Skip to main content

इन्सुरन्स विषयी माहिती हवी आहे

लेखक jaydip.kulkarni यांनी बुधवार, 23/07/2014 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस रिलायंस लाइफ इन्सुरन्स चे फोन येत आहेत , त्यांनी एक आकर्षक ऑफर माझ्यासमोर मांडली पण मला त्या विषयी पूर्ण खात्री /विश्वास नव्हता म्हणून इथे सल्ला हवा आहे .. तर ऑफर अशी आहे - रिलायंस लाइफ इन्सुरन्स ची एक पौलीसी घ्यायची आणि हि पौलीसी रिलायंस कॅपिटल कडे मोर्गेज करून त्यावर एक ठरावीक रक्कम लोन म्हणून घ्यायची , लोन चा कोणताही हफ्ता भरायची गरज नाही , फक्त दर वर्षी पौलीसी प्रिमियम भरायचा सलग 15 वर्षे , नंतर २० वर्षांनी जेव्हा एक ठराविक रक्कम मिळेल त्यातून मूळ कर्ज तसेच ४.९९ % व्याज दराने व्याज रिलायंस कॅपिटल कापून घेईल व उरलेली रक्कम परत मिळेल .....

बडबड गीत

लेखक भिंगरी यांनी बुधवार, 23/07/2014 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक बडबड गीत ............. बरं का ग मंदा काय झालं एकदा, ताई आमची चिरत होती खसाखसा कांदा . कांदा राहिला हातात विळी गेली बोटात विळी वरुन उठली, नाचत सुटली. धक्क्याने मोराम्ब्याची बरणीच फुटली. हाय हाय हाय काचेवरती पाय. काच गेली पायात आता करू तरी काय? बाबा हसले खो खो खो आई हसली खी खी खी ताईला आले रडू आईने दिला लाडू ---------------------------------------- आणि हे 'बेताल बरबाद गीत' ............. बऱ का गं जनता काय झालं एकदा मंत्री आमचे मोडत होते पटापटा कायदा. कायदा राहिला बुकात शिक्षा झाली कोकणात. हाय हाय हाय माझ्या पोराचे काय? पत गेली आता करू तरी काय? पदावरून उठले भांडत सुटले धक्क्
काव्यरस

Abandoned

लेखक स्पा यांनी बुधवार, 23/07/2014 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
कलादालन विभाग सुरु नसल्याने येथेच फटू टाकत आहे फोटोग्राफीचा वेगळा प्रयत्न केला आहे स्थळ : एक बंद पडलेलं पॉवर स्टेशन कॅमेरा आणी लेन्स : निकॉन डि ३१०० , ३५ मिमि लेन्स हि जागा पडीक आहे , पर्यटन स्थळ नसल्याने विशेष माहिती देण्यासारखे काही नाही आता रेल्वेच्या अखत्यारीत आहे, ओळख असल्याने आम्हाला जाऊ दिले, अन्यथा कोणालाही आत सोडत नाहीत बॉयलर चे स्फोट झाल्याने हे ब्रिटीश कालीन पॉवर स्टेशन बंद पडलं.

कटी पतंग

लेखक तिमा यांनी बुधवार, 23/07/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तर बरं का, एकदा एका बाप्याची पतंग कटली! म्हणजे कुणी काटली नाही. तर कणीला जिथे मांजा बांधतात ना, तिथेच निसटली. आता लोंबणारा मांजाच नाही, त्यामुळे ती काय टपरी पोरांना भेटली नाही. ती गेली उडत उडत आधीच्या उडवणार्‍याकडे! तिला वाटलं, आपल्याला बघून त्याला आनंद होईल. पण त्याच्याकडे तर कोर्‍या पतंगांची थप्पीच होती! आणि एका सुंदर पतंगीला तो कणीच बांधत होता. त्याने कटलेल्या पतंगीला पाहिलं आणि छदमीपणे म्हणाला, तू कशाला आलीस परत? आता तुझा नंबर ही सगळी चळत संपल्यावर! कटलेली पतंग फार निराश झाली. एकदम दिशाहीनपणे उडायला लागली. एका अंबॅसॅडर चालवणार्‍या डायवरला मिळाली.

झणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा !!

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 23/07/2014 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
. कोल्हापूरी मसाल्याच्या अनेक पाककृती आंजावर, पुस्तकांमध्ये शोधल्या आणि मग माझ्या अंदाजाने , आमच्या चवीत बसेल अश्या प्रमाणात तो बनवला. कोल्हापूरी मसाला साहित्यः १०-१२ लाल सुक्या मिरच्या ३-४ तमालपत्र २ टेस्पून सुके खोबरे ३-४ लसूण पाकळ्या ३-४ कढीपत्ता ४ हिरवे वेलदोडे १ दालचिनीची काडी १/२ टीस्पून काळीमिरी ३ मसाला वेलदोडे १/२ टीस्पून लवंगा १ नागकेशर १/२ टीस्पून हळद १/२ टीस्पून हिंग १ टीस्पून खसखस

धाग्याचे नामकरण

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 23/07/2014 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज पाहुण्यांसाठी एक स्पेशल धागा काढला. धाग्याला छोटीशीच पण दाट(घट्ट) प्रस्तावना केली. अशा धाग्याला आम्ही 'काकू' असे म्हणतो. पाहुणे म्हणाले आम्ही 'धागा' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली. तेंव्हा आणखी शब्द मिळाले, 'एकोळी' 'जिलबी' 'पाटी' एत्यादी असेच आणखीही शब्द असतील जाणकारांनी माहिती द्यावी. आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ. स्फूर्ती - साभार इथे पहा

मर्जी

लेखक आतिवास यांनी बुधवार, 23/07/2014 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझी झोप उडालीय, मन:शांती लयाला गेलीय; कशातच आनंद नाही; काही सुचत नाहीये. स्वप्न आहे हे? का खरोखर घडतंय? त्यांचा सतत आरडाओरडा चालू आहे, अगदी क्षणभरही खंड नाही. प्रत्येकाला विजयी व्हायचंय, इतरांपेक्षा जास्त जगायचंय, जास्त चमकायचंय. प्रत्येकाला हवं आहे यश, प्रेम, सुरक्षितता, पैसा आणि प्रसिद्धी. प्रत्येकाला हवी आहे महत्त्वाची भूमिका. इतरांना झाकोळून टाकण्याची त्यांची किती लगबग. मार्ग काढला असता मी; पण त्यांची संख्या खूप जास्त आहे. भीती वाटतेय मला.; जो तो धमकी देतोय. असं किती काळ चालेल? कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन.

अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी..

लेखक आनंदमयी यांनी बुधवार, 23/07/2014 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
नभी काजळी दाटता सूर ओला उरा अंतरातून बरसून गेला झरा आत वाहे,तरीही सुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी कुणी हासते वा कुणी गीत गाते कुणी प्रेमरंगात रंगून जाते उभी एकटी दूर सार्‍याहुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी झरावे किती मेघ आतून सारे फुलावे किती अंतरंगी शहारे फिरो गार वारा किती आसमंती तरी कोरडासा उरे जीव अंती नव्याने नटो ही धरा मेघवेडी नवी बावरी लाजुदे सांज थोडी उभी पायथ्याशी नव्याने जुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी सख्या,एकदा जीव ऐसा झुरावा सुटावे जिणे,श्वास माझा सरावा उरो शेवटाला तुझी होवुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी © डॉ.अदिती शरद जोशी

ओरल इन्शुलिन

लेखक उडन खटोला यांनी बुधवार, 23/07/2014 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर ओरल इन्शुलिन उपलब्ध आहे. पण ते विकायला बंदी आहे. सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलिन असते पण ते जठरात गेल्यावर नष्ट होते. फक्त उंटीणीच्या दुधातील इन्शुलिन पोटात नष्ट न होता रक्तात मिसळते. म्हणू हे दुध पिणाऱ्या लोकांना मधुमेह होत नाही. पण या दुधावर विक्री बंदी आहे हे आज कळले. भारतातील काही डॉक्टर्स हे दुध हवाबंद पिशव्यातून विकण्याच्या प्रयत्नात असून त्या साठी दोन कोटी उंटांची गरज आहे असा त्यांचा अंदाज आहे. आज जगभर ओरल इन्शुलिन बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत.