जुलाबावरील जीवरक्षक प्रथमोपचाराचा मौलिक शोध
"हगवणीवर बहुगुणी
मीठ साखर पाणी"
या शासकीय जाहिरातीने आपल्या सामाजिक आरोग्य क्षेत्रात दीर्घकाळ अधिराज्य गाजवलेले आहे. अतिशय सोपा असलेला हा घरगुती प्रथमोपचार म्हणजे जुलाबाच्या रुग्णांसाठी वरदान असते. जुलाब ही पचनसंस्थेशी संबंधित असलेली समस्या जगभरात मोठ्या प्रमाणात आढळते. मुळात जुलाब हा ‘आजार’ नाही, परंतु ते काही आजारांचे एक लक्षण आहे. विविध प्रकारचे सूक्ष्मजीव संसर्ग आणि अन्नातून झालेली विषबाधा ही त्याची प्रमुख कारणे. जुलाबाद्वारे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी आणि क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे चयापचय आणि रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होतो.
मिसळपाव