Skip to main content

आज मी आहे

लेखक Rajvardhan यांनी बुधवार, 15/04/2015 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी आहे त्या वळणावर उद्या तू असशील झिरपत राहील झरा , उन्मळत राहतील उपळे, तरीही तिथे पाणी शेंदायला कोणीच नसेल ते तळे देखील आज विरक्त आयुष्य जगत असेल कारण आज मी उभा तिथे _ उद्या तू असशील | जुळतील धागे , मिळतील नातीगोती बांधल्या जातील रेशीमगाठी टाकली जातील बंधने संस्कृतीची लादले जातील निर्बंध रूढी परंपरांचे आपसूकच टाकले जातील नांगे स्वतंत्र स्वभावाचे कारण आज मी उभा ठाकलो आहे त्या बंधनात _ उद्या तू असशील

फणा

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 15/04/2015 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
(कवि कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांची माफी मागून) ओळखलत का सर मला, दारात आला कोणी केस नव्हते विस्कटलेले, डोळ्यात नव्हते पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला छाती काढून, ‘इनकम टॅक्सची धाड आली, गेली मान वाढवून’ कैदाशिनीसारखी नुसती कागदी घोडी नाचली, सारी खाती गोठविली, स्वीस बँक मात्र वाचली. कॅश वेचली, लॉकर सील केली, दागिणेही नेले गादीखाली म्हणून प्रॉपर्टीचे पेपर तेवढे वाचले वकीलाला घेउन संगे सर आता लढतो आहे एकेक मुद्दा काढतो आहे, चिखलफेक करतो आहे फोनकडे हात जाताच हसत हसत उठला ‘ओळख नको सर’, जरा कोडगेपणा वाटला. काढून घेतले पद, तरी अजूनही काढतोय फणा, पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त चर
काव्यरस

असा मी तसा मी

लेखक Rajvardhan यांनी बुधवार, 15/04/2015 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
असा मी तसा मी कधी असेन निर्मळ ब्रम्ह्कमळ तर कधी गलिच्छ बोतरा नदीकिनारी विसर्जित निर्माल्य मी वा गौरीपुजनासाठी वाहिलेला फ़ुलोरा मी नववधूने गृह्प्रवेश करताना ओलंडलेले माप मी वा शॄंगारच्या परमोच्च क्षणांचा सर्वेसर्वा मी असा मी तसा मी अळवावरुन घसरणारा दवबिंदू मी वा गवतातून हेलकावे घेणारे पर्णओहोळही मी काटेरी झूडपातील आंबट बोर मी वा काटेरी बाळसदार फ़ुलणारा एक सायाळ मी असा मी तसा मी तहानल्याची तृष्णा मी जीविताचा प्राणवायू मी देहाला शिरशीरी आणणारी एक मधाळ झूळूक मी वा वाऱ्याचे झंझावते नृत्य वादळ मी जिथे आभाळही ठेंगण होत ते क्षितीज मी असा मी तसा मी वर्षा ऋतुत न्हाऊन निघालेला पहाड मी पश्चिमेला

रेल्वे तिकीटाची नावात बदलाची सोय : फायदा कुणाचा ?

लेखक दा विन्ची यांनी बुधवार, 15/04/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वे तिकीटाची नावात बदलाची सोय : फायदा कुणाचा ? सध्या असे ऐकले आहे कि आधी आरक्षित केलेले तिकीट, काही कारणास्तव आपण प्रवास करू शकत नसू तर आपल्या रक्ताच्या नात्यातील इतरांना तसेच एकाच कार्यालयातील इतर सहकाऱ्याला सुद्धा वापरता येईल . खालील लिंकवर हि बातमी आहे. http://timesofindia.indiatimes.com/city/allahabad/Now-you-can-transfer-… वर वर पाहता हि एक अतिशय चांगली सुविधा आहे आणि आपला बराच त्रास आणि मनस्ताप कमी करणारी आहे.

(२०१५: बारावीनंतर मेडिकलसाठी ) उत्तरार्ध..

लेखक खेडूत यांनी बुधवार, 15/04/2015 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबर एक वर्षापूर्वी बारावीनंतर मेडिकलसाठी प्रवेशासंबंधी मी एक मदतधागा काढला होता . त्यातील चर्चा झालेल्या मुद्द्यांचा आणि इतर परिचितांच्या सल्ल्याचा विचार करून आमच्या पाल्याने बारावीनंतर मेडिकल (MBBS) ला जाणे नक्की केले आहे. मेडिकलला जाण्याबाबत सर्व नकारात्मक मुद्दे लक्षात घेऊनही ''रुग्णसेवेची आवड- आणि भारतातच राहायचे आहे '' या मुद्द्यावर निर्णय झाला आहे. तयारी सुरु आहे . इतर परिचित डॉक्टर्स आणि काही मिपाकरांनी छान माहिती आणि सल्ला दिला. त्यासाठी त्यांचे आभार. तर मेडिकल प्रवेश परीक्षांची तयारी करताना वर्षभरात मिळालेली खालील माहिती संकलित करून सर्वांच्या सोयीसाठी इथे एकत्र देत आहे.

कॅनन 50mm/f1.8 लेन्स

लेखक अभिजीत अवलिया यांनी बुधवार, 15/04/2015 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी बर्‍याच ठिकाणी ह्या लेन्स बद्दल ऐकले व वाचले आहे. ही लेन्स आपल्या किट मधे असावीच असेच सर्व ऑनलाइन रिव्यू सांगत आहेत. तुमच्यापैकी कुणी ही लेन्स कधी वापरली आहे का? असल्यास कृपया मला फीडबॅक द्यावा. सध्या माझ्याजवळ 18-135 mm लेन्स आहे. पण ती कमी प्रकाशात तितकीशी उपयोगी नाही. 50mm घेऊन माझा नक्की फायदा होईल का ते कृपया सांगावे.

महामानवाची जयंती ।

लेखक सवंगडी यांनी मंगळवार, 14/04/2015 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज महामानवाची जयंती । मस्त साजरी होती आहे… हो ,होते आहे. लेझर लाईट च्या प्रकाशात मदमस्त झालेले भीम सैनिक नाचतायेत… मी पण एक मनापासूनचा भीमसैनिक (यात जातपात शोधायला जाऊ नका) ! त्यामुळेच मला हे सगळ पाहून वाईट वाटत.! बाबासाहेबांमुळे मिळालेल्या व्यक्तीस्वातंत्र्य भाषास्वातंत्र्य, आणि आचारस्वातंत्र्य याचा परिपूर्ण वापर (दुरुपयोग) चालू आहें.पण विचार स्वातंत्र्य मात्र जमेल तसं आम्ही वापरतो. बाबासाहेबांचे विचार त्यांच्या अनुयायांनी लवकरच संपवायचे चालवले आहे. गौतम बुद्ध म्हणाले होते ,"मला देव बनवु नका! "माझे विचार अवलंबा!" पण आपण त्यांना देवाच्या जागी ठेवलं ! तिथेच बौद्ध धर्माला उतरती कळा आली.

ड्रिल

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 14/04/2015 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
ड्रिल म्हणजे कवायत हे शारीरिक शिक्षण( physical Training) नव्हे. यातील मुळ फरक काय ? तर एक शारीरिक प्रशिक्षण आहे आणि दुसरे मानसिक प्रशिक्षण. आमच्या एका मित्राच्या भाषेत डोक्याला भोक पडून काही गोष्टी डोक्यात घुसवल्या जातात आणि मग सिमेंटने सील केल्या जातात. शस्त्र चालवायला शिकवणे सोपे असते पण प्रत्यक्षात त्याचा वापर करणे हे तेवढे सोपे नसते. जेंव्हा तुम्ही शत्रूच्या समोर बंदूक हातात घेऊन उभे राहता आणि चहुबाजूनी गोळीबार सुरु होतो तेंव्हा तो आवाज तुम्हाला गर्भगळीत करून टाकतो तेंव्हा तुमची मती गुंग होते आणि हात पाय काम करेनासे होतात. अशा वेळेस काही गोष्टी यांत्रिकपणे करायला शिकवले जाते.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३९

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 14/04/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. मी दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहाच्या पहिल्या येश्टीनी गावाकडे निघालो.. पुढे चालू... ========================================== आणि पुन्हा येकवार तो येश्टीचा कंटाळवाणा परंवास करुन, मी दुपारच्या चिडचिडं करणार्‍या तिनाच्या तिरप्या उन्हात मुक्कामी पोहोचलो. बघतो..., तर चक्क काका त्याची ती भल्यामोठ्ठ्या क्यारियरची सायकल घेऊन स्वागताला उभा असल्यासारखा उभा.आणि बरोबर संघटनेतल्या दोनचार पोरांचं कोंडाळंही.

टोल भैरव !!

लेखक नितिन शेंडगे यांनी मंगळवार, 14/04/2015 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार !!, आज काल सगळीकडे टोल चा मुद्दा खूप गाजतोय. नुकताच सरकार ने काही टोल बंध केले आणि काही ठिकाणी तात्पुरती टोल माफी दिली . मी सुरुवातीला स्पष्ट करतोय कि कोणत्याही राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मी हे लिहित नाहीये. हा तर चला मग, ज्या वेळेस मनसेने टोल चा मुद्दा घेतला त्याच्या आधी आपल्यासारख्या सामान्य माणसाचे तरी लक्ष होते का कि आपण किती आणि का टोल देतो ?? कधीतरी आपण विचारले का रे बाबा किती दिवस टोल घेणार ?