तुझिया डोळ्यांत तेंव्हा पाऊस दाटला होता …
तुझा हात जेंव्हा माझ्या हातून सुटला होता ….
तू थांबवलीस असावे तुझी ,
पण बांध तरीही फुटला होता …
ऊन पिऊन अंगणात सुकला पारिजात माझ्या,
निळा कोवळा पाऊस मी नियतीस विकला होता …
ओंजळीत भरलेस तू श्वास तुझे सुगंधी,
मी हात त्यावरी एक झाकला होता …
मी न थांबलो तिथे , न वळून बघितले निघताना,
विश्वास तुझा तरीही न थकला होता …
मी चेतविल्या पुन्हा तुझ्या आठवणी,
मी विझलो तेंव्हा त्यांचा उजेड फाकला होता …
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2519
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेवटची ओळ
भाव जमलेत हे नक्की. छान.
पहिलाच प्रयत्न अहे ...
In reply to भाव जमलेत हे नक्की. छान. by वेल्लाभट
भाव पोचले
In reply to पहिलाच प्रयत्न अहे ... by घन निल
धन्य्वाद !
In reply to भाव पोचले by चौकटराजा
हे वाचा
In reply to धन्य्वाद ! by घन निल
धन्यवाद
In reply to हे वाचा by चौकटराजा
छान
वाह...
छान आहे.
आमच्या क्षुद्र शाब्दिक जुळवा जुळवी ने आपल्याला ग्रेस आठवले यातच
In reply to छान आहे. by अग्निकोल्हा