नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे
नमस्कार,
एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्यानंतर जे जडत्व येते (त्याला 'कंफर्ट झोन' असे गोंडस नाव आहे इंग्रजीमध्ये) तशा प्रकारचे काहीसे अस्मादिकांचे झाले आहे किंवा होऊ घातले आहे असे सध्या प्रकर्षाने जाणवतेय. शिवाय, सध्याच्या ठिकाणी कामाच्या आणि एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीच्या बाबतीत आता फारसे काही उत्साहवर्धक वातावरण राहिलेले नाही असे निदर्शनास आले आहे. काही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत पण ते तितकेसे सोपे नाही हे लक्षात यायला वेळ लागला. :-)
मिपा-मंडळी याबाबत काही मदत करू शकली किंवा माहिती पुरवू शकली तर खूप बरे होईल. थोडक्यात माझ्या कामाच्या स्वरूपाविषयी सांगायचे म्हणजे मला १० वर्षांचा कंटेट डेवलपमेंटमधला अनुभव आहे. मुख्यत्वे करून टेक्निकल रायटिंगचा हा अनुभव आहे. आयटीमध्ये लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे हेल्प, गाईडस, मॅन्युअल्स, ट्रेनिंग मटेरिअल, सर्टिफिकेशनचे स्टडी मटेरिअल इत्यादीचा अनुभव जास्त आहे. त्यासोबत ह्युरिस्टिक इव्हॅल्युएशन, काँपिटिटीव्ह अॅनॅलिसिस, प्रीसेल्स, वेबसाईट अॅनॅलिसिस असा अनुभव देखील आहे. या १० वर्षांआधीचा ४ वर्षांचा अनुभव देखील आहे. तो प्रामुख्याने मेंटेनन्सचा आहे.
मी दूरस्थ पद्धतीने १ वर्षाचा डिप्लोमा इन मार्केटींग मॅनेजमेंट पूर्ण केलेले आहे आणि जून २०१४ मध्ये दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्यास २ वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट (दूरस्थ) पूर्ण करेल. हा अभ्यासक्रम मी खूप प्रामाणिक प्रयत्न घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आतापर्यंत यात गुणदेखील बरे मिळाले आहेत. माझ्या लिखाणाच्या अनुभवाचा उपयोग मार्केटिंग कम्युनिकेशन, काँटेट मार्केटिंग, मार्केट अॅनेलिसिस, ब्रँडींग अॅनॅलिसिस, कम्युनिकेशन्स डिझाईन, इत्यादी क्षेत्रांमध्ये करून घेऊन त्या क्षेत्रात काम करण्याचा मानस आहे (खरं म्हणजे होता :-)). पण सध्याची परिस्थिती आणि माझा अनुभव बघता हे थोडे अवघड आहे. त्यामुळे कोअर टेक्निकल रायटिंगच्या क्षेत्रात चांगली संधी मिळाली तरी मला चालणार आहे. सध्या बदल महत्वाचा आहे.
अधिक माहिती किंवा रेझ्युमेसाठी मला ईमेल आयडी मिळाला तर मी त्यावर माझा रेझ्युमे पाठवू शकेन आणि त्यायोगे अधिक माहिती पुरवू शकेन.
कृपया आपण कुणी मदत करू शकलात किंवा उपयुक्त माहिती पुरवू शकलात तर बरे होईल. धन्यवाद!
--समीर
वाचने
11364
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
तुम्ही पुण्यात जॉब बघत असाल
In reply to तुम्ही पुण्यात जॉब बघत असाल by मराठी कथालेखक
धन्यवाद
कंटेंट डेव्हलपमेंट
In reply to कंटेंट डेव्हलपमेंट by राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद
अभियांत्रिकी
व्यनि केला आहे.
व्यनि केलाय..
समीरने न लाजता हा धागा लिहिला
In reply to समीरने न लाजता हा धागा लिहिला by जयंत कुलकर्णी
+१००
In reply to समीरने न लाजता हा धागा लिहिला by जयंत कुलकर्णी
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by समीरसूर
जमले की कळवा...पुढच्या पक्षी
In reply to जमले की कळवा...पुढच्या पक्षी by टवाळ कार्टा
नक्की नक्की
अरे हो!!!
आभार
व्यनि केला आहे.
पुण्यात कोथरूड भागात
In reply to पुण्यात कोथरूड भागात by श्रीगुरुजी
टेक्नोराईट्स - मकरंद पंडित
व्य.नि. केलाय.
व्य.नि. केलाय.
Content mgmt, technical
इतरही पर्याय.
धागा..
In reply to धागा.. by समीरसूर
परत एकदा ढोसतो एच.आर. ला आज.
In reply to परत एकदा ढोसतो एच.आर. ला आज. by कॅप्टन जॅक स्पॅरो
धन्यवाद!
In reply to धागा.. by समीरसूर
माफी
In reply to धागा.. by समीरसूर
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
सहमत !!
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
दादा कोंडकेंशी सहमत
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
नाईलाजाने सहमत.
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
उत्तम निरिक्षण...
In reply to उत्तम निरिक्षण... by संदीप डांगे
भारत वेगाने काँट्रॅक्टिंगच्या
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
शब्दा शब्दाशी सहमत. सध्या याच
In reply to शुभेच्छा! by दादा कोंडके
सहमत
अद्याप प्रयत्न संपलेले नाहीत.
In reply to अद्याप प्रयत्न संपलेले नाहीत. by खेडूत
धन्यवाद!
ईन्फोसिस मध्ये रिझ्यूमी पाठवा
In reply to ईन्फोसिस मध्ये रिझ्यूमी पाठवा by श्रीगुरुजी
गेली म्हैस पाण्यात
तुम्हाला जिथे जायचं आहे
मदत