Skip to main content

गणपती पूजेच्या मागची अवधारणा

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 29/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आज गणेश चतुर्थी, आज बाप्पा आपल्या घरी येतात. १० दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतो. आपण बाप्पाची पूजा का करतो या मागची अवधारणा काय? हा प्रश्न मनात येतोच.

वर्धापन दिनाच्या मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 29/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मंडळी मिपा आज आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे आज हे एक सदस्य म्हणुन लिहितांना मिपाच्या चांगल्या वाईट गोष्टींचा साक्षीदार म्हणुन मला मनापासून अतिशय आनंद वाटत आहे. मिपाच्या समृद्ध अशा प्रवासात मी मिपाच्यासोबत या क्षणापर्यंत सोबत आहे, त्याचाही खुप आनंद वाटत आहे. मिपाच्या सुरवातीला गणेशचतुर्थीच्या रात्रीच्या बारा वाजता निरोप आला ’मास्तर, मिपा सुरु झालंय. लवकर आयडी घ्या आणि लिहा’ मंडळी गेल्या सात वर्षात क्वचितच मी मिपापासून दूर राहीलो असेल. जमेल तसं लिहिलं आपण लोकांनी प्रतिसाद दिला कौतुक केलं. प्रसंगी टीका केल्या, भांड्लो.

थोडे अद्भुत थोडे गूढ - ४

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 29/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धाचा काळ. १८४० मध्ये युरोपात आयर्लंडमध्ये भयानक दुष्काळ पडला होता. आयरीश लोकांच्या जेवणाचा मुख्य भाग म्हणजे बटाटा! या बटाट्याच्या पीकावर पडलेला भयंकर रोग या दुष्काळाला मुख्यतः कारणीभूत होता. या काळात आयर्लंडमधील अनेकांवर उपासमारीची वेळ आली. बटाट्याच्या शेतीवर अवलंबून असलेली सुमारे ४० ते ५०% आयरीश जनता देशोधडीला लागली! या दुष्काळातून वाचण्यासाठी अखेरचा उपाय म्हणजे दुसर्‍या देशांत स्थलांतर करणं!

माझा गणेश मूर्ती संग्रह

लेखक अजया यांनी शुक्रवार, 29/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच वर्षांपासुन गणेश मुर्तींचा संग्रह करण्याचा माझा छंद आहे. जिथे जातो तिथली गणेश मुर्ती आणली जायची. बर्‍याच मुर्ती जमा झाल्यावर या संग्रहाचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. त्यातल्याच काही विविध माध्यमातल्या मुर्तींचे हे फोटो.

नॉन लेव्हल प्लेइंग गेम

लेखक ऋतुराज चित्रे यांनी गुरुवार, 28/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
क्रीडा स्पर्धा कोणतीही असो तेथे धर्म,जात व वंश या गोष्टींना थारा नसतो.अपवाद फक्त लिंगाचा,कारण स्त्री व पुरुषातील शारीरिक ठेवण व नैसर्गिक सामर्थ्यातील फरक हाच त्यामागील उद्देश असावा.स्पार्धा समान पातळीवर व्हावी या उद्देशाने अनेक क्रिडा प्रकारांचे गट पाडले गेले.उदा: मुष्ठीयुद्धात खेळाडूच्या वजनाप्रमाणे हेवी वेट व लाईट वेट असे गट पाडले गेले.कोणत्याही गटातील खेळाडूला आपले वजन कमी जास्त करून संबंधित गटात भाग घेता येतो. येथे वजन हे प्रमाण मानले गेले आहे.

वर्धमान ते महावीर - भाग 2

लेखक दशानन यांनी गुरुवार, 28/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
तो काही न बोलता डोळे बंद करून पुन्हा ध्यानमग्न झाला. वृद्ध उठला, बाजूला असलेली आपली फांदीचा आधार घेत. नंतर फक्त सुक्या पाचोळ्याचा आवाज येत येत.. नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा जंगलात निरव शांतता पसरली होती, ह्याच्या चेहऱ्यावर आता आधीपेक्षा जास्त नसले तरी, थोडे अधिक तेज आले होते.

शीत- उष्ण गुण- गुणधर्म व शरीरातील कार्य.

लेखक बाबा पाटील यांनी गुरुवार, 28/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय तत्वज्ञानाने व आयुर्वेद शास्त्राने शरीराशी संबधित वीस सामान्य गुण मान्य केले आहेत.ते म्हणजेच गुरु,लघु इत्यादी होय. शरीराशी संबधित असल्याने त्यांना शारीरगुण असे देखिल म्हणतात. गुर्वाद्यस्तु- गुरुलघुशीतउष्णस्निग्धरुक्षमंदतीक्ष्णस्थिरसरमृदुकठिनविशद्पिच्छिलश्लक्ष्णखरस्थूलसुक्ष्मसांद्रद्रवा:विंशती चरक सुत्रस्थान १/चक्रदत्त टीका. गुरु,लघु,उष्ण,स्निग्ध,रुक्ष,मंद,तीक्ष्ण,स्थिर,रस,मृदु,कठिण,विशद,पिच्छिल,श्लक्ष्ण,खर,स्थूल,सुक्ष्म,सांद्र,द्रव.

ब्रु.म.मं २०१५: अधिवेशन गीत स्पर्धा

लेखक बीएमएम२०१५ यांनी गुरुवार, 28/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे अधिवेशन गीत स्पर्धा हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी. विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. निवडलेले गीत अधिवेशनात वाजवले जाईल, तसेच अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी /promotionसाठी वापरले जाईल.

वाचनीय 'सायकॅमोर रो'

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 28/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच जॉन ग्रीशम यांची 'सायकॅमोर रो' ही कादंबरी वाचून संपवली. ही कादंबरी बहुधा २०१३ साली प्रकाशित झाली. मी एका-दोघांच्या हातात ही कादंबरी पाहिली होती. आधी याच लेखकाचं 'अ टाईम टू किल' वाचलं होतं. आवडलं होतं. 'किल' मध्ये अमेरिकेतल्या सुप्त वर्णभेदाचे दाहक चित्रण अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत केले होते. कादंबरीचा नायक जेक ब्रिगेन्स हा एक तरुण वकील आहे. स्वतः गोरा असूनदेखील माणसांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद असता कामा नये हे त्याचे तत्व असते. त्याच्या फर्मचा दारुडा मालक वैयक्तिक आयुष्यात स्वच्छंदी असला तरी त्याला कृष्णवर्णींयांविषयी आपुलकी असते.

क्षमा

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 28/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
“तू माझी क्षमा मागितली पाहिजेस”, ती म्हणाली. डोळ्यातले अश्रू लपवत तो “आय अ‍ॅम सॉरी” म्हणाला. “सॉरी नाही, क्षमा माग”, ती तिच्या शब्दावर ठाम होती. “मला क्षमा कर,” तो थरथरत्या आवाजात म्हणाला. “तूही क्षमा मागितली पाहिजेस”, शेजारच्या उदास स्त्रीकडे वळून ती त्याच स्वरांत उद्गारली. “मी तुझी क्षमा मागते,” म्हणताना त्या स्त्रीला हुंदका आवरता आला नाही. तिथे आता सुन्न शांतता होती. एकदाही मागे वळून न पाहता, अगदी सावकाश ती छोटी मुलगी खोलीच्या बाहेर गेली. “हं!