वार्तालाप : रेड्यामुखी वेदवाणी
रेड्यामुखी वेदवाणी
विद्या जगण्याची
ओवी ज्ञानीयाची.
आपण सर्वांनी ही कथा ऐकलीच असेल. संत ज्ञानेश्वर माऊलीने चमत्कार केला आणि रेडा वेद गायन करू लागला. आपण सर्वांना माहीत असेलच रेडा माणसाची बोली बोलू शकत नाही. मग या कथे मागचे सत्य काय? ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या बाबत हिंदीत एक म्हण प्रसिद्ध आहे "काला अक्षर भैस बराबर". माऊलीच्या काळात फारच कमी लोकांना लिहिता वाचता येत होते. संस्कृत भाषा तर हजारोंतून एखाद दुसर्या माणसाला. दुसरीकडे आपले सर्व धर्मग्रंथ वेद, उपनिषद, पुराण, भगवद्गीता इत्यादि देव भाषेत अर्थात संस्कृत मध्ये होते.
एकादशीची पहाट
एकादशीची पहाट
विठ्ठलाकडे पाठ
फोटोफ्रेम मधे आठ
पांडूरंगा ।।
दर्शन घडू दे
पाऊस पडू दे
भक्ती जडू दे
चरणाशी ।।
वारकरी दहा लाख
कोरोना चा ना धाक
असेच आम्हा राख
विठूराया।।
टाळ मृदंग गजर
दिंड्या पताका हजर
नाचे,गाये, बाजीगर
जन्मोजन्मी।।
भोग
अंतरीचा ठाव माझ्या
अजून मी घेतोच आहे
अनंत जन्मांचे हे देणे
अजून मी देतोच आहे
वृक्ष छाया तापलेल्या
धरणीला देतोच आहे
पोळलेल्या हृदयावर मी
ती छाया घेतोच आहे
धीर देऊन भ्यालेल्यांना
मीही तरी भितोच आहे
अमृताच्या प्याल्यातूनही
विष मी पितोच आहे
इतरांची मी कीवच करतो
परंतु मीही तोच आहे
आयुष्याची शाई संपली
तरीही मी लिहितोच आहे
मरणाची मी वाट पाहतो
तरीही मी मरतोच आहे
जिंकिले जरी षड्रिपू तरी
अजून मी हरतोच आहे
खेळापासून सावल्यांच्या
मैलन मैल पळतोच आहे
सावली जरी माझी पडली
परंतु मी जळतोच आहे
थकलेल्या पाऊलवाटांवर
परत मी फ़िरतोच आहे
तरीही त्या अंतरात माझ्या
अजून मी शिरतोच आहे
पुष्कळ झाले पुरे करा
अजून म
मातीचे पाय
पायांना स्पर्शून आले
ते हात मळाले होते
लख्ख उमगले तेव्हा
ते पाय मातीचे होते
मी केवळ पाहत होतो
पायांच्या खालची धूळ
ती ललाटास लावावी
हे एकच माथी खूळ
मी इथवर पाहून आलो
पाऊलखुणा विरणाऱ्या
आधी खुणावत, मागून
कपटी विकट हसणाऱ्या
आता, पुन्हा चालावे
पुढे, की परत फिरावे?
सोस ना-लायक पायांचे
पुसून अवघे टाकावे?
प्रेमळ शब्दांची ओल
मनात झिरपत नाही
व्हावे नतमस्तक ऐसे
पायही दिसत नाही
ते सारेच निघून गेले
जे पाय धरावे सुचले
मातीचे पाय मातकट
मागे माझ्यासह उरले
- संदीप भानुदास चांदणे ( रविवार, २५/०६/२०२३)
काव्यरस
तुका आकाशाएवढा (ऐसी अक्षरे ...मेळवीन-११)
मेघदूत पुस्तक जवळच्या पुस्तकांच्या दुकानात मिळते का?हे पाहायला गेले.मेघदूत उपलब्ध नव्हते.पण पुस्तकांची मांदियाळी पाहून भारावून गेले,नजर गेली गोनीदांच्या पुस्तकांकडे ...त्यात दिसले ‘तुका आकाशाएवढा’ हे पुस्तक.वारीही जवळ येत होती,या पुस्तकानिमित्त विठ्ठल नामही स्मरणात राहील,तेव्हा पुस्तक घेतले.तारीख होती एक जून ..गोनीदांचा स्मृतीदिन !दुग्धशर्करा योग जुळून आला.तुका आकाशाएवढा याचे पहिली आवृत्ती १९८१ साली प्रसिद्ध झाली होती.
तुकोबांचे बालपणीचे मित्र संतू तेली जनागडे यांनी मित्रा बरोबरीचे बहुमुल्य क्षण आठवणीच्या रुपात सांगितले आहे असे लेखण यात आहे.
भेट तुझी माझी होता.
वैशालीतली भेट!
मी टिंबक्टूला कंपनीच्या कामासाठी गेलो होतो. टिंबक्टूच्या सुलतानाला त्याच्या झनानखान्याचा डेटा बेस बनवून पाहिजे होता. वयोमानपरत्वे सुलतानाची स्मरणशक्ति त्याला दगा द्यायला लागली होती. कुठल्या दिवशी कुठल्या बेगमकडे वार आहे हे समजेना. एकूण किती मुलं आहेत? आज कुणाचे डोके उडवायचे आहे? इत्यादि. तर ते काम आमच्या स्वस्त आणि मस्त कंपनीकडे आले होते.
मी टिंबक्टूहून परत आल्यावर “तो धबधबा बघितलास का?” हा प्रश्न सगळे विचारणार अशी माझी अपेक्षा होती. पण तीन दिवसाच्या धावपाळीत माणूस काय काय बघणार हो?
“ चिअर्स! "
“ काय घेणार ? रम, वोडका, वाईन की या पावसात चिल्ड बिअर ? ” तिने नेहमीच्या उत्साहात विचारलं.
“ कॉफी, ” त्यानेही नेहमीसारखं थंडपणे उत्तर दिलं.
“ खूप बोअर आहेस रे तू. ”
“ आता जे पॅकेज आहे, ते आहे तुझ्यासमोर. Want to go for return or exchange ? ”
“ नको, चालवून घेईन. वैसे भी ' तेरे संग एक सिम्पलसी कॉफी भी किक देती है, तेरे संग'.. ” ती खट्याळ चेहरा करून गात म्हणाली.
“ तुझ्याकडे प्रत्येक सिच्युएशनवर गाणी कशी असतात गं ? मागच्या वेळी कुठला तरी विचित्र खेळ शोधून काढला होता. त्यात कमोड सीटवरचं गाणंही आठवलं होतं तुला. काय तर...' कुछ हुआ क्या? ', ' अभी तो नही... कुछ भी नही ' अशक्य आहेस.
भारताबाहेरचा भारत -अंदमान ४
मागचे भाग
भारताबाहेरचा भारत -अंदमान १
भारताबाहेरचा भारत -अंदमान २
भारताबाहेरचा भारत -अंदमान ३
काल दमून भागून हॉटेलवर परतल्यावर अर्थातच अजून काहीही करायची इच्छा उरली नव्हती. वातावरणही पावसाळी होते, त्यामुळे उरलेला दिवस आराम केला आणि रात्री लवकर जेवून गॅलरीत गप्पा मारत बसलो. मग गुडूप झोपलो.
माया
अस्पर्शित संध्याकाळ
घनव्याकूळ हे आकाश
मेघांना भिडतो वारा
तुटती थेंबांचे पाश
वाळूत गिरविली स्वप्ने
लाटांनी पुसली जाती
हलकेच उतरतो चंद्र
तिमिराच्या पंखावरती
क्षितिजाने सूर्याचा
मग हात घेतला हाती
अंबरात नक्षत्रांच्या
त्या स्निग्ध बावऱ्या ज्योती
पाण्यावर येई अलगद
ही चंद्रफुलाची छाया
मनात आठवते मग
आईची प्रेमळ माया
काव्यरस
मिसळपाव