Skip to main content

डॉ. झाकिर नाईक - माझी प्रतिक्रिया

Published on शुक्रवार, 03/10/2014
(सदरील मुळ लेख ईंग्रजीत असुन भाषांतराच्या चुका असु शकतात) काल मित्राने डॉ. झाकिर नाईक व श्री श्री रविशंकर यांच्यात झालेल्या चर्चेचा विडीओ दिला. सदर कार्यक्रम पाहिल्यवर माझ्या मनात उठलेले विचार... कार्यक्रमाचा विषय होता: “the conecpt of god in Hinduism and Islam in the light of the sacred scriptures.” पहिली गोष्ट जी माझ्या मनात आली ती कोणत्याही व्यक्तीच्या मनात येईल ती म्हणजे डॉ. झाकिर नाईक यांची स्मरणशक्ती. कमाल आहे राव ! त्या टोपीखाली एवढा डेटा साठवन्याची. हे व्हिडीओ पहान्याच्या अगोदरच मी ठरवलं होत कि - शक्य तितकं नि:पक्षपाती राहुन व्हिडीओ पहायचे.

मेक इन इंडिया...

Published on शुक्रवार, 03/10/2014
मा.पंतप्रधानांनी एक चांगली घोषणा केली आहे,मेक इन इंडिया,खर तर हे घडायलाच हव,किंवा आपण जर दैनंदिन वापराच्या गोष्टी घेतल्या तर त्यातल्या किती गोष्टी या भारतात बनलेल्या असतात्,किंवा परदेशातील उत्पादित आहेत. बर्‍याचदा हे कळतच नाही की आपण वापरत असलेली वस्तु देशांतर्गत उत्पादित आहे की परदेशात बनलेली आहे. जागतिक आणी देशस्थ अर्थकारणाचा विचार करता,मेक इन इंडिया वस्तु वापरण कधीच चांगलेच ठरेल,परंतु दर्जा राखलेल्या उत्तम अश्या वस्तु ज्या देशांतर्गत बाजारपेठेत उत्पादित केल्या आहेत्,त्या कुठल्या कुठल्या हे जाणकार सांगु शकतील का ?

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १०

Published on शुक्रवार, 03/10/2014
सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात अ‍ॅमंडसेन, रिझवेल्ट आणि हॅन्सन जोडगोळीने ग्जो हेवनच्या आसपास पंचवीस मैलांच्या परिसरात शिकारीसाठी तीन मोहीमा केल्या. या सर्व मोहीमांत अनेक रेनडीयर आणि क्वचित पक्षी त्यांच्या हाती लागले. मागे राहीलेले चार एस्कीमो या सर्व मोहीमांत त्यांच्याबरोबर गेलेले होते! ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अ‍ॅमंडसेन आणि हेल्मर हॅन्सन यांनी एका मोठ्या एस्कीमो तळाला भेट दिली आणि त्यांच्याकडून माशांचा भरपूर मोठा साठा विकत घेतला! २० नोव्हेंबरच्या सकाळी अ‍ॅमंडसेन आणि त्याचे सहकारी ग्जो वर ब्रेकफास्टच्या तयारीत असतानाच एक एस्कीमो त्यांच्या भेटीला आला.

बँग बँग

लेखक श्रीरंग
Published on शुक्रवार, 03/10/2014
हल्लीच्या काळात, हिंदी चित्रपट हे डोकं घरी ठेवून बघायला जाण्याची गोष्ट आहे, व तत्सम कावा, डोकं वापरून चित्रपट बनवण्याची स्वतःची कुवत नसलेल्या बर्याच चित्रपटकर्त्यांकडून उघडपणे केला जाऊ लागला आहे. त्यांनी हाताशी धरलेल्या समिक्षकांनीपण "करमणूकप्रधान मसालापट" वगैरे विशेषणं लावून या निर्बुध्दपटांना उचलून धरण्याची केविलवाणी कसरत सुरू केली आहे. आजच प्रदर्शित झालेला बँग बँग हा प्रचंड खर्च करून बनवलेला चित्रपट याच मालिकेतील एक. असो.. आधी चित्रपटातील काही चांगल्या गोष्टी : १. हा चित्रपट "किक" इतका वाईट नाही. बस्स. यापलिकडे चांगलं म्हणावसं असं यात खरच काहीच सापडत नाही.

महाराष्ट्र/हरयाना विधानसभा निवडणुक (२०१४)

Published on गुरुवार, 02/10/2014
१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील. हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते.

कुणी प्याल का पिलवाल का

Published on गुरुवार, 02/10/2014
कुणी प्याल का पिलवाल का खिलवाल का तो चकणा | रात्री तरी पिऊ नको सोडू नको अपुला बाणा || धृ || आधीच संध्याकाळची पार्टी आहे लांबली | परत जाता अजून एक पेग देत थांबली || चकणा शिळा दिला जो मद्य सांडुन भिजला | आत्ताच हातातला ग्लास मी कुरवाळीला || १ || सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जराशी घेतली | बोकाणा भरताना चकण्याचा, हिची चाहूल लागली || सांगाल का त्या महिलेला, कि जास्त नाही ढोसली || आणि उतराया नशा कोणी रात्र जागून काढली || २ || कुणी प्याल का पिलवाल का खिलवाल का तो चकणा | रात्री तरी पिऊ नको सोडू नको अपुला बाणा || धृ || (कवी अनिलांची क्षमा मागून)

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

Published on गुरुवार, 02/10/2014
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई.

उपवासाचे अनारसे

Published on गुरुवार, 02/10/2014
उपवासाचे अनारसे साह्ञीत्ञ : वरई तांदुळ साखर अथवा गूळ खसखस तूप कृती : वरई तांदुळ तीन दवस भिजवावेत. मग उपसून कपाड्यावर अधवट वाळवावे. नंतर खलबयात चांगले बारीक कुटून घयावेत. यात जेवढ पीठ त्याचया निमपट साखर अथवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घयावे व झाकून ठवावे. नंतर दुसरया दिवशी नेहमी प्रमाणे अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. यावर खसखसलावावी व लालासर रंगावर तळून घयावेत

"स्वच्छ भारत अभियान" आणि आपण

लेखक निलेश
Published on गुरुवार, 02/10/2014
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना‘चे उद्‌घाटन केले आहे. दिल्लीतील महर्षी वाल्मिकी मंदिरात पोहचून मोदींनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. या निमित्त भाषण करताना देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणार्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे. आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचर्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.

छायाचित्रणकला स्पर्धा ३ प्रवेशिका आणि मतदान....

Published on गुरुवार, 02/10/2014
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील तिसरं पुष्प, विषय ऋतु (Seasons) या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका. आजपासून ९ अक्टोबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकाचं चित्रं या यादीत टाकायचं राहुन गेलं असेल वा एकाच सदस्याची दोन चित्रं आली असतील तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती. धन्यवाद आणि शुभेच्छा!