मला येणारी पाककृती म्हणजे पोळीचा लाडू
साहित्यः- घरात शिल्लक असलेली शिळी पोळी ( साधारण ४-५), गूळ किंवा पीठीसाखर, तूप
कृती-घरात जास्त झालेल्या पोळ्या घ्या. काही लोक याला चपाती असे देखील म्हणतात. त्या मिक्सरमधे टाकुन बारीक करुन घ्या. घरात मिक्सर नसेल तर हातानेच बारीक होईपर्यंत कुस्करा. त्यात विळीवर चिरलेला गूळ आपल्या चवीनुसार टाका. गुळ कुठलाही चालतो. विळी नसेल तर सुरी घ्या. ते ही नसेल तर हातानेच गुद्दे मारुन फोडा व बारीक करा.आता मिश्रण एकजीव करण्याचा प्रयत्न करा.गूळा ऐवजी पीठीसाखरही घेउ शकता. ती नसेल तर साधी साखरसुद्धा चालते. आता तुप घ्या. ते थोडे गॅसवर गरम करा. ते पातळ होईल. ते त्या मिश्रणात टाका. तूप किती टाकायचे यासाठी स्वतःची तर्कबुद्धी वापरा. मिश्रण हाताने चोळून / कुस्करुन झाल्यावर त्याचे लाडू बनवा. शक्यतो छोटे आकार घ्या करायला व खायला सोपे जाते.
टीप- एखाद्याला हे मिश्रण लाडू या स्वरुपात आवडत नाही तर अशा वेळी ते तसेच मिश्रण या स्वरुपात ठेवले तरी चालते. ह दूध घालून ही चांगले लागते.
आहे की नाही झटपट पाककृती? आळशी वाचक यात आपापल्या वकूबानुसार यात भर घालू शकतात अथवा उपसाही करु शकतात.
वाचने
20361
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज सकाळीच केला होता.
पहाटे पहाटे
छायाचित्र?
मन;चक्षु
In reply to छायाचित्र? by प्रभाकर पेठकर
बायकोच्या हातच्या पोळया.
In reply to मन;चक्षु by प्रकाश घाटपांडे
जास्त नग असल्यास तुमचा आक्षेप
In reply to बायकोच्या हातच्या पोळया. by प्रभाकर पेठकर
तब्येत...
In reply to जास्त नग असल्यास तुमचा आक्षेप by डॉ सुहास म्हात्रे
ह ह पु वा
In reply to तब्येत... by प्रभाकर पेठकर
पेठकर काका...! =))
In reply to बायकोच्या हातच्या पोळया. by प्रभाकर पेठकर
पेठकर काका...!
=)) =)) =))ओक्के.
In reply to मन;चक्षु by प्रकाश घाटपांडे
जयहिंद सर.
शाळेपणी आहा! नविन शब्द!
In reply to जयहिंद सर. by पाषाणभेद
पीठीसाखर घातलेल्या
मी लहानपणी तूप गुळ दशमी चा
In reply to पीठीसाखर घातलेल्या by अनुप ढेरे
ह्याच
पाकृची सुरुवात
+१
In reply to पाकृची सुरुवात by आदूबाळ
लाडू बेष्ट
In reply to पाकृची सुरुवात by आदूबाळ
मलाही आवडते पण गुळ घालुनच.
मलिदा?
काळा गुळ वापरुन कुणी ही
मस्तच
चुरमा
In reply to मस्तच by प्रसाद गोडबोले
मिपा प्रथेनुसार
पण
गुळ/तुपाच्या भानगडीत कशाला
आवडता पदार्थ
फटु मन्दे लाडु
In reply to आवडता पदार्थ by विकास
मोतीचूर नाही
In reply to फटु मन्दे लाडु by अनिरुद्ध प
थान्कु
In reply to मोतीचूर नाही by विकास
मस्तच
गुळ व तुप एकत्र करून जरा
मस्तच पाकृ काका. फक्त फोटो
फोटो नसला तरी या निमित्ताने
In reply to मस्तच पाकृ काका. फक्त फोटो by प्यारे१
इशाच्या आईने माझी पाककृती
धागा पाहून, "तुला पाहते रे...
In reply to इशाच्या आईने माझी पाककृती by प्रकाश घाटपांडे