Skip to main content

तुझी 'माया'च बाकी .......

लेखक psajid यांनी गुरुवार, 16/01/2014 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
तूच दिलीस साथ ढासळत्या मनाला, सावरलेस संकटात क्षणोक्षणी जीवनाला !! धडपडून उठतांना तो जीव कासावीस झाला, तुझी ‘माया’च बाकी जीवन उणं होताना !! ते पंख उबीचे अन दिलासा मनाला, दिलीस कल्पना वाईटाची जरी क्षणिक मोह झाला !! बोचकरलं परिस्थितीने परी खंत नव्हती जगण्याला, गेलो सामोरे त्याला अन दुःखाचा पराजय केला !! उन्मादात जगणं व्हावं आणि पेटावं उमेदीला, जिद्दीला मायेची जोड हवी जीवन सफल करण्याला !! - साजीद यासीन पठाण

कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १)

लेखक पिलीयन रायडर यांनी गुरुवार, 16/01/2014 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा दिवाळीमध्ये शनिवार-रविवार जोडुन चक्क ९ दिवस सुट्टी मिळाली होती. अर्थातच ती घरात बसुन घालवण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे दिवाळीचा एक महिना आधी फराळापेक्षा ट्रिप प्लान करण्यातच जास्त वेळ गेला. अबीरला घेऊन पहिल्यांदाच जात असल्याने फार लांब जायचे नव्हते. शिवाय दिवाळीची बेसुमार गर्दी टाळायची होती. ह्या सगळ्या खेरीज एक छोटासा प्रॉब्लेम म्हणजे ४ सळसळणार्‍या रक्ताचे तरूण "कुठे जायचं" हे ठरवायला बसलेले असल्याने "एकमत" नावाचा इल्लुसा गड सर करायचा होता.

मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या ताब्यात द्यावे का?

लेखक टॉपगिअर्ड फिलोसॉफर यांनी गुरुवार, 16/01/2014 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते.

मिस्टी पिकॉक बे

लेखक सुज्ञ माणुस यांनी गुरुवार, 16/01/2014 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिस्टी पिकॉक बे नवीन वर्षाचा विकांत कोठे जायचे याचा विचार चालला होता. सुट्टी टाकून मोठ्या ट्रेकला जायचे का घरीच पडून राहून घरच्यांना सरप्राइज द्यायचे ह्या विचारातच "नवीन वर्षाचे तरी घरात थांबा जमले तर! " अश्या वाक्याने आता घरच्यांना वेळ द्यायला पाहिजे हे जाणवले. बऱ्याच दिवसांनी घरात आमचे पाऊल थांबल्याचे बघून मातोश्रींना ही जरा बरे वाटले होते. पण त्यांचा तो आनंद जास्त टिकू न देता त्यांच्यासकट कुठेतरी जायचा प्लान केला. कुटुंबा बरोबर फिरायचीही मजाच वेगळी हेच खरे. रविवारी सकाळी ६ वाजता सगळ्यांना गाडीत भरून निघालो पिकॉक बे ला. २-३ तासात परत यायचे असल्याने खाण्या पिण्याचे काही घेतले नव्हते.

डम्पलिंग (Dumpling)

लेखक अनन्या वर्तक यांनी गुरुवार, 16/01/2014 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: Ground Chicken कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आले लसूण पेस्ट वरील सर्व घटक चांगले मिक्स करावेत. कृती: भांड्यात तेल घेवून त्यात वरील मिश्रण stir fry करून घ्यावे आणि त्यात काळेमिरी आणि मीठ तुमच्या आवडी प्रमाणे घालावे. आवरणासाठी: मैद्या मध्ये मीठ घालून कणिक मळून घ्यावे. त्याचे छोटे गोळे करून पातळ लाटून घ्याव्यात. त्यात हे मिश्रण करंजीसारखे भरावे आणि बंद करावे. बांबू स्टीमर असल्यास त्यात हे Dumplings ठेवावे आणि वाफ येऊ द्यावी. हे Dumplings टोमॅटो, तीळ आणि लसूण यांच्या चटणी बरोबर खावे.

भाषा - आपली सर्वांचीच

लेखक वडापाव यांनी बुधवार, 15/01/2014 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच (म्हणजे दहा मिंटं झाली असतील) अविनाश बिनीवाले यांचं 'भाषा - आपली सर्वांचीच' हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. (अजून एक लिंक) आणि मराठी भाषेविषयीचा (खरंतर इतरही अनेक भाषांविषयीचा) दृष्टीकोन काही बाबतीतं नव्याने उमगला, काही बाबतींत दृढ झाला, काही बाबतीत तो पूर्णपणे बदलला. अविनाश बिनीवाले यांचे 'लोकसत्ता' मध्ये जुलै १९९८ ते डिसेंबर १९९९ या काळात भाषाविषयक सदरांत ७८ लेख प्रकाशित झाले.

मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ?

लेखक माहितगार यांनी बुधवार, 15/01/2014 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. -कवीवर्य-ज्ञानेश वाकुडकर
कवीवर्य ज्ञानेश वाकुडकरांच्या उपरोक्त काव्यंपंक्ती माझ्या आवडत्या काव्यपंक्ती आहेत.येथे कवीची अपेक्षा गोपनीयतेचे (प्रायव्हसी राईट्स) व्यक्तीगत राईट्स सोडण्याची नाही तर मनाच्या खुलेपणाची आहे.नवीन अथवा अपरीचित कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असणे म्हणजे मनाचा खुलेपणा होय. Where The Mind Is Without Fearमधील रबिंद्रनाथ टागोरांच्या "Where the world has not been broken up into fragments By narrow domestic walls मध्ये अशीच काहीशी भावना असेल क

पँथर गेला !

लेखक मारकुटे यांनी बुधवार, 15/01/2014 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रख्यात कवी, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज (बुधवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गुरुर्बह्मा आणि संशोधनक्षेत्रातील निगरगट्टपणा

लेखक Atul Thakur यांनी मंगळवार, 14/01/2014 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे आपल्या पुर्वजांनी गुरुचं माहात्म्य सांगताना कसल्याही मर्यादा पाळलेल्या नाहीत त्यामुळे गुरु हा प्रकार सोकावलेला असुन त्याची फळं आपल्याला भोगावी लागत आहेत. अगदी पुर्वापारपासुन कुणी आपल्या आवडत्या शिष्यापेक्षा दुसरा पुढे जाऊ नये म्हणुन अंगठा कापुन घेतं, तर कुणी मुलाला जास्त विद्या मिळावी म्हणुन कपट करतं. गुरुची झोपमोड होऊ नये म्हणुन शिष्याने भुंग्याला आपली मांडी पोखरु दिली तर त्याला काय फळ मिळाले? विद्या वापरायच्या ऐनवेळी विसरशील हा गुरुचा शाप. आणि अशा गुरुंच्या नावे गळे काढणारी, त्यांच्या नावाने पारितोषिके देणारी मंडळी नंतर अवतरली.

मराठीतील समर्पक शब्द हवे आहेत. ( प्लेसमेंट क्षेत्रामधील).

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 14/01/2014 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्लेसमेंट क्षेत्रात इंग्रजी भाषेचा प्रभाव बर्‍यापैकी दिसतो.कृपया मराठीमधील समर्पक शब्दांचा वापर सुचवावा. कॅम्पस रिक्रूटमेन्ट करिअरच्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठीही टर्निग पॉइंट इंटरव्ह्य़ूसाठी टिअर वन, टू, थ्री कंपन्या कोअर इंजिनीअरिंग कंपन्या बेसिक संकल्पना कट् ऑफ मार्केटिंग टीममध्ये स्ट्रेटेजी विद्यार्थ्यांची पॅशन पॅनेलला अ‍ॅप्टिटय़ूड ऑफर परदेशात पोस्टिंग प्रोजेक्ट वरील सर्व शब्द आजच्या लोकसत्ताच्या करीयर पुरवणीत आढळले.