आरोग्यवर्धक पाकक्रुती... भाग २ ... आल्याच्या वड्या.......
प्रथमतः काही गोष्टी:
१. ह्या अत्यंत घाई घाईत बनवल्याने हव्या तशा जमल्या नाहीत आणि मध्येच ऐन वेळी फोन आल्याने थोडी भानगड झाली.
२. श्री. आदूबाळ आणि जेपी ह्यांच्या आग्रहास्तव बनवल्या असल्याने, ही पा.क्रु. त्यांना अर्पण.
३. वड्या करायला शिकायचे असेल तर ही प्रथम शिकायला लागते.समजा चुकल्याच (जशा माझ्या चुकल्या) तर चहात वापरता येतात आणि उरलेल्या किसाचा (किंवा चोथ्याचा) उपयोग लोणच्यासाठी किंवा मुखशुद्धी बनवण्यासाठी करता येतो.
४. मोबाईल बंद ठेवा किंवा फोन घेण्यासाठी दुसर्या व्यक्तीची नेमणूक करा.
५. आले स्वतः आणायचे आणि स्वतःच किसायचे.जोडीदारने किसले आणि आल्यात जर रेषांचे प्रमाण जास्त असेल तर, "एक मेलं फक्त आलंच तर आणायचे होते.ते पण धड आणता येत नाही.", ह्या प्रथम वाक्याने सुरुवात होणारा अनेक वाक्यी अध्याय सुरु होईल.
६. हा पुरुषांनी करून आपापल्या बायकोला द्यायचा पदार्थ आहे.
७. वड्या पाडायला सुरुवात करण्यापुर्वी ओळखायची खूण, म्हणजे कढईच्या पातेल्याच्या कडेला साखर जमायला लागते.
८. ह्या आरोग्यवर्धक का? तर हिवाळ्यात ह्या खाल्या की सर्दी होत नाही.पावसाळ्यांत पचन चांगले सुधारते.उन्हाळ्यात आंबे,फणस खावून आलेले जडत्व कमी करायला मदत करतात.(हा माझा अनुभव आहे.वैद्यांच्या सल्ल्याशिवाय जास्त खावू नयेत.जास्त खाल्या तर, कोंबडी,मासे आणि बोकड-शेळी यांचे मरण सार्थकी लावायला, तुम्हाला जमणार नाही.मला अनुभव नाही.मी तब्येत राखून तब्येतीत खातो.)
तर आता आपण बघू या साहित्य.....
१. आले....आता आल्याच्या वड्यांत आले असणारच हे तुम्हाला माहीत आहे.पण वाचकाला असे एकदम ग्रुहीत धरता येत नाही.
असो,
आले शक्यतो भारतीय घ्या.चायनीझ आले असेल तर त्यात तिखट पणा नांवालाच असतो.वड्यांची चव बिघडते.
२. साखर... आल्याच्या तिखट पणावर अवलंबून.तरीपण एक वाटी आल्याच्या रसाबरोबर एक वाटी.मी अंदाजपंचे घालतो.
३. किसणी...आले किसून घ्यायला.आल्याचे तुकडे करून एकदा मिक्सर मधून फिरवून बघीतले आहे आणि ते पण बायकोच्या समोर.तुम्ही असला घोटाळा करू नका.
४. मिक्सर... पाटावरवंटा घेवून बघा.
५. तूप...२ चमचे
६. दुध... उगीच आपले १ ते २ चमचे.
७. साय... घ्या भरपूर...(आपल्या बापाचे काय जाते.खावु दे त्याला त्याच्या बायकोच्या शिव्या.)
क्रुती......
१. आले किसून घ्या.
२. आले मिक्सर मधून काढा आणि ते गाळणी मधून पिळून रस काढून घ्या.खालील फोटो बघा.
३. आता एका कढईत साखर + दूध + साय टाकून ती गरम करायला ठेवा.खालील फोटो बघा.
४. थोडे गरम झाले आणि साखर थोडी विघळायला लागली की ह्या कढईमधल्या रसायनात आल्याचा रस घाला. आणि ताटाला तूप लावुन घ्या.एकदा उकळी यायला लागली की क्षणभर पण विश्रांती मिळणार नाही.खालील फोटो बघा.
५. आता हे रसायन थोडेसे उसाच्या रसा सारखे दिसायला लागेल.त्याला मस्त उकळायला ठेवा.खालील फोटो नीट बघा.इथे जरा उसंत मिळाली म्हणून हा फोटो घेऊ शकलो.
६. आता रसायन थोडे घट्ट होवू लागले असेल.आणि बराचसा फेस पण यायला लागला असेल.आता ढवळत बसा...कुठपर्यंत तर कढईच्या कडेला साखर दिसायला लागे पर्यंत.
थोडे रसायन आणि बरीचशी साखर टाईप दिसायला लागले की गॅस बंद करा आणि परत ढवळा.आता रसायनाला फेस यायला लागला असेल.
लगेच त्याला तूप लावलेल्या ताटावर घ्या आणि गरम अस्तांनाच वड्या पाडायला घ्या.
मला नेमका ह्याच वेळी फोन आला आणि थोडा घात झाला.मिश्रण १५/२० सेकंदच मंद गॅसवर होते...पण ह्या ठराविक वेळेलाच खूप महत्व असते.
असो...
वड्या तर तयार झाल्या आणि डब्यात पण गेल्या.आता उद्यापासून जातील आपापल्या माणसांकडे.
तयार झालेल्या वड्यांचा फोटो खाली देत आहे.
वड्या थोड्या घट्ट झाल्यामुळे पूड जरा जास्त आहे आणि वड्यांचा आकारपण चौकोनी न होता, त्यांनी त्यांना हवा तसा आकार घेतला आहे.
नेहमी प्रमाणे बायकोला हा नजराणा पेश केला...बघू आता आमची व्हॅलेंटाइन खूष होते का ते.....
वाचने
11780
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
आभार्स! करुन बघतो आणि फोटो
कृपया , जरा इकडे पार्सल करता
In reply to कृपया , जरा इकडे पार्सल करता by दिव्यश्री
वड्या करणं हि जरा अवघड गोष्ट आहे.
In reply to वड्या करणं हि जरा अवघड गोष्ट आहे. by मुक्त विहारि
>>श्रीखंडाच्या वड्यांना हात
आल्याच्या चोथ्याचं काय करायचं
In reply to आल्याच्या चोथ्याचं काय करायचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
आल्याच्या चोथ्याचं काय करायचं?
In reply to आल्याच्या चोथ्याचं काय करायचं? by मुक्त विहारि
ओके
In reply to ओके by ३_१४ विक्षिप्त अदिती
वडीला वस्तुमान मिळतं कशातून?
आवडल मुवी .
मिपाकरांना धष्टपुष्ट करण्याचा
In reply to मिपाकरांना धष्टपुष्ट करण्याचा by कंजूस
उरलेल्या किसाला मीठ लावून वाळवा .
कधी खाल्ली नाही
भारीच आहे पा.कृ.! सौ. म.ज.फा
In reply to भारीच आहे पा.कृ.! सौ. म.ज.फा by अजया
ह्या वड्या बिघडल्या तरी वाया जात नाहीत...
In reply to ह्या वड्या बिघडल्या तरी वाया जात नाहीत... by मुक्त विहारि
खरा बल्लव किंवा सुगरण कोण?
वा मुवि,
In reply to वा मुवि, by सुबोध खरे
वड्या शिल्लक असतील तर डोंबिवली ला याव म्हणतोय.
आता घारापुरीला खजुराच्या
In reply to आता घारापुरीला खजुराच्या by प्रचेतस
आता मुविंनी वर श्रीखंडाच्या
In reply to आता मुविंनी वर श्रीखंडाच्या by सूड
त्याहीपण येऊ दे असे म्हण.
वड्या..
छानच! तरी लांबूनच रामराम!
सविस्तर पाकृ. आवडली.
In reply to सविस्तर पाकृ. आवडली. by अनन्न्या
लग्नाला वीस्/बावीस वर्षे झाली....
छानच
मस्तं!