाकण्याचा विचार होता. नाकातून निघणार्‍या चिकट धाग्यांबद्दल हा धागा आहे असे समजा. . शेंबूड हा सर्वत्र आहे, चराचर मॅमलांत तो भरुन राहिलेला आहे. तो नासिकेत आहे, गळी स्थळी आहे. त्याची एखाद्यावर कृपा झाली तर तो कित्येक दिवस तो तिथेच कृपेचा वर्षाव करितो. तो कुठून येतो, कसा येतो हे मानवास पूर्वी ज्ञात नव्हते. तो संपत कसा नाही ह्याचे त्यास कुतूहल होते. तो नको तेव्हाच कसा येतो ह्या प्रश्नाने भल्याभल्यांचे नक चोंदले गेले गेले होते. तो वहायला लागला की पळता भुई गुळगुळित होते.

चीन विश्वासपात्र नाही

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 20/07/2013 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
चीन विश्वासपात्र नाही

सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही

उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही

समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही

आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही

"खावू लुटून मेवा" हे ब्रीद शासकांचे
क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही

तोडीस तोड उत्तर जमले बघा मलाही

काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 20/07/2013 18:20 या दिवशी प्रकाशित केले.

नार्सिससचा स्वप्नदोष

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 20/07/2013 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
काचेच्या भांड्यातल्या गोल्डफिशसारखा विहरतो तो स्वच्छंद लिमिटेड अवकाशात अन् तापलेल्या सूर्याच्या तोंडावर मिटून कवाडं प्रतिबिंब पाहतो काचेत अ‍ॅनिमिक प्रकाशात बांधलेल्या आखीव मॅग्नेटिक रस्त्यांवर गुळगुळीत मॅगलेव्हने जाताना भर वेगात ऑटोपायलटवर टाकलेल्या आयुष्याला रस्ता सोडून जायचं येतच नाही मनात क्षणात रंग बदलणार्‍या बत्तीस बिटी भिंती अन् आकार बदलत्या नॅनो फर्निचरच्या गराड्यात कंटाळा भरून राहिलेला असतो मख्खपणे त्याच्या वेल इंजिनिअर्ड पिळदार शरीरात चौघांचं चौकोनी चतुरस्र कायदेशीर कुटुंब पसरलेलं जगभर ताणून एकेका कोपर्‍यात स्वतंत्र, स्वतःचा असतो तो संपूर्णपणे यंत्रांच्या आधाराने या एकविसाव्या श
काव्यरस