Skip to main content

रसिका

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 28/01/2014 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतती खुणा गाठती रेशमी धागे हृदयात रुधिर रसिकाचे जेंव्हा जागे चांदणे टिपुर आवसेचे निर्मळ अवघे चंद्रास न माहित पण; ते पडद्यामागे श्वासांचे प्राक्तन; सुखवी प्रेम नि माया चिरतरुण ठेवते अभिलाषा; मन-काया जन्मास सोबती गोत; खेळ खेळाया शोधण्या किनारा लाट हवी उसवाया प्रेरणा कामना उचंबळाचे कारण ऋतु गंध रंग रस चैतन्याचे सारण अभिसरण नसे ते; रुक्ष पोरके अंगण दशदिशा चराचर अस्वादास्तव आंदण ………………… अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1760
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

"श्वासांचे प्राक्तन; सुखवी प्रेम नि माया चिरतरुण ठेवते अभिलाषा; मन-काया" व्वा, क्या बात है! जबरदस्त विचार ! कवितेत किती सहजपणे सुखी जीवनाचा व दीर्घायुषाचा मूळमंत्र सांगितला आहे. धनयवाद एक शंका: चंद्राच्या प्रकाशाला चांदणे म्हणतात कि चांदण्यांच्या प्रकाशाला?

In reply to by आयुर्हित

चन्द्राची "आभा" चांदण्यांचा प्रकाश म्हणजे "चांदणे". "चंद्राचे चांदणे" म्हणजे "चंद्राच्या सख्या चांदण्या". आमावसेला चंद्राची आभा नसते म्हणून चंदणे "टिपूर" दिसते. हे माझे निरीक्षण आणि त्यावरून तयार झालेले मत. :) प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार..