Skip to main content

...........काय बोलू.........

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 21/07/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा ही गोष्ट आपण वापरतो खूप पण भाषा या गोष्टीचा आपण विचार कितीसा करतो. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. आता म्हणजे काय........ सगळं इंग्रजीच. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... ही वाक्ये आपण ऐकतो. जशीच्या तशी स्वीकारतो...पण इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... हे वाक्य अर्धवट सांगितले जाते खरे वाक्य आहे इंग्रजी हे वाघिणीचे दूध असते तर सगळे इंग्रजी शिकलेले लोक(कारकून) असे शेळीसारखे बॅ बॅ करताना का दिसले असते. असो ! कोण काय म्हणाले याच्या पलिकडे जाऊया नाहीतर अडकायचो तिथेच... एखादी भाषा केवळ आपली मातृभाषा म्हणून ती ग्रेट असे नसते.

भुलेश्वर भ्रमंती: शनिवार २६ जुलै २०१४ रद्द

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 21/07/2014 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
a भुलेश्वर, १२/१३ व्या शतकात खोदले गेलेले यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर. भूमिज शैली असलेल्या ह्या मंदिरावर चालुक्य शिल्पकलेचा दाट प्रभाव आहे. यादवांनंतर ह्या मंदिराला वाईट दिवस आले. आदिलशाही सरदार मुरार जगदेवाच्या काळात ह्या मंदिराभोवतीच्या टेकडीवर कोट उभारून त्यास दौलतमंगळ हे नाव देण्यात आले. कोटाचे बुरुज आजही दृश्यमान आहेत.

क्यूं के ये इश्क , इश्क है .. भाग १

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 21/07/2014 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना- ही कलाकृती संपूर्ण पणे गायला अवघड आहे . यात आलापी तान , सरगम हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रकार आहेत . त्याच बरोबर तुमच्या आवाजाच्या रेंज ची परीक्षा पाहाणारी ही कव्वाली आहे. तरीही मी ठरविले आपण ही गायचा प्रयत्न करायचा. माझ्या संग्रही ही कव्वाली आहे. पण त्यातील वेगवान गायकी मुळे " अल्फांस " ( शब्द ) उचारण्यात अडचण येत असे म्हणून आंजावर शीध घेतला तर एकाने याचा भावानुवाद कम शब्दानुवाद इंग्लीश मधे केलेला आढळला. मग मला वाटले आपणजी मिपाच्या वाचकांसाठी हा प्रयत्न मराठीत करून पहावा.

जडण-घडण...6

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 21/07/2014 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
डी.एड्. च्या त्या दोन वर्षांनी मला भरभरून दिलं. उत्तम गुण मिळवून पाणावल्या डोळ्यांनी आम्ही सर्वांनीच विद्यालयाचा निरोप घेतला. आधी वरचेवर होणारं बोलणं कालांतराने कमी होत गेलं पण मैत्रीची नाळ मात्र टिकली. त्यानंतर सुरूवात झाली नोकरी शोधायला. डी.एड्. करण्यापूर्वी वरचेवर वर्तमानपत्रात दिसणाऱ्या पाहिजेत च्या जाहिरातींना आता महत्व आलं. हो -ना करता-करता घरापासून चालत २०-२५ मिनीटांच्या अंतरावर असणाऱ्या एका विद्यालयात प्राथमिक शिक्षकाचं पद रिक्त असल्याचं समजलं. उत्साहाने शाळेत पोहोचले. पहिला पाठ घेतला आणि निरीक्षकांनी 'उद्यापासून या' असं सांगितलं. मी खूष. पगार... पाचशे रूपये फक्त.

हरवले ते गवसले का? व कसे? - पीएमटीत हरवली पर्स - भाग - ६

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 21/07/2014 16:30 या दिवशी प्रकाशित केले.

प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

किल्ले हरिहर

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 21/07/2014 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
1 मागे मिपावर कि आंतरजालावर हरिहरच्या अजस्त्र कड्याचं आणि त्यात खोदलेल्या पायर्‍यांचं दर्शन झालं तेव्हाच या दुर्गाने मला प्रचंड भुरळ घातली होती. विशेषत: अखंड कातळात खोदलेल्या उभ्या चढणीच्या त्या पायर्यांनी!! केव्हातरी तिथे जायची संधी मिळेलच या आशेवर मधली वर्षे-दिड वर्षे लोटली आणि शेवटी एकदाचं जून महिन्यातल्या यशस्वी माहुली ट्रेकनंतर जुलैच्या मध्यावर आम्ही (खरेतर मीच!! ;) ) हरिहरची निवड केली.

दिपिका

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 20/07/2014 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
'मी तुझी होऊ शकत नाही,' 'का?,' 'ते तु ऐकु शकणार नाहीस?,' 'का?सांग ना का?,' 'कारण......कारण......मी.....

तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश वांग्याचे भरीत)

लेखक मधुरा देशपांडे यांनी रविवार, 20/07/2014 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुर्किश रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर शाकाहारींसाठी अगदी कमी पर्याय उपलब्ध असतात. फलाफल किंवा व्हेज डोनर हे नेहमीचेच प्रकार. हा काय वेगळा प्रकार दिसतोय म्हणून मागवला आणि फार आवडला. आपल्या वांग्याच्या भरताचाच भाऊबंद. दह्यातले भरीत म्हणू शकतो. घरी करायला अगदीच सोप्पा वाटला. हा पदार्थ स्टार्टर्स मध्ये मोडणारा आहे. सोबत पिटा ब्रेड किंवा तत्सम प्रकार असतात. पण आपल्या भारतीय जेवणात पोळी भाजी किंवा खिचडी, भात यासोबत साईड डिश म्हणूनही चालतो.

थेंब

लेखक पद्मश्री चित्रे यांनी रविवार, 20/07/2014 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
संथ पाउस पडतो झाडे,कौले भिजवीत जणू स्वप्न उतरते जडावल्या पापणीत.... झाडे चिंब शहारली पक्षी मिटत पंखात शांत दुपार पेंगते थेंब थेंब न्याहळत... ओल्या लाल कौलांवर मंद पावसाचा सूर हिरव्या कंच शेतावर संथ थेंबांचा पदर... ओला वास रानीवनी ढग पाण्यात वाहात भोवताल सारे स्तब्ध थेंब एकटे गातात....
काव्यरस

मावा केक

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 19/07/2014 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- १५० ग्राम मैदा १५० ग्राम मावा/खवा (मावा उपलब्ध नसल्यास रिकोटाचीज चा मावा बनवावा.) १२५ ग्राम तूप/लोणी २०० ग्राम साखर ४ अंडी १ चहाचा चमचा वॅनिला इसेन्स १ चहाचा चमचा बेकिंग पावडर पाव कप दूध १चिमूट मीठ कृती- मावा पुरणयंत्रातून मो़कळा करुन घ्या. मैदा,बेकिंग पावडर व मीठ एकत्र करुन घ्या आणि मोकळा केलेला मावा हलक्या हाताने त्यात मिक्स करा. तूप/लोणी फेटून घ्या. त्यात साखर घालून फेटा. अंडी घालून बिट करा. वॅनिला अर्क घाला ,२ मोठे चमचे दूध घाला. मैदा व माव्याचे मिश्रण थोडे थोडे घाला व हलक्या हाताने फेटा. मिश्रण घट्ट वाटले तर एखादा चमचा दूध घाला. सर्व मिश्रण एकजीव झाले पाहिजे. अवन १८० अंश से.