Skip to main content

हे लोकं बोलतात तरी काय / कसे.

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 11/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
दोन राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान किंवा तत्सम अत्युच्च पदस्थ लोकं जेव्हा अधिकृत कामासाठी भेटतात तेव्हा ते जी चर्चा वाटाघाटी करतात त्याचा गोषवारा / औटकम आपल्याला नंतर कळतो..आपण नेहेमी ऐकतो वाचतो कि अमुक नेत्याने अतिशय मुत्सद्दीपणे अमुक एक परिस्थिती हाताळली / आपलं मुद्दा गळी उतरवला वगैरे वगैरे.. परंतु हे लोकं प्रत्यक्ष बैठकीत / बोलण्यांमध्ये ते काय /कसे बोलत असावेत ? विशेषतः बंद दाराआड चर्चेत जेव्हा प्रत्येक शब्द, हालचाल, मौन सगळे सगळे महत्वाचे असेल त्यावेळी आपलं मुद्दा मांडतांना, रेटतांना, सोडतांना शिष्टचारांचा डोलारा सांभाळत .. ते एक्झाकटली 'बोलत' काय/कसे असावेत?

मृगगड - उंबरखिंड - भाग १

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 11/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
’मृगगड??? हा कुठे आला? ऐकलं नाही कधी याबद्दल! मोठा आहे का? किती कठीण आहे? काय विशेष आहे त्या किल्ल्यावर?’ इत्यादी असंख्य प्रश्न उपस्थित झाले, जेंव्हा मृगगडाचं नाव सुचवलं गेल. तसा हा अपरिचितच किल्ला म्हणायला हवा. इंटरनेटवरही याची म्हणावी तेवढी मुबलक माहिती मिळत नाही. सुधागड, राजगड ही नावं शर्यतीत होती पण शेवटी एक दिवसाचाच ट्रेक करायचा ठरल्याने ती बाद झाली. मग कोहोज, टकमक गड, घनगड आणि हा मृगगड अशी काही नावं पुढे आली. मृगगड त्यातल्या त्यात जवळ, छोटा, फार कठीण नसलेला, (ही सगळी विशेषणं पुढे बदलली. कशी ते कळेलच) असा होता आणि नवीन होता त्यामुळे ‘होऊदे ट्रेक !’ असं म्हणून मंडळी ट्रेक ला तय्यार झाली.

बिअरचा ग्लास (?) आणि भारतीय प्रमाणमीमांसा

लेखक माहितगार यांनी सोमवार, 10/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय तत्वज्ञानातील प्रमाणमीमांसा हा संबंधीत विषयातील तज्ञांनी हाताळावयाचा विस्तृत विषय आहे.

मोदी वगेरे ठीक आहे…महाराष्ट्राला काय ते बोला

लेखक पुतळाचैतन्याचा यांनी सोमवार, 10/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणसाचा शुद्ध स्वार्थ या भुमिके मधून हा लेख लिहिला आहे.मोदी पंतप्रधान होणे हे देशाच्या भल्याचे वगेरे आहे हे ठीक पण ते पंतप्रधान झाले तर मंत्रिमंडळात कोण मराठी चेहरे दिसणार आहेत? त्यांना कोणती खाती मिळतील आणि महाराष्ट्राचे नेहमीचे रेल्वे, सरकारी नोकर्या, उसाच्या शेतकरी, सहकार, मुंबई शहर, इतर औद्योगिक वसाहती यांना काय मिळणार? का नुसता मन मोठा करून बाकी प्रदेशाची प्रगती पहायची आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने गप्प बसायचे? सरकार कोणाचेही येवो, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासाच्या काही प्रमुख मागण्या असाव्यात ज्या आपण सरकार कडून मान्य करून घेतल्या पहिजेत.

ही ती चित्रे ...

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 10/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
काही काळापूर्वी मिपाकरांसाठी 'सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र' नावाची एक लेखन स्पर्धा मी जाहीर केली होती, त्याला मिपाकरांनी उत्तम प्रतिसाद दिला, आणि पैसा, वल्ली आणि प्रसाद गोडबोले, यांना एकेक चित्र भेट देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तीन चित्रे एकत्रित पाठवली, ती सर्वांना बघायला मिळावीत म्हणून इथे देतो आहे. यापैकी कोणते चित्र कोणी घेतले ? कळवावे.

टाईमपास

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 10/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
"ए गित्या, अजुन वर वढ ना फ़्लेक्स तिच्या आयला ..." कांच्या माझ्यावर खालून वराडला. आयला या कांच्याच्या! याच्या वाढ्दिवसाचा फ़्लेक्स यानी बनवुन आणलाय आन आम्हाला लावलेय धक्क्याला. याचा वाढ्दिवस आहे का तेरावा याचं पब्लिक्ला काय घेणं हाय का ? पण याला चमकायची हौस दांड्गी . चौकात मोठा फ़्लेक्स लावलाय, " आपले लोकप्रिय युवा नेते कांच्या आरकुले यांना वाढ्दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा". शुभेच्छूक म्हणुन स्थानिक नगरसेवक पोपटरावचा फ़ोटो साइडला, मधे याचा पिवळे दात दाखवणारा आणि गांजा मारल्यागत दिसणारा फ़ोटो आणि खाली आम्हा पोराटोरांची नावे !

मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग २: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी) माहिती साठ्याची कमतरता

लेखक माहितगार यांनी सोमवार, 10/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
वस्तुतः चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी ह्या विषयाच्या सांगोपांग चर्चेस अजूनही वाव आहे. माझ्या निरीक्षणांनुसार मराठी आणि महाराष्ट्र संबंधी कोणत्याही विषयावर हिट्सचा अभ्यास केला तर मराठी माणसाचा मराठी आणि महाराष्ट्र विषयीचा जिव्हाळा कायम आहे पण अजूनही ९०-९५ टक्के शक्य श्रोता अथवा वाचकवर्ग इंग्रजीतूनच शोध घेतो मराठीत शोधत अथवा वाचतच नाही लेखन दूरची गोष्ट आहे; याच एक कारण मराठी भाषेतील ऑनलाईन मराठीत ज्ञान आणि माहिती साठ्याची कमतरता आहे.

घारापुरीचे शैवलेणे - मिपाकरांसोबत

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 10/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
a बरेच दिवस घारापुरी भ्रमंतीसाठी योजना आखणेच चालले होते पण प्रत्यक्ष जाणे काही दृष्टीपथात येत नव्हते. अचानक मुविंच्या एका मुंबई कट्ट्याच्या धाग्याच्या निमित्ताने उचल खाल्ली आणि मुविंशी संपर्क करून १ किंवा ८ मार्च अशी दोलायमान अवस्थेत असलेली भ्रमंतीची तारीख १ मार्च २०१४ अशी पक्की ठरवली आणि या निमित्ताने पुणेकर आणि मुंबईकरांच्या हृद्य भेटीचा योग जुळवला गेला. शेवटी १ तारखेची पहाट उजाडली.

तू अता ये याच रस्त्याने तुझ्यापाशी ...

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 10/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
हात भाग्याने न माझा सोडला होता तूच तेव्हा पाय माझा ओढला होता ! पाळला मी शब्द माझा तो युगानुयुगे ... तूच जन्माचा शिरस्ता मोडला होता ! मी तुझी अवलोकिली गात्रातली जादु मी तुझा मग हात हलके चोळला होता ! तू अता ये याच रस्त्त्याने तुझ्यापाशी ... काल मी मजपासुनी तो जोडला होता ! तू अता शपथेवरी हे सांगते आहे: परवलीचा शब्द अपुला फोडला होता ! चित्रगुप्ताची लिहू ये चोपडी आता तू स्वतःचा काल गुन्हा खोडला होता ! भक्त भगवे पळुन गेले चोरवाटेने मेघश्यामल देव त्यांनी झोडला होता! डॉ.सुनील अहिरराव

कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 10/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख ) आमचे चिरंजीव श्री राजवीर दिक्षित नुकतेच तीन वर्षाचे होतील. तवा साहेबांच्या शाळा प्रवेशासाठी गेला आठवडाभर मिशन हाती घेतले होते. आमचे शिक्षण सरकारी शाळेत झालेले - पाच रुपये फी वाल्या . पण पोराला इंटरनेशनल अभ्यासक्रमाच्या शाळेत टाकायचं असा निश्चय केला . बांद्रे सांताक्रूझ च्या शांळाची चौकशी सुरु केली . फार माहिती नेट वर नाही . मग सुजाण पालक या नात्याने मी , बायको आणि चिरंजीव असे तिघे शाळा शोधत फिरू लागलो . शेवटी बर्याच चौकशी अंती सान्ताक्रुझ पश्चिम येथील एका प्रथित यश शाळेकडे काल मोर्चा वळवला . पूर्ण रस्ता भर आमची पत्नी पढवत होती .