पायरसी टाळणे शक्य आहे काय ?
जी चराचराला व्यापून दशांगुळे उरली आहे. पायरसी टाळण्यात कुणी पुढाकार घ्यावा ? उत्पादकाने, विक्रेत्याने की खरेदीदाराने ? की कायद्याचे पालन करणार्या व्यवस्थेने ?
पायरसी मधून मिळणारा बराच पैसा समाजविघातक कामांसाठी वापरला जात असेल हे मला कळत असले तरी वळत असेलच असे नाही. ४०-५० रुपयांत ५-६ चित्रपट दाखविणार्या रस्तोरस्ती मिळणार्या डीव्हीडींचे प्रस्थ कमी करण्यासाठी मोझरबेअर ने त्याच किंमतीत २-३ चित्रपट देणार्या सीडी / डीव्हीडी उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. घरी संगणक घेतला तर त्यावर गरज नसतांनाही ग्राहकाला कोरल, फोटोशॉप, आणी इतर सॉफ्टवेअर हवी असतात म्ह्णून मग विक्रेता नाईलाजाने / खुषीने उपलब्ध करुन देतात. ही सॉफ्टवेअर नको असली तरी ऑफीस सुट तर प्रत्येकाला हवाच असतो. २५-३०-५० हजार खर्च करुन संगणक विकत घेतला तरी सॉफ्टवेअरच्या किंमती इतक्या आहेत की सामान्य माणूस त्या विकत घेऊ शकत नाही आणी ज्याच्याकडे पैसा आहे त्याला तो खर्च करायचे जीवावर येते. बर लीनक्सचा उपाय सुचवावा तर पडीले वळण इंद्रियां सकळां या न्यायाने विंडोजची आस आणि कास सोडवत नाही ? तुमच्या मोबाईल मधील निम्मी अर्धी गाणी तर तुम्ही Songs.PK या पाकीस्तानी संस्थळावरुन घेतलेली असतात.
ही तर मला माहित असलेली उदाहरणे आहेत. तुम्ही अजून उदाहरणे देऊ शकता. उपाय सुचवू शकता ?
इस सडे हुए सिस्टम को उखाडके फेंकना है !
आप उखाडेंगे ?
मिलके उखाडेंगे ना सर ! थोडा आप ! थोडा हम !!
वाचने
2000
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
फुकट
खूप लोकांना फायदा आणि थोड्या लोकांचे नुकसान
In reply to फुकट by चित्रगुप्त
नि:शुल्क गोष्टी
In reply to खूप लोकांना फायदा आणि थोड्या लोकांचे नुकसान by धर्मराजमुटके
सदाफ कंपनी वगैरे विषयी काही
In reply to नि:शुल्क गोष्टी by चित्रगुप्त
ज्ञान, मेधा, कौशल्य वगैरे
पायरसी टाळणे शक्य आहे काय ?
...