Skip to main content

सलाम एसटी चालकांना

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 11/08/2014 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी गोष्ट आपण अनेकदा केलेली असते, पण अशीच कधीतरी एकदा ती करताना विशेष भावते, त्यातून काहीतरी वेगळी अनुभूती होते. तसंच काहीसं त्या दिवशी झालं. एसटीतून इतके वेळा प्रवास केलेला आहे, पण काही प्रवास खास लक्षात राहिलेत त्यापैकी तो होता. बरेच दिवसांनी असं झालं की बसायला जागा नव्हती. त्यामुळे नेहमीच आवडती ठरलेली चालकाच्या बरोब्बर मागची स्टँडिंग सीट मी पकडली. वाहनाच्या समोरच्या काचेतून पुढचा रस्ता बघत बसायला मला प्रचंड आवडतं. त्यामुळे त्या वेळी बसायला न मिळाल्याचा मला आनंद झाला होता. तिथे उभं राहून त्या अजस्त्रयंत्राला मी न्याहाळायला लागलो.

स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 11/08/2014 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यातील नवरसांत देशभक्तीच्या दहाव्या रसाची भर घालणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उर्दू आणि हिंदी गीतांची सावरकर की अमर रचनाएं - हम ही हमारे वाली है ही सीडी www.savarkarsmarak.com या संकेतस्थळावर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येत्या १५ ऑगस्टपर्यंत नि:शुल्क उपलब्ध आहे.

सर्दीवरील उपाय आणि अनुभव

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 11/08/2014 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर सर्दी, या जास्तीत जास्त आढळणा-या आजाराने प्रत्येक मानवाला कधी ना कधी, कमी जास्त प्रमाणात ग्रासलेलं असतंच. तर या अतिशय लोकप्रिय आजाराशी वर्षातून एखाद दोनदा माझीही नाकभेट होत असते. मग काही दिवस आम्ही एकमेकांना अजिबात दूर जाऊ देत नाही. एकत्र मिळून शिंकांचे फटाकेही फोडतो. अखेर कंटाळून मग आम्ही सोडतो एकमेकांना. असो. गमतीचा भाग वेगळा. पण या सर्दीवर अनेक उपचारपद्धतीत अनेक उपाय सांगितलेले आहेत, औषधं सांगितलेली आहेत. घरगुतीपासून ते गोळीबारापर्यंत. मला लागू झालेले काही उपाय इथे देत आहे, १) काढा - सर्दी झाली रे झाली की आई, आजीचं हे वाक्य येणारच.

हे मन सैरभैर....!

लेखक फिझा यांनी सोमवार, 11/08/2014 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
हे मन सैरभैर....! मृगजळाच्या मागे धावते तप्त उजाड वाळवंट त्यात …. मोकळं मोकळं निळं आभाळ ढग पांढराही नसे त्यात …. दिसे किनारा कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. खोल खोल दाट काळोख आसवांचे काजवे त्यात … थकली पावलेही अंधारात मऊ मऊ काट्यांची वाट … दिसे कवडसा कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. बरसुनही मुसळधार कधीचे परत दाटुनी आले त्यात …… प्रत्येकाचं भिजणं वेगळं पाऊसही चिंब आज तशात ………. दिसे इंद्रधनू कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. शांत भासतो समुद्र जरी फेकीतो लाटांवर लाट … छोटीच होडी वाचलेली , मोठी नौका गिळंकृत …….

प्रेमाची कहाणी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 11/08/2014 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हा सांगतो लोकहो । लक्ष देऊनी ऐकाहो । बाकी सगळे विसरा हो । पण हे नाही ।।१।। प्रथम प्रेमाची महती । कित्येकांनी सांगितली आधी । संपल्या कितीक दौती । संपली ती शाई ।।२।। प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात । जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।। प्रत्येकाची वेगळी रीत । कुणी बसते झुरत । कुणी विचारे थेट । नको दिरंगाई ।।३।। कुणा नडते अति घाई । कुणा सहज सफलता येई । कुणी न धडके राही । हाती पायी ।।४।। भाग्यवंतांचे स्वप्न रंगले । उर्वरितांचे हवेत इमले । "ती"चे कुठेतरी जमले । कळलेच नाही ।।५।। आयुष्य जगणे भाग । आपापले शोधिले मार्ग । तरी मन तिचा माग । काढीत राही ।।४।। परिणाम होव

भुताळी जहाज - ३ - वॉटरटाऊन

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 10/08/2014 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींबद्दल जगभरात सर्वत्रं दोन मतप्रवाह आढळतात. एक मतप्रवाह म्हणजे हे सर्व खरे आहे अशी खात्री असणारा आणि दुसरा म्हणजे हे सर्व धुडकावून लावणारा! खात्री असणार्‍यांचा कोणत्याही अनुभवावर चटकन विश्वास बसतो. अनेकदा असे अनुभव हे आपल्याला अतिंद्रीय अनुभव येत आहेत या गृहीतकावर आधारीत भासमान विश्वं असण्याची शक्यता असते. याऊलट अतिंद्रीय शक्तींवर अजिबात विश्वास नसलेल्यांची हे सर्व थोतांडं आहे अशी पक्की खात्री असते.

भुताळी जहाज - २ - यूबी - ६५

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 08/08/2014 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींचे अनुभव अनेकदा जहाजांच्याच वाट्याला येत असले तरी यात एका पाणबुडीचाही समावेश आहे - यूबी-६५ !! पहिल्या महायुध्दाला तोंड फुटल्यावर जर्मनीने ज्या अनेक पाणबुड्या बांधण्यास सुरवात केली त्यापैकी एक म्हणजे यूबी-६५. १९१६ मध्ये या हॅम्बुर्ग इथे या पाणबुडीचं बांधकाम सुरु झालं. बांधकाम सुरु असतानाच या पाणबुडीवर ती शापित असल्याचा शिक्का बसण्यास सुरवात झाली. पाणबुडीचा मुख्य सांगाडा बांधण्याचंं काम सुरु झाल्यावर आठवड्याभरातच सांगाड्याला आधार देणारे दोरखंड तुटून वर असलेला भाग दोन कामगारांवर कोसळला!

अधुरी प्रेम कहाणी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 07/08/2014 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
अधुरी प्रेम कहाणी *************************************** माधव जोशी मंडईत भाजी घेत होता.. माधव रिटायर्ड झाला होता..तसा संसार मार्गी लागलेलाच होता.. मोठा मुलगा लग्न करुन अमेरिकेत सेटल झालेला मुलिचे हि लग्न झाले होते ..ति बंगलोरला.. भाजी घेत असताना त्याचे बाजुला लक्ष गेले.. ति पाठमोरी उभी होति.. बहुतेक स्मिता साने च असावी... माधव तिच्या कडे गेला अन म्हणाला "तु स्मिता साने" ना.. अन तु माधव जोशी..ति हसत म्हणाली.. अरे काय...

स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 07/08/2014 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्य रचना आणि अंदमान येथे लिहिलेल्या उर्दू गजलांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं - हम ही हमारे वाली है या ध्वनीफीतीचे प्रोमो नुकतेच ऐकले/ पाहिले. अमिताभ बच्चन यांच्या घनगंभीर आवाजातील निवेदन या ध्वनीफीतीला लाभलं आहे. जसपिंदर नरूला, सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, स्वराधीश बलवल्ली, शंकर महादेवन, जावेद अली, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, शान आणि साधना सरगम अशा गुणी गायकांच्या आवाजात या रचनांचा आस्वाद घेता येईल. सावरकरांच्या तीन मूळ आणि सात अनुवादित अशा एकूण १० रचनांचा समावेश या ध्वनीफीतीमध्ये आहे.